Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gondhal Movie: ‘गोंधळ’च्या स्क्रीनिंगला खऱ्या अर्थाने गोंधळ! ३०० सीट्स, ६५० हून अधिक प्रेक्षक; जागा न मिळाल्याने नाराजी

Gondhal Movie: पुण्यात ‘गोंधळ’च्या स्पेशल स्क्रीनिंगला ६५० हून अधिक प्रेक्षक दाखल झाले. थिएटरची क्षमता ३०० असल्याने ८०-९० प्रेक्षकांना जागेअभावी माघारी फिरावं लागलं.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 25, 2026 | 10:29 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Gondhal Movie: मराठी चित्रपट ‘गोंधळ’ला प्रेक्षकांकडून मिळणारं प्रेम पुन्हा एकदा पाहायला मिळालं. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगला प्रेक्षकांनी अक्षरशः तुफान गर्दी केली. थिएटरची आसनक्षमता सुमारे ३०० असताना तब्बल ६५० हून अधिक प्रेक्षक दाखल झाल्याने काही काळ परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली.

महाराष्ट्राच्या विविध भागांतून प्रेक्षक पुण्यात

आंतरराष्ट्रीय चित्रपट समीक्षक संघटना फिप्रेस्की (FIPRESCI) यांच्या वतीने या विशेष स्क्रीनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. ‘फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्हड’ पद्धतीने प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती असल्याने महाराष्ट्राच्या विविध भागांतून प्रेक्षक पुण्यात आले होते.

नगर, औरंगाबाद, कोल्हापूर, सातारा, सांगली यांसह अनेक शहरांतून ‘गोंधळ’ पाहण्यासाठी प्रेक्षक दाखल झाले. मात्र, थिएटरमध्ये केवळ ३०० आसनांची व्यवस्था असताना ६५० हून अधिक जण पोहोचल्याने थिएटरबाहेर मोठी गर्दी झाली.

Sriya Reddy Mahakali: कोण आहे श्रिया रेड्डी? ‘महाकाली’ बनून अक्षय खन्नावर पडली भारी; ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूची आहे लेक!

जागा न मिळाल्याने ८०-९० प्रेक्षक माघारी

प्रेक्षकांची संख्या वाढल्याने काही काळ थिएटरबाहेर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. सुमारे ८० ते ९० प्रेक्षकांना जागेअभावी चित्रपट न पाहताच माघारी फिरावं लागलं. यावेळी काही प्रेक्षक आणि सिक्युरिटीमध्ये वादावादीही झाली.

मात्र, फिप्रेस्कीचे सदस्य नरेंद्र आणि त्यांच्या टीमने मध्यस्थी करत परिस्थिती शांततेत हाताळली.

जितेंद्र जोशींसह कलाकारांची उपस्थिती

या सगळ्या गोंधळानंतरही ‘गोंधळ’चं स्पेशल स्क्रीनिंग यशस्वीपणे पार पडलं. अभिनेता जितेंद्र जोशी यांच्यासह काही कलाकारांनीही स्क्रीनिंगला उपस्थिती लावली आणि प्रेक्षकांसोबत चित्रपटाचा आनंद घेतला.

स्क्रीनिंगनंतर प्रेक्षकांकडून चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे, ‘गोंधळ’ पुन्हा प्रदर्शित करावा, अशी मागणीही अनेक प्रेक्षकांनी केली.

Kriti Sanon Raksha Bandhan Ad: “भावाला बिकिनी घालून राखी का बांधाल?”, कंगना रनौतने कृती सेननला सुनावलं; जाहिरातीवरून वाद पेटला

दिग्दर्शकांनी मागितली माफी

या संपूर्ण प्रकाराबाबत चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त केली. ते म्हणाले की, दूरदूरहून येऊनही काही प्रेक्षकांना चित्रपट पाहता आला नाही, याचं वाईट वाटतं. ज्या प्रेक्षकांना ‘गोंधळ’ पाहता आला नाही, त्यांच्यासाठी पुन्हा स्क्रीनिंग आयोजित करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं.

तसंच, ‘गोंधळ’च्या रिरिलीजचाही विचार सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे चित्रपटाच्या चाहत्यांना लवकरच पुन्हा मोठ्या पडद्यावर ‘गोंधळ’ पाहण्याची संधी मिळू शकते.

बहुभाषिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘गोंधळ’

दरम्यान, ‘गोंधळ’ आता केवळ मराठी भाषेपुरता मर्यादित राहणार नाही. हा चित्रपट तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे ‘गोंधळ’ची कथा आता देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे.

स्पेशल स्क्रीनिंगला मिळालेला हा अभूतपूर्व प्रतिसाद पाहता, आगामी काळात ‘गोंधळ’च्या बहुभाषिक प्रदर्शनाकडेही प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

Web Title: Gondhal movie special screening pune 650 viewers 300 seat theatre

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 10:29 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi movie

संबंधित बातम्या

Kon Yashwant Pansare : भरत जाधव आणि पुष्कर श्रोत्री आमनेसामने! ‘कोण यशवंत पानसरे?’चा प्रीमियर कधी?
1

Kon Yashwant Pansare : भरत जाधव आणि पुष्कर श्रोत्री आमनेसामने! ‘कोण यशवंत पानसरे?’चा प्रीमियर कधी?

Kapus Konda Movie Teaser: एका कुत्र्यामुळे उलगडणार नात्यांची गोष्ट; ‘कापूसकोंडा’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
2

Kapus Konda Movie Teaser: एका कुत्र्यामुळे उलगडणार नात्यांची गोष्ट; ‘कापूसकोंडा’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

Janak Marathi Movie : सत्यासाठी पेटणार स्वाभिमानाची लढाई; ‘जनक’च्या मोशन पोस्टरने वेधलं लक्ष
3

Janak Marathi Movie : सत्यासाठी पेटणार स्वाभिमानाची लढाई; ‘जनक’च्या मोशन पोस्टरने वेधलं लक्ष

Dharau Marathi Movie: ग्रामीण मातीचा सुगंध अन् गाईसोबतचं हळवं नातं; ‘धाराऊ’चा पोस्टर पाहिलात का?
4

Dharau Marathi Movie: ग्रामीण मातीचा सुगंध अन् गाईसोबतचं हळवं नातं; ‘धाराऊ’चा पोस्टर पाहिलात का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.