Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kon Yashwant Pansare : भरत जाधव आणि पुष्कर श्रोत्री आमनेसामने! ‘कोण यशवंत पानसरे?’चा प्रीमियर कधी?

Kon Yashwant Pansare : भरत जाधव आणि पुष्कर श्रोत्री यांची प्रमुख भूमिका असलेली ‘कोण यशवंत पानसरे?’ ही कोर्टरूम थ्रिलर वेबसीरिज १६ ऑक्टोबर २०२६ रोजी मराठी ZEE5 वर प्रदर्शित होणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 09, 2026 | 11:20 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Kon Yashwant Pansare : मराठी मनोरंजनविश्वात सध्या नव्या वेब सीरिजची चर्चा सुरू आहे. अभिनेता भरत जाधव आणि पुष्कर श्रोत्री पहिल्यांदाच एका दमदार कोर्टरूम ड्रामामध्ये आमनेसामने येणार आहेत. ‘कोण यशवंत पानसरे?’ असं या आगामी मराठी वेब सीरिजचं नाव असून, न्याय, सत्ता आणि सत्य यांच्यातील संघर्षाची रंजक कहाणी यातून उलगडणार आहे. या सीरिजचा प्रीमियर १६ ऑक्टोबर २०२६ रोजी मराठी ZEE5 वर होणार आहे.

आनंद दिलीप गोखले लिखित आणि दिग्दर्शित या सीरिजची निर्मिती मंजिरी सुबोध भावे यांच्या कान्हाज् मॅजिकने केली आहे. कोर्टरूम ड्रामा आणि तपासाधारित थरार यांचा मिलाफ असलेली ही कथा एका माणसाच्या अपराधीपणातून आत्मविश्वासाकडे आणि सत्याच्या शोधाकडे होणाऱ्या प्रवासाचा वेध घेते.

काय आहे ‘कोण यशवंत पानसरे?’ची कथा?

यशवंत पानसरे हा एकेकाळचा प्रबळ वकील असतो. मात्र, आयुष्यातील एका मोठ्या अपयशामुळे त्याचा आत्मविश्वास डळमळीत होतो. तो वकिलीपासून दूर जात नोटरी म्हणून काम करू लागतो. भूतकाळातील घटनांचा अपराधीपणा आणि आत्मसंशय त्याला सतत त्रास देत असतो.

दरम्यान, अलका नावाची तरुणी बेपत्ता होते. तिचे वडील सदाशिव मापारी मुलीचा शोध घेण्यासाठी व्यवस्थेकडे मदत मागतात; मात्र यंत्रणेकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. हताश झालेल्या सदाशिव यांचं टोकाचं पाऊल यशवंत पानसरेला हादरवून टाकतं. यानंतर तो न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतो.

या लढाईत त्याला जान्हवी या निर्भय तरुण वकिलाची साथ मिळते. अलका बेपत्ता होण्यामागचं सत्य शोधताना दोघांनाही प्रभावशाली संस्था, कायदेशीर गुंतागुंत आणि स्वतःच्या मर्यादांचा सामना करावा लागतो. या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकतो, तसतसे अनेक अनपेक्षित खुलासे समोर येतात.

भरत जाधव साकारणार आव्हानात्मक भूमिका

या सीरिजमध्ये भरत जाधव यशवंत पानसरे यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. यावेळी त्यांच्या व्यक्तिरेखेचा बाज नेहमीपेक्षा वेगळा असणार आहे. अपयशाचा सामना केलेला, स्वतःवरील विश्वास गमावलेला आणि पुन्हा न्यायासाठी उभा राहणारा माणूस त्यांनी साकारला आहे.

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना भरत जाधव म्हणाले की, यशवंत पानसरे हे पात्र त्यांना त्यातील विविध भावनिक पदरांमुळे वेगळं वाटलं. तो अचानक नायक बनत नाही, तर त्याच्या समोर घडणाऱ्या अन्यायाकडे दुर्लक्ष करू शकत नसल्याने पुन्हा लढाईत उतरतो. अलका बेपत्ता झाल्याच्या प्रकरणाचा तपास करताना त्याला व्यवस्थेसोबतच स्वतःच्या भीतीचा आणि अपराधीपणाचाही सामना करावा लागतो.

कोर्टरूम ही त्याच्यासाठी केवळ कायदेशीर लढाईची जागा नसून स्वतःचा आवाज पुन्हा शोधण्याचा प्रवास ठरतो. प्रेक्षकांना या व्यक्तिरेखेची भावनिक बाजू भावेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पुष्कर श्रोत्रींची भूमिका ठरणार महत्त्वाची

या सीरिजमध्ये पुष्कर श्रोत्री सारडा या वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहेत. व्यवस्थेची कार्यपद्धती आणि तिच्यामागील शक्ती यांची जाणीव असलेल्या या व्यक्तिरेखेचा यशवंत पानसरेशी संघर्ष पाहायला मिळणार आहे.

पुष्कर श्रोत्री यांच्या मते, सारडा हा केवळ न्यायालयात पानसरेसमोर उभा राहणारा प्रतिस्पर्धी वकील नाही. कायदा, न्याय आणि व्यवस्थेकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्यामुळे दोघांमधील संघर्ष केवळ युक्तिवाद जिंकण्यापुरता मर्यादित राहत नाही, तर न्यायव्यवस्थेच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करतो.

Shefali Bagga: बिग बॉस फेम शेफाली बग्गाने EDकडे सोपवले १.५ कोटी रुपये; घराच्या झडतीत ३० लाखांची रोकड जप्त

शिवानी रांगोळे साकारणार निर्भय जान्हवी

अभिनेत्री शिवानी रांगोळे या सीरिजमध्ये जान्हवी या तरुण वकिलाची भूमिका साकारणार आहेत. वय, अनुभव किंवा प्रस्थापित पद्धतींच्या मर्यादा न स्वीकारता स्वतःच्या निर्णयांवर ठाम राहणारी ही व्यक्तिरेखा आहे.

जान्हवीची निर्भयता आणि अन्यायाविरुद्ध प्रश्न विचारण्याची तयारी तिला वेगळं बनवते. यशवंत पानसरेसोबत काम करताना तीही स्वतःच्या पद्धतीने व्यवस्थेला आव्हान देते. या भूमिकेमुळे कथानकाला एक वेगळी दिशा मिळणार आहे.

कधी आणि कुठे पाहता येणार वेब सीरिज?

‘कोण यशवंत पानसरे?’ या सीरिजमध्ये भरत जाधव, पुष्कर श्रोत्री आणि शिवानी रांगोळे यांच्यासह शर्वरी जमेनीस, उज्ज्वला जोग, विद्याधर जोशी आणि मिलिंद फाटक यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

तामिळ ZEE5 सीरिज ‘सत्तामुम नीधियम’वर आधारित ही मराठी मालिका न्याय, सत्य आणि संस्थात्मक जबाबदारी यांसारख्या विषयांवर भाष्य करते. रहस्य, तपास आणि कोर्टरूममधील नाट्यमय घडामोडींची आवड असलेल्या प्रेक्षकांसाठी ही सीरिज खास ठरू शकते.

‘कोण यशवंत पानसरे?’चा प्रीमियर १६ ऑक्टोबर २०२६ रोजी मराठी ZEE5 वर होणार आहे. भरत जाधव आणि पुष्कर श्रोत्री यांच्यातील न्यायालयीन संघर्ष पाहण्यासाठी प्रेक्षकांना आता काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Drishyam 3 OTT Release: अजय देवगणच्या ‘दृश्यम ३’च्या OTT रिलीजची तारीख ठरली? जाणून घ्या अपडेट

Web Title: Kon yashwant pansare bharat jadhav pushkar shrotri zee5 premiere date

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 11:20 AM

Topics:  

  • Bharat Jadhav
  • entertainment
  • marathi movie

संबंधित बातम्या

Anil Kapoor: ‘माझा मित्र मला सोडून गेला’; मित्राच्या जाण्याने अनिल कपूर भावुक; अभिनेत्याची हृदयस्पर्शी पोस्ट चर्चेत
1

Anil Kapoor: ‘माझा मित्र मला सोडून गेला’; मित्राच्या जाण्याने अनिल कपूर भावुक; अभिनेत्याची हृदयस्पर्शी पोस्ट चर्चेत

Shefali Bagga: बिग बॉस फेम शेफाली बग्गाने EDकडे सोपवले १.५ कोटी रुपये; घराच्या झडतीत ३० लाखांची रोकड जप्त
2

Shefali Bagga: बिग बॉस फेम शेफाली बग्गाने EDकडे सोपवले १.५ कोटी रुपये; घराच्या झडतीत ३० लाखांची रोकड जप्त

Drishyam 3 OTT Release: अजय देवगणच्या ‘दृश्यम ३’च्या OTT रिलीजची तारीख ठरली? जाणून घ्या अपडेट
3

Drishyam 3 OTT Release: अजय देवगणच्या ‘दृश्यम ३’च्या OTT रिलीजची तारीख ठरली? जाणून घ्या अपडेट

Mary Kom: Ex पतीविरोधात गंभीर आरोप करणं पडलं महागात, पती ओनलरने दाखल केला मानहानीचा खटला
4

Mary Kom: Ex पतीविरोधात गंभीर आरोप करणं पडलं महागात, पती ओनलरने दाखल केला मानहानीचा खटला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.