Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 19 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hiten Tejwani: हितेन तेजवानीची मराठी चित्रपटसृष्टीत दमदार एन्ट्री, साकारणार आजवरची सर्वात वेगळी भूमिका!

Hiten Tejwani: हिंदी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारे अभिनेता हितेन तेजवानी आता ‘लाईव्ह’ या आगामी मराठी चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 19, 2026 | 11:17 AM
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Hiten Tejwani: हिंदी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेले अभिनेता हितेन तेजवानी आता मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘लाईव्ह’ या आगामी मराठी चित्रपटातून हितेन मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, या चित्रपटात त्यांचा आजवर कधीही न पाहिलेला अंदाज पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे, ‘लाईव्ह’मधील त्यांची व्यक्तिरेखा त्यांच्या आतापर्यंतच्या भूमिकांपेक्षा पूर्णपणे वेगळी असल्याचे सांगितले जात आहे.

‘लाईव्ह’मधून मराठी चित्रपटात पदार्पण

‘लाईव्ह’ चित्रपटाची निर्मिती रिद्धी बिद्दी व्हिजन्स या बॅनरखाली निर्माते सुमित पांडे करत आहेत. छबी असीम हल्दर या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते असून, लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी संजीव राय यांनी सांभाळली आहे.

या चित्रपटात हितेन तेजवानी यांनी ‘आलम’ ही व्यक्तिरेखा साकारली आहे. आपल्या पहिल्याच मराठी चित्रपटाबद्दल हितेन उत्सुक असून, मराठी कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभवही त्यांना खास वाटला.

हितेन यांनी ‘लाईव्ह’बद्दल बोलताना सांगितले की, हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट असल्यामुळे ते खूप उत्सुक आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले असून, प्रेक्षकांनी चित्रपट पाहून आपली प्रतिक्रिया द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

‘लाईव्ह’मध्ये काय पाहायला मिळणार?

‘लाईव्ह’ची कथा एका महत्त्वाकांक्षी तरुणीभोवती फिरणारी असून, तिच्या संघर्षाची आणि न्याय-हक्कासाठीच्या लढ्याची हृदयस्पर्शी कहाणी चित्रपटातून मांडण्यात येणार आहे. समाजातील विविध मुद्द्यांवर भाष्य करण्यासोबतच वर्तमानकाळात घडणाऱ्या संवेदनशील आणि मन हेलावून टाकणाऱ्या घटनांचाही वेध या चित्रपटातून घेतला जाणार आहे.

आजूबाजूला सुरू असलेल्या अनेक घटना ‘लाईव्ह’च्या माध्यमातून कशा प्रकारे समोर येतात आणि त्याचा समाजावर काय परिणाम होतो, याची मांडणी चित्रपटात करण्यात आली आहे. त्यामुळे ‘लाईव्ह’चा विषय आजच्या काळाशी संबंधित असल्याचे दिसून येते.

Home Minister New Season: २० वर्षांचा प्रवास, ७,५०० पैठण्या आणि लाखो आठवणी; ‘होम मिनिस्टर’च्या नव्या पर्वाची दमदार सुरुवात

हितेन तेजवानी यांची गाजलेली कारकीर्द

हितेन तेजवानी यांनी ‘सुकन्या’, ‘घर एक मंदिर’, ‘कुटुंब’, ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’, ‘कुसुम’ आणि ‘केसर’ यांसारख्या लोकप्रिय हिंदी मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळाली.

याशिवाय ‘कृष्णा कॉटेज’, ‘जॉगर्स पार्क’, ‘अन्वर’, ‘अनकही’ आणि ‘मानो या ना मानो’ यांसारख्या चित्रपटांमध्येही ते झळकले आहेत. दिग्दर्शक संजीव राय यांच्यासोबत हितेन यांनी यापूर्वी ‘टेस्ला टूकी’च्या जाहिरातीसह ‘फातिमा’ या वेबसीरिजमध्येही काम केले आहे. ही वेबसीरिज रिलायन्स एंटरटेनमेंटवर स्ट्रीम झाली होती.

‘लाईव्ह’मध्ये दिग्गज कलाकारांची फौज

हितेन तेजवानी यांच्यासोबत या चित्रपटात मिलिंद गुणाजी, अनंत जोग, निशिगंधा वाड, रूपाली जाधव, सागर काळे, अनिल नागरथ, नम्रता जाधव आणि विनय राजपूत हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

चित्रपटाचे संवादलेखन संजीव राय आणि पूनम विभूते यांनी केले आहे. महालिंग कंठाळे यांनी लिहिलेल्या गीतांना दिनेश अर्जुना आणि अमन श्लोक यांनी संगीत दिले आहे. गोपी यांनी सिनेमॅटोग्राफीची जबाबदारी सांभाळली असून, कला दिग्दर्शन सैफुद्दीन शेख यांनी केले आहे.

‘लाईव्ह’च्या माध्यमातून हितेन तेजवानी पहिल्यांदाच मराठी चित्रपटात दिसणार असल्याने त्यांच्या मराठी पदार्पणाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

Kartik Aaryan Injury: कबीर खानच्या आगामी चित्रपटाच्या सेटवर कार्तिक आर्यन जखमी; अॅक्शन सीनदरम्यान घडली घटना

Web Title: Hiten tejwani makes marathi film debut with live to play alam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2026 | 11:17 AM

Topics:  

  • Actor
  • Bollywood
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

Kartik Aaryan Injury: कबीर खानच्या आगामी चित्रपटाच्या सेटवर कार्तिक आर्यन जखमी; अॅक्शन सीनदरम्यान घडली घटना
1

Kartik Aaryan Injury: कबीर खानच्या आगामी चित्रपटाच्या सेटवर कार्तिक आर्यन जखमी; अॅक्शन सीनदरम्यान घडली घटना

Ayesha Khan Engagement: आयशा खानने गुपचूप उरकला साखरपुडा? मिस्ट्री मॅनसोबत रोमँटिक फोटो व्हायरल
2

Ayesha Khan Engagement: आयशा खानने गुपचूप उरकला साखरपुडा? मिस्ट्री मॅनसोबत रोमँटिक फोटो व्हायरल

Home Minister New Season: २० वर्षांचा प्रवास, ७,५०० पैठण्या आणि लाखो आठवणी; ‘होम मिनिस्टर’च्या नव्या पर्वाची दमदार सुरुवात
3

Home Minister New Season: २० वर्षांचा प्रवास, ७,५०० पैठण्या आणि लाखो आठवणी; ‘होम मिनिस्टर’च्या नव्या पर्वाची दमदार सुरुवात

Marathi OTT Content August 2026: कॉमेडी, सस्पेन्स ते कौटुंबिक कथा; OTTवर पाहा हे ट्रेंडिंग मराठी सिनेमे आणि वेबसीरिज
4

Marathi OTT Content August 2026: कॉमेडी, सस्पेन्स ते कौटुंबिक कथा; OTTवर पाहा हे ट्रेंडिंग मराठी सिनेमे आणि वेबसीरिज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.