Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

The India Story Trailer : ‘द इंडिया स्टोरी’चा ट्रेलर प्रदर्शित! कीटकनाशक शेतीमागील काळं सत्य; काजल अग्रवालसोबत मराठमोळा अभिनेता

या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, कीटकनाशक शेतीमुळे निर्माण होणाऱ्या गंभीर समस्यांवर भाष्य करण्यात आले आहे. काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. चेतन डीके दिग्दर्शित या चित्रपटाची कथा, पटकथा आणि निर्मिती सागर बी. शिंदे यांनी केली आहे. चित्रपट २४ जुलै २०२६ रोजी प्रदर्शित !

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 18, 2026 | 02:44 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

‘The India Story : स्लो पॉइझन इन प्रोग्रेस’ या आगामी चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. कीटकनाशक शेतीमुळे निर्माण होणाऱ्या गंभीर समस्यांवर आणि त्याच्या समाजावर होणाऱ्या दूरगामी परिणामांवर भाष्य करणारा हा चित्रपट वास्तववादी मांडणीमुळे चर्चेत आला आहे. काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटातून दडलेले सत्य उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Marathi Movie: ‘एक होतं माळीण’ पावसात संपूर्ण गाव इतिहासजमा, Trailer पाहून अंगावर येईल काटा

ट्रेलरमध्ये दमदार अभिनय, प्रभावी संवाद आणि सामाजिक आशयाची झलक पाहायला मिळते. सत्य, न्याय आणि जिद्दीच्या बळावर उभ्या राहणाऱ्या व्यक्तींचा संघर्ष यातून उलगडतो. कीटकनाशक शेतीमुळे उद्भवणाऱ्या आरोग्य आणि पर्यावरणाशी संबंधित प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न चित्रपटातून करण्यात आला आहे. झी स्टुडिओज प्रस्तुत आणि एमआयजी प्रॉडक्शन अँड स्टुडिओज यांच्या सहकार्याने साकारलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन चेतन डीके यांनी केले असून, कथा, पटकथा आणि निर्मिती सागर बी. शिंदे यांची आहे. हा चित्रपट २४ जुलै २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

दिग्दर्शक चेतन डीके म्हणाले, “‘द इंडिया स्टोरी’ हा केवळ चित्रपट नसून समाजाने करायलाच हवा असा एक महत्त्वाचा संवाद आहे. प्रत्येक घरावर शांतपणे परिणाम करणाऱ्या गंभीर विषयाकडे लक्ष वेधण्याचा आमचा प्रयत्न आहे.” काजल अग्रवाल यांनी सांगितले की, या चित्रपटाचा भाग होणे त्यांच्यासाठी अर्थपूर्ण अनुभव ठरला. “माझी व्यक्तिरेखा सत्यासाठी खंबीरपणे उभी राहते आणि हाच या चित्रपटाचा आत्मा आहे,” असे त्या म्हणाल्या.

Amitabh Bachchan : ‘कौन बनेगा करोडपती 18’ची तारीख ठरली! यंदा गेममध्ये असणार मोठे बदल

श्रेयस तळपदे यांनीही चित्रपटाबद्दल उत्साह व्यक्त करत सांगितले की, “एका सामान्य माणसाने आशा आणि जिद्दीच्या बळावर असामान्य आव्हानाविरुद्ध दिलेल्या लढ्याची ही कथा आहे. हा संदेश प्रत्येक प्रेक्षकापर्यंत पोहोचेल, असा विश्वास आहे.” चित्रपटाचे सहनिर्माते स्वाती विनायक सैंदाणे, अनीता जाधव, विनायक सैंदाणे, कल्पेश शाह, देवयानी खोराटे आणि प्रेम जोशी आहेत. छायांकन निशांत भागवत, संगीत मंगेश धाकडे, संकलन आशीष म्हात्रे, गीतकार शकील आझमी आणि ध्वनी संयोजन अनमोल भावे यांनी सांभाळले आहे.

Web Title: Kajal aggarwal and shreyas talpade starrer the india story trailer launched

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 02:44 PM

Topics:  

  • hit movies
  • shreyas talpade

संबंधित बातम्या

Bhootam Bhayam Movie : आता बहरणार प्रेमपुष्प! आली आली ‘सरोजिनी’, GenZ साठी स्पेशल लव्ह सॉंग
1

Bhootam Bhayam Movie : आता बहरणार प्रेमपुष्प! आली आली ‘सरोजिनी’, GenZ साठी स्पेशल लव्ह सॉंग

‘सौभाग्यवती सरपंच २’चा ट्रेलर आणि पोस्टर प्रदर्शित; ‘या’ तारखेपासून Ultra Jhakaas Marathi OTT वर प्रेक्षकांच्या भेटीला
2

‘सौभाग्यवती सरपंच २’चा ट्रेलर आणि पोस्टर प्रदर्शित; ‘या’ तारखेपासून Ultra Jhakaas Marathi OTT वर प्रेक्षकांच्या भेटीला

The India Story हे असंच सुरू राहिलं तर आपल्याला कोणीही वाचवू शकत नाही -श्रेयस तळपदे
3

The India Story हे असंच सुरू राहिलं तर आपल्याला कोणीही वाचवू शकत नाही -श्रेयस तळपदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.