
Jailer 2 Advance Booking: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
थलायवा रजनीकांतचा सिनेमा म्हणजे सणच असतो. आणि आता ‘जेलर 2’ ने तर रिलीजच्या आधीच सण साजरा करायला सुरुवात केली आहे. 15 ऑक्टोबरला हा सिनेमा थिएटरमध्ये येतोय, पण लोकांनी आत्तापासूनच तिकीट बुक करून ठेवले आहेत.
जगभरातून या सिनेमाने पहिल्या दिवसासाठी जवळपास 30 कोटी रुपयांची अॅडव्हान्स बुकिंग केली आहे.सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे यातला मोठा हिस्सा परदेशातून आला आहे. फक्त बाहेरच्या देशातच 20 कोटींची तिकीट विक्री झाली आहे. रजनीकांतची क्रेझ भारतापुरती नाहीतर, परदेशात सुद्धा चाहते आहेत. Jailer 2 Advance Booking:
व्यापाराच्या वेबसाइट Sacnilk ने दिलेल्या माहितीनुसार, ‘जेलर 2’ च्या पहिल्या दिवसाची एकूण प्री-सेल बुकिंग 30 कोटीच्या जवळ पोहोचली आहे. अजून 3 दिवस बाकी आहेत.परदेशातून मिळालेला प्रतिसाद बघून तर सगळेच चकित झाले आहेत. लोक टायगर मुथुवेल पांडियनला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी वेडे झाले आहेत. बाहेर एवढी बुकिंग झाल्यामुळेच एकूण आकडा एवढा वर गेला आहे. आता जसे जसे भारतात जास्त थिएटरमध्ये बुकिंग सुरु होईल, तसा हा आकडा 40 कोटीच्या पुढे पण जाऊ शकतो.
2023 ला ‘जेलर’ आला होता आणि त्याने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तोडले होते. त्याच यशानंतर आता दुसरा भाग येतोय, त्यामुळे लोकांमध्ये डबल उत्सुकता आहे.तामिळनाडूने मारली बाजीभारतात पण बुकिंग जोरात सुरु आहे. पहिल्या दिवसासाठी भारतात 10.79 कोटींची अॅडव्हान्स बुकिंग झाली आहे. 242 शहरांमध्ये 771 थिएटरमध्ये 4843 शो लावले आहेत आणि आतापर्यंत 5 लाख 69 हजार तिकीटं विकली गेली आहेत.
‘RAJINI THE JAILER 2’ ADVANCE BOOKINGS OPEN – *HINDI* TRAILER OUT NOW – 15 OCT 2026 RELEASE… #Rajinikanth returns in a power-packed avatar in #RajiniTheJailer2… Advance bookings open now. 🔗: https://t.co/uISlxHgqwW The much-awaited action entertainer arrives in theatres on [Thursday] 15 Oct 2026 in #Hindi, #Tamil, #Telugu, #Malayalam, and #Kannada. PEN Marudhar will distribute the film across North India. Directed by #NelsonDilipkumar… Produced by #SunPictures. @rajinikanth — taran adarsh (@taran_adarsh) October 12, 2026
जर 3 दिवसांचा हिशोब केला तर भारतात एकूण 16.56 कोटींची अॅडव्हान्स विक्री झाली आहे. हे फक्त ऑनलाईन विकलेले आकडे आहेत, थिएटरवाल्यांनी स्वतःसाठी जे तिकीट राखून ठेवले आहेत ते यात नाहीत.
भारतात सगळ्यात जास्त बुकिंग अर्थातच तामिळनाडूमधून झाली आहे. तामिळनाडूने एकट्याने 6.34 कोटींची बुकिंग केली आहे. दुसऱ्या नंबरवर केरळ आहे – 2.63 कोटी, तिसऱ्या नंबरवर कर्नाटक – 1.22 कोटी आणि तेलंगणामध्ये 47 लाखांची बुकिंग झाली आहे.
शहरांबद्दल बोलायचे झाले तर चेन्नई टॉपला आहे. चेन्नईत एकट्या 3.15 कोटींची बुकिंग झाली आहे. बंगळुरूमध्ये 1.17 कोटी आणि कोईम्बतूरमध्ये 58 लाखांची तिकीट विक्री झाली आहे.
आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट समोर आली आहे. लोक सगळ्यात जास्त रात्रीचा शो बुक करत आहेत. पहिल्या दिवशी रात्रीच्या 1610 शो पैकी 41% शो भरले आहेत. सकाळच्या शोला 40%, दुपारच्या शोला 28% आणि संध्याकाळच्या शोला 27% गर्दी आहे.72 शो तर आधीच हाऊसफुल्ल बोर्ड लावून बसले आहेत आणि 337 शो जवळपास फुल्ल होत आले आहेत. भाषेत तमिळ व्हर्जन सगळ्यात पुढे आहे. तमिळ 2D ने 10.29 कोटी कमावले आहेत, तर हिंदी आणि तेलगू व्हर्जन अजून मागे आहेत.
Salman Khan: सलमान खान पुन्हा गाजवणार रुपेरी पडदा, ‘मॉन्स्टर’साठी ५० दिवसांची खास रणनीती
‘जेलर 2’ चे दिग्दर्शन नेल्सन दिलीपकुमारने केले आहे आणि सन पिक्चर्सने हा सिनेमा बनवला आहे. 15 ऑक्टोबरला हा सिनेमा जगभरात रिलीज होईल. यात रजनीकांत सोबत रम्या कृष्णन, योगी बाबू, मोहनलाल, शिवराजकुमार, विद्या बालन, मिथुन चक्रवर्ती असे मोठे स्टार्स आहेत. आता सगळ्यांचे लक्ष आहे की नेल्सन या भागात काय नवीन धमाका करतो