Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Khashaba Teaser: नागराज मंजुळेंच्या ‘खाशाबा’चा दमदार टीझर आउट, टीझरमध्ये दडला मोठा सस्पेन्स; मुख्य अभिनेता कोण?

नागराज मंजुळे दिग्दर्शित 'खाशाबा' चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित झाला आहे. मात्र टीझरमध्ये मुख्य अभिनेता कोण आहे, याचा सस्पेन्स कायम ठेवण्यात आला आहे. जाणून घ्या चित्रपटाची स्टारकास्ट, कथा आणि रिलीज डेट.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 02, 2026 | 03:10 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या बहुप्रतीक्षित ‘खाशाबा’ चित्रपटाचा दमदार टीझर अखेर प्रदर्शित झाला आहे. स्वातंत्र्यानंतर भारतासाठी वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारे पहिले खेळाडू खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित हा चित्रपट आधीपासूनच चर्चेत होता. आता टीझर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

टीझरमध्ये खाशाबा जाधव यांच्या संघर्षाची, जिद्दीची आणि देशासाठी पदक जिंकण्याच्या प्रवासाची प्रभावी झलक पाहायला मिळते. दमदार पार्श्वसंगीत, भव्य दृश्यरचना आणि भावनिक मांडणीमुळे टीझरने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

खाशाबा जाधव यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत 1952 च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला होता. नागराज मंजुळेंनी खाशाबा जाधव यांच्या भूमिकेसाठी नव्या चेहऱ्याची निवड केली आहे. मात्र या अभिनेत्याचे अजूनही गुलदस्त्यात असून त्याचा चेहरा देखील टीझरमध्ये दाखवण्यात आला नाही. पण लवकरच त्याचा चेहरा रिव्हिल करण्यात येईल. सध्या खाशाबा या चित्रपटाची रिलीज डेट आणि टीझर जाहीर करण्यात आला आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांची फळी

बहुप्रतीक्षित ‘खाशाबा’ चित्रपट १ जानेवारी २०२७ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांची फळी पाहायला मिळणार आहे. जितेंद्र जोशी, महेश मांजरेकर, गिरीश कुलकर्णी, संदीप कुलकर्णी, संदेश कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, वैभव मांगले, छाया कदम, गार्गी कुलकर्णी आणि ओम भूतकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटात आहेत. विशेष म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजीराजे छत्रपती देखील या चित्रपटातून अभिनय करताना दिसणार आहेत. दमदार स्टारकास्ट आणि प्रेरणादायी कथानकामुळे ‘खाशाबा’ हा २०२७ मधील सर्वाधिक चर्चेतील चित्रपटांपैकी एक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

Mandar Jadhav: ‘९व्या मजल्यावरून उडी मारण्याचा विचार..,’ मंदार जाधवने सांगितला आयुष्यातील सर्वात कठीण काळ, म्हणाला, ‘त्या क्षणी’

‘खाशाबा’च्या टीझरने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला असून, नेटकऱ्यांकडून त्याचं भरभरून कौतुक होत आहे. नागराज मंजुळे यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेल्या या चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे आणि गार्गी कुलकर्णी यांनी केली आहे. भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित हा सिनेमा १ जानेवारी २०२७ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Khashaba Jadhav: देशाचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा …

जिओ स्टुडिओज आणि आटपाट निर्मित या बहुप्रतीक्षित मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाल्याची घोषणा काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केली होती. आता मात्र प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरला आहे तो म्हणजे खाशाबा जाधव यांची मुख्य भूमिका कोण साकारणार?

सूत्रांच्या माहितीनुसार, नागराज मंजुळे यांनी या भूमिकेसाठी महाराष्ट्रभर ऑडिशन्स घेतल्या असून, एका नव्या चेहऱ्याची निवड करण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मुख्य भूमिकेत कोण झळकणार, याबाबतचा सस्पेन्स आणखी वाढला आहे.

Web Title: Khashaba teaser nagraj manjules khashaba teaser out a big mystery hidden in the promo who is the lead actor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 03:10 PM

Topics:  

  • mahesh manjrekar
  • marathi movie
  • Nagraj Manjule

संबंधित बातम्या

Chhaya Kadam Bhootam Bhayyam: छाया कदमांचा ‘भूतम भयम्’चा अनुभव; ‘जठाई’च्या व्यक्तिरेखेबाबत अभिनेत्रीने सांगितली मनातली गोष्ट
1

Chhaya Kadam Bhootam Bhayyam: छाया कदमांचा ‘भूतम भयम्’चा अनुभव; ‘जठाई’च्या व्यक्तिरेखेबाबत अभिनेत्रीने सांगितली मनातली गोष्ट

Bajrangi Marathi Movie: भव्य हनुमंताच्या साक्षीने उलगडणार एका माणसाची कहाणी; ‘बजरंगी’चं पोस्टर चर्चेत
2

Bajrangi Marathi Movie: भव्य हनुमंताच्या साक्षीने उलगडणार एका माणसाची कहाणी; ‘बजरंगी’चं पोस्टर चर्चेत

National Award: योगेश देशपांडेला मिळाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’साठी सन्मान
3

National Award: योगेश देशपांडेला मिळाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’साठी सन्मान

Onkar Bhojane On Milind Kawde: ‘नक्कीच उत्तर देईन’; ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून वाद, मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर
4

Onkar Bhojane On Milind Kawde: ‘नक्कीच उत्तर देईन’; ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून वाद, मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.