Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Salman Khan Apologizes : श्रद्धा कपूरसमोर सलमान खानने व्यक्त केली खंत, फोन करून मागितली माफी; नेमकं काय घडलं

Salman Khan Apologizes : सलमान खानचा ‘मातृभूमी’ आणि श्रद्धा कपूरचा ‘ईठा’ ४ डिसेंबरला एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहे. या बॉक्स ऑफिस क्लॅशबद्दल सलमानने श्रद्धाची माफी मागितली.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 21, 2026 | 10:23 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Salman Khan Apologizes : बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या आगामी ‘मातृभूमी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट ४ डिसेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र, याच दिवशी अभिनेत्री श्रद्धा कपूरचा ‘ईठा’ हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर या दोन्ही चित्रपटांमध्ये टक्कर पाहायला मिळणार आहे. दरम्यान, या क्लॅशबद्दल सलमान खानने आपली प्रतिक्रिया दिली असून श्रद्धा कपूरची फोनवरून माफीही मागितली आहे.

‘मातृभूमी’ आणि ‘ईठा’च्या क्लॅशवर काय म्हणाला सलमान खान?

सलमान खानने आपल्या ‘मातृभूमी’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेत्री चित्रांगदा सिंहसोबत एबीपीच्या रायझिंग समिट २०२६ या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. यावेळी त्याला ‘मातृभूमी’ आणि ‘ईठा’ या चित्रपटांच्या एकाच दिवशी होणाऱ्या प्रदर्शनाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सलमानने आपल्याला कधीही दुसऱ्या कोणत्याही चित्रपटाशी बॉक्स ऑफिसवर टक्कर द्यायची नसते, असे स्पष्ट केले.

सलमानने सांगितले की, त्याच्या चित्रपटाची दुसऱ्या चित्रपटाशी टक्कर व्हावी, अशी त्याची अजिबात इच्छा नव्हती. या क्लॅशबद्दल त्याने श्रद्धा कपूरची माफीही मागितली आहे. तसेच श्रद्धाच्या ‘ईठा’ चित्रपटाला त्याने शुभेच्छा दिल्या. जर आपल्याला या टक्करीबद्दल आधीच माहिती असती, तर आपण ४ डिसेंबर ही प्रदर्शनाची तारीख निवडली नसती, असेही त्याने सांगितले.

सलमानने का निवडली ४ डिसेंबरची तारीख?

यावेळी सलमान खानने ‘मातृभूमी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निवडण्यामागचे कारणही स्पष्ट केले. सुरुवातीला हा चित्रपट २७ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित करण्याचे नियोजन होते. मात्र, त्याच दिवशी सूरज बडजात्या यांचा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली.

त्यानंतर २४ डिसेंबरला शाहरुख खानचा चित्रपट प्रदर्शित होण्याची चर्चा होती. शाहरुखच्या चित्रपटाशीही बॉक्स ऑफिसवर टक्कर नको असल्याने सलमानने ती तारीख टाळली. याशिवाय रणबीर कपूर, विकी कौशल आणि आलिया भट्ट यांचे चित्रपटही २६ जानेवारीच्या आसपास प्रदर्शित होणार असल्याने त्यांच्याशीही क्लॅश होऊ नये, याची काळजी घेतल्याचे सलमानने सांगितले. अखेर ‘मातृभूमी’साठी ४ डिसेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली.

Samay Raina: वादग्रस्त वक्तव्यांनंतर आता पुरस्काराची चर्चा; समय रैनाला दादासाहेब फाळके पुरस्कार २०२६ जाहीर, वाचा यादी

चित्रांगदा सिंहने केले श्रद्धा कपूरचे कौतुक

या चर्चेदरम्यान चित्रांगदा सिंहनेही श्रद्धा कपूरचे कौतुक केले. श्रद्धा एक चांगली अभिनेत्री असून दोन्ही चित्रपट चांगले आहेत, असे तिने म्हटले. प्रेक्षकांना ‘मातृभूमी’ आणि ‘ईठा’ हे दोन्ही चित्रपट आवडतील, अशी आशाही तिने व्यक्त केली. त्यामुळे आता ४ डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या दोन्ही चित्रपटांपैकी प्रेक्षक कोणत्या चित्रपटाला अधिक पसंती देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Marathi Theatre: मराठी नाट्यरसिकांसाठी आनंदाची बातमी! नेहरू सेंटरमध्ये ‘ही दोस्ती तुटायची नाही’पासून नाटकांची मेजवानी

Web Title: Salman khan apologizes shraddha kapoor maatrubhumi eetha box office clash ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 10:23 AM

Topics:  

  • entertainment
  • Salman Khan
  • Shraddha Kapoor

संबंधित बातम्या

Kiran Mane: अजितदादांच्या प्रकरणातच एवढी गुप्तता का? अभिनेता किरण मानेचा सवाल; पोस्टमधून व्यक्त केला संताप!
1

Kiran Mane: अजितदादांच्या प्रकरणातच एवढी गुप्तता का? अभिनेता किरण मानेचा सवाल; पोस्टमधून व्यक्त केला संताप!

Samay Raina: वादग्रस्त वक्तव्यांनंतर आता पुरस्काराची चर्चा; समय रैनाला दादासाहेब फाळके पुरस्कार २०२६ जाहीर, वाचा यादी
2

Samay Raina: वादग्रस्त वक्तव्यांनंतर आता पुरस्काराची चर्चा; समय रैनाला दादासाहेब फाळके पुरस्कार २०२६ जाहीर, वाचा यादी

Marathi Theatre: मराठी नाट्यरसिकांसाठी आनंदाची बातमी! नेहरू सेंटरमध्ये ‘ही दोस्ती तुटायची नाही’पासून नाटकांची मेजवानी
3

Marathi Theatre: मराठी नाट्यरसिकांसाठी आनंदाची बातमी! नेहरू सेंटरमध्ये ‘ही दोस्ती तुटायची नाही’पासून नाटकांची मेजवानी

Malavika Mohanan: फक्त कलाकारच नाही, तर पडद्यामागील टीमही महत्त्वाची! मालविका मोहननचा ‘पॉकेट नोवेल’साठी खास पुढाकार
4

Malavika Mohanan: फक्त कलाकारच नाही, तर पडद्यामागील टीमही महत्त्वाची! मालविका मोहननचा ‘पॉकेट नोवेल’साठी खास पुढाकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.