Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samay Raina: वादग्रस्त वक्तव्यांनंतर आता पुरस्काराची चर्चा; समय रैनाला दादासाहेब फाळके पुरस्कार २०२६ जाहीर, वाचा यादी

Samay Raina: दादासाहेब फाळके पुरस्कार २०२६च्या विजेत्यांची यादी जाहीर! समय रैना, रणवीर सिंह, टेलर स्विफ्ट, कमल हासन यांच्यासह कोणाला कोणता पुरस्कार मिळाला? जाणून घ्या संपूर्ण यादी.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 21, 2026 | 08:39 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Samay Raina: प्रसिद्ध कॉमेडियन समय रैना त्याच्या विनोदी शैलीमुळे आणि अनेकदा वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. आता समय पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे, मात्र यावेळी कारण वेगळं आहे. समय रैनाला दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल पुरस्कार २०२६मध्ये ‘कॉमेडियन ऑफ द इयर’ पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याच्या पुरस्काराच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून, काही नेटकऱ्यांनी या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

दादासाहेब फाळके पुरस्कार २०२६च्या विजेत्यांची यादी जाहीर

दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल पुरस्कार २०२६च्या विजेत्यांची यादी २० नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आली. यंदाच्या पुरस्कारांमध्ये हॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंतच्या अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. प्रसिद्ध अमेरिकन गायिका टेलर स्विफ्टला ‘इंटरनॅशनल आर्टिस्ट ऑफ द इयर’ पुरस्कार जाहीर झाला आहे. तर भारतीय कॉमेडियन समय रैनाला ‘कॉमेडियन ऑफ द इयर’ पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

या पुरस्कारांच्या यादीत हॉलिवूड अभिनेता मायकेल बी. जॉर्डन, दिग्दर्शक पॉल थॉमस अँडरसन आणि जेम्स कॅमेरॉन यांच्यासह भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांचा समावेश आहे. ज्येष्ठ अभिनेते कमल हासन यांनाही चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानासाठी सन्मानित करण्यात आले आहे.

Kranti Redkar Mother: ‘मैत्रेया’च्या शूटिंगआधीच आईला कर्करोगाचं निदान; क्रांती रेडकर भावुक, सांगितला संघर्षाचा काळ

समय रैनाच्या पुरस्काराच्या घोषणेनंतर नेटकऱ्यांची नाराजी

समय रैना आपल्या हटके विनोदी शैलीने आणि स्टँडअप कॉमेडीने प्रेक्षकांना खळखळून हसवतो. त्याच्या विनोदाची खास शैली आणि लोकप्रियतेमुळे त्याला ‘कॉमेडियन ऑफ द इयर’ पुरस्कार जाहीर झाला आहे. मात्र, या घोषणेनंतर सोशल मीडियावर काही नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. समयला हा पुरस्कार देण्याचा निर्णय अनेकांना पटलेला नाही. त्यामुळे पुरस्काराची घोषणा होताच त्याच्या नावावरून सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.

दादासाहेब फाळके पुरस्कार २०२६ : विजेत्यांची संपूर्ण यादी

  1. टेलर स्विफ्ट – सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय कलाकार
  2. समय रैना – सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार
  3. जेम्स कॅमेरून – जागतिक चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदान
  4.  मायकेल बी. जॉर्डन – आंतरराष्ट्रीय चित्रपटातील सर्वोत्कृष्ट अभिनेता (सिनर्स)
  5. कमल हासन – चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदान
  6. स्मृती इराणी – अभिनयातील विशेष कामगिरी (क्योंकि सास भी कभी बहू थी २)
  7. आर्यन खान – वेब सीरिजमधील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (द बॅड्स ऑफ बॉलिवूड)
  8. पॉल थॉमस अँडरसन – आंतरराष्ट्रीय चित्रपटातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
  9.  अक्षय खन्ना – अभिनयातील विशेष कामगिरी (धुरंधर)
  10. अवतार: फायर अँड अॅश – सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट
  11.  तारक मेहता का उल्टा चष्मा – सर्वोत्कृष्ट मालिका
  12. धुरंधर – सर्वोत्कृष्ट चित्रपट
  13. आदित्य धर, ज्योती देशपांडे आणि लोकेश धर – सर्वोत्कृष्ट निर्माते
  14. रणवीर सिंह – सर्वोत्कृष्ट अभिनेता (धुरंधर)
  15.  अनीत पड्डा – सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (सैयारा)
  16. इलैयाराजा – संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान
  17. कांतारा : चॅप्टर १ – समीक्षकांच्या पसंतीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट
  18. ऋषभ शेट्टी – समीक्षकांच्या पसंतीचा सर्वोत्कृष्ट अभिनेता
  19. यामी गौतम धर – समीक्षकांच्या पसंतीची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
  20. आदित्य धर – सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
  21. विनीत कुमार सिंह – सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता
  22. रितेश देशमुख – विनोदी भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता
  23. करण औजला – सर्वोत्कृष्ट कलाकार
  24. सैयारा – वर्षातील सर्वोत्कृष्ट गाणे
  25. फहीम अब्दुल्ला – सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (सैयारा)
  26. द बॅड्स ऑफ बॉलिवूड – सर्वोत्कृष्ट वेब सीरिज
  27. जयदीप अहलावत – वेब सीरिजमधील सर्वोत्कृष्ट अभिनेता (पाताल लोक)
  28.  शेफाली शाह – वेब सीरिजमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (दिल्ली क्राइम ३)
Malavika Mohanan: फक्त कलाकारच नाही, तर पडद्यामागील टीमही महत्त्वाची! मालविका मोहननचा ‘पॉकेट नोवेल’साठी खास पुढाकार

Web Title: Samay raina dadasaheb phalke award 2026 announced comedian of the year

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 08:39 AM

Topics:  

  • dadasaheb phalke awards
  • entertainment
  • Samay Raina

संबंधित बातम्या

Marathi Theatre: मराठी नाट्यरसिकांसाठी आनंदाची बातमी! नेहरू सेंटरमध्ये ‘ही दोस्ती तुटायची नाही’पासून नाटकांची मेजवानी
1

Marathi Theatre: मराठी नाट्यरसिकांसाठी आनंदाची बातमी! नेहरू सेंटरमध्ये ‘ही दोस्ती तुटायची नाही’पासून नाटकांची मेजवानी

Malavika Mohanan: फक्त कलाकारच नाही, तर पडद्यामागील टीमही महत्त्वाची! मालविका मोहननचा ‘पॉकेट नोवेल’साठी खास पुढाकार
2

Malavika Mohanan: फक्त कलाकारच नाही, तर पडद्यामागील टीमही महत्त्वाची! मालविका मोहननचा ‘पॉकेट नोवेल’साठी खास पुढाकार

Kranti Redkar Mother: ‘मैत्रेया’च्या शूटिंगआधीच आईला कर्करोगाचं निदान; क्रांती रेडकर भावुक, सांगितला संघर्षाचा काळ
3

Kranti Redkar Mother: ‘मैत्रेया’च्या शूटिंगआधीच आईला कर्करोगाचं निदान; क्रांती रेडकर भावुक, सांगितला संघर्षाचा काळ

Samantha Ruth Prabhu: समंथा प्रभूच्या घरी चिमुकल्याचं आगमन; ३९व्या वर्षी बनली आई, मुलाला दिलं खास धार्मिक नाव!
4

Samantha Ruth Prabhu: समंथा प्रभूच्या घरी चिमुकल्याचं आगमन; ३९व्या वर्षी बनली आई, मुलाला दिलं खास धार्मिक नाव!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.