Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nadotsavam 2026: ठाण्यात रंगणार ‘नादोत्सवम २०२६’; पद्मश्री भिकल्या धिंडा यांच्या तारपा वादनासह ‘अभंग रिपोस्ट’ची खास प्रस्तुती

Nadotsavam 2026 : ठाण्यातील गावदेवी मैदानावर ३१ ऑक्टोबरला ‘नादोत्सवम २०२६’ रंगणार. पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा यांचे तारपा वादन आणि ‘अभंग रिपोस्ट’चे सादरीकरण हे प्रमुख आकर्षण असणार.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 22, 2026 | 02:00 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Nadotsavam 2026: महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला आणि भक्ती-संगीताचा अनोखा संगम अनुभवण्याची संधी ठाणेकरांना मिळणार आहे. झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ या सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात ३१ ऑक्टोबर रोजी ठाण्यातील गावदेवी मैदानात होणार आहे. या महोत्सवात पद्मश्री पुरस्काराने सन्मानित भिकल्या लाडक्या धिंडा यांचे पारंपरिक तारपा वादन हे प्रमुख आकर्षण असणार असून, ‘अभंग रिपोस्ट’ बँडच्या खास सादरीकरणातून भक्ती-संगीताचा आधुनिक आविष्कार अनुभवायला मिळणार आहे.

तारपा वादनातून उलगडणार आदिवासी लोकसंस्कृतीचा वारसा

महाराष्ट्राच्या आदिवासी लोकसंस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या तारपा वादनाला ‘नादोत्सवम २०२६’मध्ये विशेष स्थान देण्यात आले आहे. पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा यांच्या सादरीकरणातून प्रेक्षकांना या पारंपरिक कलेचा अनुभव घेता येईल. स्थानिक लोककलांना आणि कलाकारांना मोठ्या व्यासपीठावर संधी देण्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा या महोत्सवाचा प्रयत्न आहे.

‘अभंग रिपोस्ट’मधून भक्ती-संगीताचा आधुनिक अंदाज

या महोत्सवातील आणखी एक आकर्षण म्हणजे ‘अभंग रिपोस्ट’ बँडची खास प्रस्तुती. महाराष्ट्राच्या भक्तीपरंपरेतील लोकप्रिय अभंगांना आधुनिक संगीताची जोड देत हा बँड आपली वेगळी शैली सादर करणार आहे. अभंगांचा मूळ भाव आणि अर्थ कायम ठेवून त्यांची आजच्या पिढीला भावेल अशा पद्धतीने मांडणी करण्याचा प्रयत्न या सादरीकरणातून केला जाणार आहे. त्यामुळे पारंपरिक भक्ती-संगीत आणि आधुनिक संगीतशैली यांचा अनोखा मेळ प्रेक्षकांना अनुभवता येईल.

प्रसाद जवादे आणि शिवानी सोनार करणार सूत्रसंचालन

झी मराठीवरील लोकप्रिय कलाकार प्रसाद जवादे आणि शिवानी सोनार या महोत्सवाचे सूत्रसंचालन करणार आहेत. पारंपरिक लोककला, भक्ती-संगीत आणि आधुनिक सादरीकरणांचा संगम साधणारा हा कार्यक्रम ठाणेकरांसाठी सांस्कृतिक पर्वणी ठरणार आहे.

झी मराठी, झी टॉकीज आणि मराठी झी५च्या बिझनेस हेड व चीफ चॅनेल ऑफिसर हेमा व्ही. आर. यांनी या महोत्सवामागील भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या, “स्थानिक कलाकारांची कला त्यांच्या भागातील संस्कृतीची ओळख करून देत असते. ठाण्यातील गावदेवी मैदानावर होणाऱ्या ‘नादोत्सवम’च्या कार्यक्रमातून पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा यांच्या तारपा वादनाचा अनुभव प्रेक्षकांना घेता येणार आहे. अशा कलाकारांच्या कलेला मोठ्या मंचावर सादर करण्याची संधी मिळणं महत्त्वाचं आहे. आपल्या लोकपरंपरेतील या कलांचा अनुभव अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा आणि त्यांची ओळख नव्या पिढीलाही व्हावी, हा या कार्यक्रमामागचा आमचा उद्देश आहे.”

अभंगांना आधुनिक संगीताची जोड

यूथ बिझनेस हेड अलंकार पाठारे यांनी ‘अभंग रिपोस्ट’च्या संकल्पनेविषयी सांगितले. ते म्हणाले, “‘अभंग रिपोस्ट’च्या माध्यमातून अभंगांना आजच्या संगीताची जोड देण्याचा आमचा प्रयत्न आहे. या ‘नादोत्सवम’च्या प्रवासात मोलाची साथ आणि सहकार्य दिल्याबद्दल अस्तित्व थिएटरचे आभार! आजच्या तरुणांना संगीताच्या वेगवेगळ्या शैली अनुभवायला आवडतात. त्यांच्यापर्यंत अभंग पोहोचवताना त्यातील भाव आणि अर्थ कायम ठेवून त्यांची आधुनिक मांडणी करता येते, हे ‘अभंग रिपोस्ट’मधून अनुभवायला मिळेल. ‘नादोत्सवम’सारख्या मंचावर पारंपरिक भक्ती-संगीत आणि आजच्या संगीतशैली एकत्र येणं, ही कलाकारांसाठी आणि प्रेक्षकांसाठीही एक वेगळी संधी आहे.”

Sachin Pilgaonkar: सचिन पिळगांवकरांची ट्रोलिंगसाठी अँकरने मागितली माफी; अभिनेता म्हणाले, ‘लेव्हल सोडू नये’

लोककला आणि भक्ती-संगीताचा अनोखा उत्सव

३१ ऑक्टोबर रोजी ठाण्यातील गावदेवी मैदानापासून सुरू होणारा ‘नादोत्सवम २०२६’ हा महोत्सव महाराष्ट्राच्या लोककला आणि भक्ती-संगीताला नवे व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे. पारंपरिक कलांचा वारसा जपतानाच स्थानिक कलाकारांची कला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे आणि नव्या पिढीला या सांस्कृतिक परंपरेची ओळख करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

Madhuri Dixit: ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर लॉलीची एन्ट्री; माधुरी दीक्षितने केली भन्नाट नक्कल, व्हिडीओ व्हायरल

Web Title: Nadotsavam 2026 thane bhiklya dhinda abhang repost ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2026 | 02:00 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi show
  • thane

संबंधित बातम्या

Sachin Pilgaonkar: सचिन पिळगांवकरांची ट्रोलिंगसाठी अँकरने मागितली माफी; अभिनेता म्हणाले, ‘लेव्हल सोडू नये’
1

Sachin Pilgaonkar: सचिन पिळगांवकरांची ट्रोलिंगसाठी अँकरने मागितली माफी; अभिनेता म्हणाले, ‘लेव्हल सोडू नये’

Madhuri Dixit: ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर लॉलीची एन्ट्री; माधुरी दीक्षितने केली भन्नाट नक्कल, व्हिडीओ व्हायरल
2

Madhuri Dixit: ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर लॉलीची एन्ट्री; माधुरी दीक्षितने केली भन्नाट नक्कल, व्हिडीओ व्हायरल

Tiger Shroff Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात नवा ट्विस्ट; प्रेमाचा अँगल समोर,राधा-कुणालच्या नात्याबाबत तपासात काय समोर आलं?
3

Tiger Shroff Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात नवा ट्विस्ट; प्रेमाचा अँगल समोर,राधा-कुणालच्या नात्याबाबत तपासात काय समोर आलं?

Ranbir Kapoor: ‘माझी जीभ घसरली…’;‘रामायण’च्या इव्हेंटमध्ये रणबीर कपूरकडून चूक? वक्तव्यानंतर अभिनेत्याने मागितली माफी
4

Ranbir Kapoor: ‘माझी जीभ घसरली…’;‘रामायण’च्या इव्हेंटमध्ये रणबीर कपूरकडून चूक? वक्तव्यानंतर अभिनेत्याने मागितली माफी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.