Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maitreya Movie: चार मित्र, बदलती नाती अन् दडलेल्या भावना; ‘मैत्रेया’चं नवं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

Maitreya Movie: क्रांती रेडकर वानखेडे यांच्या ‘मैत्रेया’ चित्रपटाचं नवं पोस्टर रिलीज झालं आहे. समर, आयुषी, स्काय आणि रुचीच्या नात्यांची कथा २३ ऑक्टोबरला प्रेक्षकांसमोर येणार.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 26, 2026 | 02:17 PM
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Maitreya Movie:  मराठी सिनेसृष्टीत आगामी ‘मैत्रेया’ या चित्रपटाची सध्या चर्चा सुरू आहे. मैत्रीच्या नात्यातील बॉण्डिंग आणि त्यापलीकडे दडलेल्या भावनांचा वेध घेणाऱ्या या चित्रपटाचे नवे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. याआधीच्या पोस्टरमध्ये कलाकारांचे चेहरे समोर आले नव्हते. मात्र, नव्या पोस्टरमधून समर, आयुषी, स्काय आणि रुची या चार प्रमुख व्यक्तिरेखांची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आली आहे.

नव्या पोस्टरमध्ये चौघांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि त्यांच्यातील सहज नातं लक्ष वेधून घेत आहे. एकमेकांमधील जवळीक, मस्ती आणि मैत्रीचा सुंदर बॉण्ड पोस्टरमधून जाणवतो. पोस्टरसोबत ऐकू येणारे ‘मैत्रीच्या पल्याड हा मैत्रेया…’ हे शब्दही उत्सुकता वाढवत आहेत.

या टॅगलाइनमधून ‘मैत्रेया’ हा केवळ मैत्रीवर आधारित चित्रपट नसून, मैत्रीच्या पलीकडे जाऊन नात्यांमधील भावनिक गुंतागुंत उलगडणारा असल्याचे संकेत मिळतात. मैत्री, जवळीक आणि त्यातून निर्माण होणाऱ्या भावनांचा प्रवास चित्रपटात नेमका कसा मांडला आहे, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

क्रांती रेडकर वानखेडे घेऊन येणार नवी प्रेमकथा

‘काकण’नंतर लेखिका-दिग्दर्शिका क्रांती रेडकर वानखेडे पुन्हा एकदा नव्या प्रेमकथेसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘मैत्रेया’मधील कलाकारांचे लूक आधुनिक आणि जेन-झी पिढीला साजेसे असले, तरी चित्रपटाची कथा आणि पार्श्वभूमी मध्यमवर्गीय मुळांशी जोडलेली आहे.

त्यामुळे मॉडर्न दिसणाऱ्या या व्यक्तिरेखांच्या आयुष्यातील नाती, भावना आणि अनुभव प्रेक्षकांना आपलेसे वाटण्याची शक्यता आहे. आधुनिक जीवनशैली आणि भावनिक नात्यांचा सुंदर मेळ या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.

पंकज पाडघन यांचे संगीत ठरणार खास

‘मैत्रेया’ची आणखी एक महत्त्वाची बाजू म्हणजे संगीतकार पंकज पाडघन यांचे संगीत. चित्रपटाच्या कथेला आणि भावविश्वाला साजेसे संगीत या चित्रपटाच्या अनुभवात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

क्रांती रेडकर वानखेडे यांनी सांगितले की, समर, आयुषी, स्काय आणि रुची यांच्यातील नातं ही चित्रपटाच्या कथेची महत्त्वाची बाजू आहे. मैत्रीचं नातं वरकरणी सहज वाटत असलं, तरी त्यात अनेक भावना आणि अनुभव दडलेले असतात. याच नात्याचा वेगळा प्रवास ‘मैत्रेया’मधून प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Kuku Kohli Died: वयाच्या ७७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, कशी झाली होती अरूणा इराणींबरोबर भेट; Love Story जन्मभर दिली साथ

तरुणांसोबतच संपूर्ण कुटुंबासाठी चित्रपट

निर्माते मनोज खळतकर यांच्या मते, ‘मैत्रेया’ हा केवळ तरुणाईला डोळ्यांसमोर ठेवून बनवलेला चित्रपट नाही. आजच्या पिढीच्या भावविश्वासोबतच कुटुंबातील प्रत्येक सदस्याला आपलासा वाटेल, अशा पद्धतीने चित्रपटाची कथा मांडण्यात आली आहे.

मनोरंजनासोबतच नात्यांकडे पाहण्याचा सुंदर आणि सहज दृष्टिकोन या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. त्यामुळे तरुणांसोबतच संपूर्ण कुटुंबाने हा चित्रपट एकत्र पाहावा, अशी निर्मात्यांची इच्छा आहे.

‘मैत्रेया’चे सहनिर्माते अमन खळतकर आहेत. येत्या २३ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Marathi Serial: शांभवीचा डाव उलटणार? अनिकेत-छवीच्या घरवापसीने ‘मी जिंकून घेईन सारं’मध्ये मोठा ट्विस्ट

Web Title: Maitreya movie new poster kranti redkar wankhede release date

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 02:17 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi movie

संबंधित बातम्या

Raksha Bandhan 2026: राखीच्या धाग्यापलीकडचं नातं! झी मराठीच्या कलाकारांनी सांगितल्या भावंडांसोबतच्या खास आठवणी
1

Raksha Bandhan 2026: राखीच्या धाग्यापलीकडचं नातं! झी मराठीच्या कलाकारांनी सांगितल्या भावंडांसोबतच्या खास आठवणी

Kriti Sanon Raksha Bandhan Ad: वादानंतर क्रिती सेननची रक्षाबंधन जाहिरात हटवली; कपड्यांवरून झाला होता मोठा वाद
2

Kriti Sanon Raksha Bandhan Ad: वादानंतर क्रिती सेननची रक्षाबंधन जाहिरात हटवली; कपड्यांवरून झाला होता मोठा वाद

Marathi Serial: शांभवीचा डाव उलटणार? अनिकेत-छवीच्या घरवापसीने ‘मी जिंकून घेईन सारं’मध्ये मोठा ट्विस्ट
3

Marathi Serial: शांभवीचा डाव उलटणार? अनिकेत-छवीच्या घरवापसीने ‘मी जिंकून घेईन सारं’मध्ये मोठा ट्विस्ट

Kuku Kohli Died: वयाच्या ७७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, कशी झाली होती अरूणा इराणींबरोबर भेट; Love Story जन्मभर दिली साथ
4

Kuku Kohli Died: वयाच्या ७७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, कशी झाली होती अरूणा इराणींबरोबर भेट; Love Story जन्मभर दिली साथ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.