
अशोक खरातवर ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Maharashtra Epstein Files Movie Second Teaser: भोंदूबाबा अशोक खरात काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात चांगलेच गाजले होते. आपण विद्या प्राप्त बाबा असून सामान्य नागरिकांची फसवणूक करणाऱ्या अशोक खरातवर ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा पहिला टीझ प्रेक्षकांच्या भेटीस आला. निर्मात्यांनी आता चित्रपटाचा दुसरा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे. टीझर प्रदर्शित झाल्यानंतर काही वेळांता सोशलमीडियावर चांगलीच खळबळ उडवली आहे. “कोणाच्या डोक्यावर बॉम्ब लागणार?” या प्रश्नासोबत शेअर करण्यात आलेल्या या टीझरमध्ये सुरुवातीपासूनच रहस्य आणि तणाव जाणवतो.
टीझरमध्ये एका महिलेच्या अंगात काहीतरी आल्याचा प्रसंग दाखवण्यात आला आहे.त्यानंतर अभिनेत्री दिपाली सय्यद यांची दमदर एन्ट्री पाहायला मिळाली. दरम्यान या चित्रपटामध्ये त्या कोणती भूमिका साकरणार आहेत.याबाबत प्रेक्षकांना उत्सुकता आहे. त्यानंतर अभिनेत्री दिपाली सय्यद यांची दमदार झलक पाहायला मिळते. त्यामुळे चित्रपटात त्यांची भूमिका नेमकी काय असणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
टीझरमधील आणखी एका सिनेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ते म्हणजे पैशांनी भरलेली कारची डिक्की तसेच धक्कादायक दृश्य म्हणजे मंदिरात घडताना दिसतं आहे. दिपाली सय्यद यांनी साकारलेल्या पात्राने स्वत:ची अनामिका कापल्याचा प्रसंग दाखवण्यात आले आहे. या काही सेकंदाच्या दृश्याने चित्रपट किती रहस्यमय असेल यांची जाणीव करुन देणारा आहे. अशोक खरात यांच्याबद्दल त्यांच्या समर्थकांकडून दैवी शक्ती असल्याचे दावे केले जात होते. दुसरीकडे त्यांच्या कार्यपद्धतीवर आणि कथित चमत्कारांवर अनेक प्रश्नही उपस्थित झाले होते. त्यामुळे या सिनेमात श्रद्धा, अंधविश्वास, पैसा आणि सत्तेचे संबंध कशा पद्धतीने मांडले जाणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. Maharashtra Epstein Files Movie:
चित्रपटाची कथा केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित नसून तिचा संबंध महाराष्ट्रातील राजकीय वातावरणाशीही जोडला जात असल्याचे संकेत टीझरमधून मिळतात. त्यामुळे सिनेमातील प्रत्येक पात्र आणि त्यामागची पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान, पहिला टीझर प्रदर्शित झाल्यानंतर दिपाली सय्यद यांनीही या प्रोजेक्टबद्दल भाष्य केलं होतं. हा विषय नेहमीच्या सिनेमांपेक्षा वेगळा असून त्यात अनेक कलाकार सहभागी असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. कथेमध्ये काही राजकीय व्यक्तिरेखांचाही सहभाग असल्याचे संकेत त्यांनी दिले होते. त्यामुळे पडद्यावर कोणाची भूमिका कोण साकारणार, याकडेही प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान दिपाली सय्यद यांना धमकीचे फोन आल्याची माहितीही समोर आली होती. त्यावेळी त्यांनी पुन्हा फोन आल्यास पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं होतं. सुरक्षेच्या दृष्टीने शूटिंगच्या ठिकाणी गार्डही ठेवण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. म्हणूनच ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच चर्चेत आला आहे. दुसऱ्या टीझरने कथेबद्दल अनेक प्रश्न उभे केले आहेत, पण त्यांची उत्तरं मात्र अद्याप गुलदस्त्यात आहेत. श्रद्धा की अंधश्रद्धा, सत्य की बनावटपणा आणि या सगळ्यामागे नेमकं कोण आहे, याचा उलगडा चित्रपटात होणार का, हे पाहणं रंजक ठरेल. ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ हा चित्रपट २ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अशोक खरात हे नाशिकमधील स्वतःला ज्योतिषी, आध्यात्मिक गुरु आणि ‘कॅप्टन’ म्हणवून घेणारे व्यक्ती आहेत.मागील काही दिवसांपूर्वी अशोक खरातचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर हे प्रकरण बाहे आले. भोंदूबाबा म्हणून सामान्य नागरिकांची फसवणूक करत होते. त्याच्याविरोधात २०२६ मध्ये अनेक गंभीर तक्रारी आणि गुन्हे समोर आले. मात्र, यातील आरोप अद्याप तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेत आहेत; त्यामुळे आरोपांना सिद्ध तथ्य म्हणून पाहता कामा नये.