Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आली रे आली मराठी सिनेमाची वेळ आली! Ghabadkund सिनेमाचा दुसरा आठवडा, कमाई जाणून व्हाल अवाक

मराठी, हिंदी आणि हॉलिवूडमधील मोठ्या चित्रपटांच्या स्पर्धेतही 'घबाडकुंड' ने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत दुसऱ्या आठवड्याच्या अखेरीस ८.१० कोटी रुपयांची कमाई केली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 03, 2026 | 08:44 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

मराठी, हिंदी आणि हॉलिवूडमधील मोठ्या चित्रपटांच्या तगड्या स्पर्धेतही ‘घबाडकुंड’ ने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. रहस्य, थरार आणि भयाचा अनोखा संगम असलेल्या या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. दुसऱ्या आठवड्याच्या अखेरीस चित्रपटाने ८.१० कोटी रुपयांची कमाई करत उल्लेखनीय यशाची नोंद केली असून, तिसऱ्या आठवड्यातही त्याची यशस्वी घोडदौड कायम आहे.

महेश भट्ट यांचा मोठा निर्णय! आता पुन्हा कधीही दिग्दर्शन करणार नाहीत; सांगितलं ठोस कारण

‘राजा शिवाजी’, ‘तुंबाडची मंजुळा’, ‘देऊळ बंद’ या मराठी चित्रपटांसह हिंदी आणि हॉलिवूडमधील अनेक बिग बजेट चित्रपट प्रदर्शित असतानाही ‘घबाडकुंड’ ने आपल्या वेगळ्या आशयाच्या आणि प्रभावी मांडणीच्या जोरावर स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. अनेक चित्रपटगृहांमध्ये हाऊसफुल शो सुरू असून, प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कायम असल्याचे चित्र दिसत आहे.

चित्रपटातील उत्कंठावर्धक कथा, प्रभावी दिग्दर्शन, कलाकारांचा दमदार अभिनय, पार्श्वसंगीत, तांत्रिक मांडणी आणि रहस्यपूर्ण वातावरण यामुळे सर्व स्तरांतून चित्रपटाचे भरभरून कौतुक होत आहे. सकारात्मक ‘वर्ड ऑफ माऊथ’मुळे अनेक ठिकाणी शोची संख्या वाढवण्यात आली असून, आगाऊ तिकीट बुकिंगलाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

कुटुंबासह, मित्रमंडळींसोबत आणि ग्रुप बुकिंगद्वारे मोठ्या संख्येने प्रेक्षक चित्रपटगृहांकडे वळत आहेत. तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्मवरही चित्रपटाला उत्कृष्ट रेटिंग मिळत असून, सोशल मीडियावर ‘घबाडकुंड’ची जोरदार चर्चा रंगली आहे. या यशामुळे दर्जेदार मराठी चित्रपटांबद्दल प्रेक्षकांचा वाढता विश्वासही अधोरेखित झाला आहे.

महाराष्ट्राची हास्यजत्रेच्या नावाने पसरवली जातेय अश्लीलता? अखेर सचिन गोस्वामी बोललेच! पोस्ट करत दिली संपूर्ण माहिती

‘आयकॉन द स्टाईल’चे निर्माते डॉ. रसिक कदम निर्मित आणि प्रीतम एस. के. पाटील दिग्दर्शित ‘घबाडकुंड’ हा चित्रपट तिसऱ्या आठवड्यातही प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. रहस्य आणि थराराचा वेगळा अनुभव घेण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने चित्रपटगृहांकडे वळत असून, आगामी दिवसांतही चित्रपटाची यशस्वी घोडदौड कायम राहील, असा विश्वास चित्रपटाच्या संपूर्ण टीमने व्यक्त केला आहे.

Web Title: Second week performance of ghabadkund

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 08:44 PM

Topics:  

  • marathi cinema
  • zee cinema

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.