फोटो सौजन्य - Social Media
संपूर्ण महाराष्ट्र भरात महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी TV Show साठी एक विशिष्ट प्रेम आहे. या Show मध्ये कार्यक्रात विनोदवीरांचे चाहते जगभरात पसरले आहेत. याचा नमुना म्हणजे या कलाकारांचे अधूनमधून होणारे परदेश दौरे! अशामध्ये कार्यक्रमाचे लेखक सचिन गोस्वामी यांनी चिंता जाहीर केली आहे. त्यांच्या मनात कार्यक्रमासंदर्भात एक खंत आहे. ते म्हणतात की महाराष्ट्राची हास्यजत्रेच्या नावाने अनेक यूट्यूब चॅनेल किंवा इतर सोशल मीडिया हॅन्डल त्यांचे पोट भरत आहेत. परंतु त्यांचा आक्षेप असा आहे की बहुतेक लोक ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ चा कंटेंट Sony Marathi किंवा Show कडून कोणतीही परवानगी न घेता पोस्ट करत आहेत आणि Views वाढवण्यासाठी अश्लील Thumbnail चा वापर करत आहेत. एका Facebook च्या माध्यमातून त्यांनी हा आरोप केला आहे.
सचिन गोस्वामी यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे की, “विकृतीचा कळस… गेल्या ८ वर्षांपासून ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ हा कार्यक्रम सोनी मराठीवर प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. आता या कार्यक्रमाने १००० भागांचा ऐतिहासिक टप्पा गाठला असून जगभरातील मराठी प्रेक्षकांचे प्रेम मिळवले आहे. सध्या या कार्यक्रमाचे अनेक भाग सोनी मराठीच्या अधिकृत यूट्यूब चॅनेल आणि पोर्टलवर उपलब्ध आहेत. मात्र, काही इतर यूट्यूब चॅनेल्स अधिकृत अथवा अनधिकृत पद्धतीने हे भाग प्रसारित करून त्यातून आर्थिक लाभ घेत आहेत. यापैकी काही चॅनेल्स प्रेक्षकांचे लक्ष वेधण्यासाठी अत्यंत अश्लील आणि दिशाभूल करणारे थंबनेल व कॅप्शन वापरत आहेत. हा प्रकार अत्यंत निषेधार्ह असून कार्यक्रमाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणारा आहे. ज्या दर्जेदार कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वतःचा फायदा करून घेतला जातो, त्याच कार्यक्रमाची अशा पद्धतीने बदनामी करणे अत्यंत दुर्दैवी आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ दर्जेदार आणि कौटुंबिक मनोरंजन देण्यासाठी कायम कटिबद्ध आहे. त्यामुळे अशा थंबनेल्स किंवा कॅप्शनच्या आधारे कार्यक्रमाच्या गुणवत्तेबाबत कोणताही गैरसमज करून घेऊ नये, ही सर्व प्रेक्षकांना नम्र विनंती. संबंधितांनी हे प्रकार तातडीने थांबवावेत. तसेच, अशा प्रकारचे आक्षेपार्ह थंबनेल किंवा कॅप्शन असलेले व्हिडिओ आढळल्यास कृपया ते रिपोर्ट करून सहकार्य करावे. धन्यवाद.”
सचिन गोस्वामी यांची पोस्ट पाहून महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रमाच्या अनेक चाहत्यांनी त्यांच्याशी कमेंट्सच्या माध्यमातून संपर्क साधला आहे. त्यांनी सचिन गोस्वामी तसेच संपूर्ण टीमला धीर दिला आहे की “अशा गोष्टींना सुजाण प्रेक्षक म्हणून आम्हीही दुर्लक्षित करू आणि तुम्ही अशा गोष्टींकडे फारसे लक्ष देऊ नका.”






