Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 20 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भूषण प्रधानच्या आयुष्यातील ‘स्वप्नसुंदरी’ कोण? २४ जुलैला उलगडणार रहस्य; टीझरने वाढवली उत्सुकता

स्वप्नसुंदरी या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. चित्रपटात भूषण प्रधान ‘राघव’ तर सायली पाटील ‘मानसी’च्या भूमिकेत झळकणार आहेत. योग्य जोडीदाराच्या शोधात असलेल्या राघवच्या आयुष्यात मानसीची एंट्री होताच कथेला नवे वळण मिळते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 06, 2026 | 03:24 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

लग्न, नातेसंबंध आणि योग्य जोडीदाराच्या शोधाभोवती फिरणारी कथा असलेला स्वप्नसुंदरी हा नवा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रेडबेल मीडिया आणि पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटाचा टीझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला असून त्याने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे. कौटुंबिक मनोरंजन, विनोद आणि भावनिक नात्यांचा सुरेख संगम असलेला हा चित्रपट २४ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

Shilpa Shinde: शिल्पा शिंदेच्या खोट्या लैंगिक छळ प्रकरणावर AICWA निवेदन जारी, थेट मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी

चित्रपटात अभिनेता भूषण प्रधान ‘राघव’ ही मध्यवर्ती भूमिका साकारताना दिसणार आहे. आपल्या आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे ‘चॉकलेट बॉय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भूषणला या चित्रपटात एका वेगळ्याच भूमिकेत पाहायला मिळणार आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री सायली पाटील ‘मानसी’च्या भूमिकेत झळकणार असून या नव्या जोडीची केमिस्ट्री टीझरमधूनच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये राघवच्या लग्नासाठी सुरू असलेल्या मुलगी पाहण्याच्या प्रवासाची मजेशीर झलक पाहायला मिळते. योग्य जोडीदाराच्या शोधात असलेला राघव अनेक मुलींना भेटत असतो, मात्र त्याच्या मनात एका आदर्श जीवनसाथीचे चित्र कायम असते. या प्रवासात त्याच्या आयुष्यात मानसीची एंट्री होते आणि कथेला वेगळे वळण मिळते. मानसी आणि राघव यांच्यात प्रेम फुलेल का? तीच त्याच्या मनातील ‘स्वप्नसुंदरी’ ठरेल का? याची उत्तरे मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच मिळणार आहेत.

चित्रपटाचे दिग्दर्शक अक्षय जयसिंगराव शिंदे यांनी सांगितले की, आजच्या पिढीसाठी लग्न आणि योग्य जोडीदाराची निवड हा अत्यंत महत्त्वाचा, पण तितकाच गुंतागुंतीचा विषय बनला आहे. याच विषयाला हलक्या-फुलक्या आणि मनोरंजक पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. भूषण प्रधानने साकारलेला राघव अनेक तरुणांना स्वतःशी जोडून घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

*स्वप्नसुंदरी* या चित्रपटाचे निर्माते सतीश महादेव गेजगे असून दिग्दर्शनासह कथा आणि पटकथा लेखनाची जबाबदारी अक्षय जयसिंगराव शिंदे यांनी सांभाळली आहे. दर्शना सतीश गेजगे आणि निलेश सुरेश अग्रवाल हे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. तर संगीतकार अंकुश बोरडकर यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे.

Neha Kakkar Birthday: आर्थिक तंगी, 4 वर्ष गात राहिली भजन; शो मधून बाहेर पण झाली त्याच शो ची परीक्षक, नेहा कक्करचा प्रवास

राघवच्या आयुष्यातील ‘स्वप्नसुंदरी’ कोण ठरणार आणि त्याच्या लग्नाचा प्रवास नेमका कोणत्या दिशेने जाणार, याची उत्सुकता आता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे. मनोरंजन, विनोद आणि भावनांचा मेळ असलेला हा चित्रपट २४ जुलै रोजी रुपेरी पडद्यावर दाखल होणार आहे.

Web Title: Swapna sundari latest marathi film of bhushan pradhan teaser out

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 03:24 PM

Topics:  

  • Bhushan Pradhan
  • latest movies

संबंधित बातम्या

Samarth Teaser Out: समर्थ रामदास स्वामींच्या प्रेरणादायी विचारांना आधुनिक स्पर्श; ‘समर्थ’ चित्रपटाचा बहुप्रतीक्षित टीझर प्रदर्शित
1

Samarth Teaser Out: समर्थ रामदास स्वामींच्या प्रेरणादायी विचारांना आधुनिक स्पर्श; ‘समर्थ’ चित्रपटाचा बहुप्रतीक्षित टीझर प्रदर्शित

के. सी. बोकाडिया यांचा सिनेमा येतोय! ‘Teesri Begum’ सिनेमा ‘या’ तारेखपासून होतोय लाँच, कोणता OTT? जाणून घ्या
2

के. सी. बोकाडिया यांचा सिनेमा येतोय! ‘Teesri Begum’ सिनेमा ‘या’ तारेखपासून होतोय लाँच, कोणता OTT? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.