
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Frame Movie: मराठी चित्रपट ‘फ्रेम’ सध्या प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. चित्रपटाने आपल्या वेगळअया कथानकामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. १० जुलै रोजी Zee5 वर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची दिग्दर्शन विक्रम पटवर्धन यांनी केले आहे. ‘फ्रेम’ ही एका छायाचित्रकाराच्या आयुष्याभोवती फिरणारी हृदयस्पर्शी कथा आहे. व्यावसायिक जबाबदारी, नैतिकता आणि माणुसकी यांच्यातील संघर्ष या चित्रपटातून प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.दरम्यान, चित्रपटाच्या यशाबरोबरच दिग्दर्शक विक्रम पटवर्धन यांनी शूटिंगदरम्यान घडलेला BTS (Behind The Scenes)एक रंजक आणि यापूर्वी कधीही न सांगितलेला किस्सा
सांगितला आहे.
चित्रपटाची कथा
चित्रपटाची कथा पुण्यातील एका वृत्तपत्रासाठी काम करणाऱ्या दोन फोटोपत्रकारांभोवती फिरते. एक अनुभवी चंदू पानसरे तर दुसरा नवख्या सिद्धार्थ देशमुख ( अमेय वाघ) चंदूचा विश्वास आहे की, कोणत्याही भावनेशिवाय सत्य कॅमेऱ्यात टिपणे म्हणेज फोटोग्राफरचे काम. तर सिद्धरर्थ नेहमी माणुसकीला प्राधान्य देतो. मात्र, खरा ट्विस्ट तेव्हा येतो, जेव्हा एक विनाशकारी भूकंप होतो आणि त्यांच्या भिन्न दृष्टिकोनांची व तत्त्वांची कसोटी लागते. हे पाहणे खूपच रंजक आहे. दरम्यान, चित्रपटाच्या दिग्दर्शकाने शूटिंगदरम्यानचा एक खास किस्सा सांगितला आहे.
Bigg Boss 20: ‘बिग बॉस 20’चा बिगुल वाजलं! मेकर्सने शेअर केला खास व्हिडीओ, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
त्याच दिवशी माझी खात्री पटली- विक्रम पटवर्धन
दिग्दर्शक विक्रम पटवर्धन यांनी नुकतेच सांगितले, “शूटिंगच्या तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी, आम्ही नागराज दादा आणि अमेय यांच्यातील एक अत्यंत तीव्र आणि भावनिक दृश्याचे शूटिंग केले. सहसा, आम्ही सुरुवातीच्या दिवसांमध्ये हलकीफुलके सीन शूट करत होतो, परंतु लोकेशनमुळे आम्हाला काही सीन आधी शूट करावे लागले. हा सीन चित्रपटाच्या क्लायमॅक्सच्या अगदी आधी येतो.” विक्रम यांनी पुढे स्पष्ट केले, “सुरुवातीला मी थोडा घाबरलो होतो, कारण इतके गंभीर सीन इतक्या लवकर करणे सोपे नसते. पण ज्या प्रकारे दोन्ही कलाकारांनी अभिनय केला, त्याने सेटवरील सर्वांना चकित केले. त्याच दिवशी माझी खात्री पटली की या चित्रपटासाठी नागराज आणि अमेय यांची निवड करणे हा योग्य निर्णय होता.”
चित्रपटातील स्टार कास्ट
चित्रपटात नागराज मंजुळे, अमेय वाघ, मुग्धा गोडसे आणि अक्षया गुरव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नागराज मंजुळे यांनी वरिष्ठ छायाचित्रकार चंदू पानसरे, अमेय वाघ यांनी सिद्धार्थ देशमुख, अक्षया गुरव यांनी पत्रकार रागिणी, तर मुग्धा गोडसे यांनी चंदू पानसरे यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.