Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Zee Short Film Contest’ अंतिम टप्प्यात! नवोदित चित्रपट निर्मात्यांच्या प्रतिभेला मिळणार राष्ट्रीय व्यासपीठ

झीच्या ‘झी शॉर्ट फिल्म कॉन्टेस्ट’चा ग्रँड फिनाले लवकरच पार पडणार असून देशभरातील नवोदित चित्रपट निर्मात्यांचे लक्ष या सोहळ्याकडे लागले आहे. आठ भारतीय भाषांमध्ये आयोजित या स्पर्धेत तरुण क्रिएटर्सनी स्मार्टफोनवर तयार केलेल्या शॉर्ट फिल्म्स सादर केल्या आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 03, 2026 | 06:37 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

भारतातील अग्रगण्य कंटेंट आणि टेक्नॉलॉजी कंपनी झीच्या ‘झी शॉर्ट फिल्म कॉन्टेस्ट’चा ग्रँड फिनाले लवकरच रंगणार असून, देशभरातील नवोदित चित्रपट निर्मात्यांसाठी हा एक महत्त्वाचा क्षण ठरणार आहे. बहुभाषिक आणि राष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाने अल्पावधीतच नव्या कथाकारांना आपली कला सादर करण्यासाठी प्रभावी मंच उपलब्ध करून दिला आहे. यावर्षीच्या सुरुवातीला सुरू झालेल्या या स्पर्धेत भारतातील विविध भागांतील तरुण क्रिएटर्सनी स्मार्टफोनवर तयार केलेल्या शॉर्ट फिल्म्स सादर केल्या. आठ भारतीय भाषांमध्ये खुल्या असलेल्या या स्पर्धेमुळे विविध संस्कृती, प्रादेशिक पार्श्वभूमी आणि कथनशैलींना समान संधी मिळाली.

इच्छा पूर्ण करणारे App? OTTवरील या थरारक सीरिजने उडवली प्रेक्षकांची झोप; 8 एपिसोडची ही सस्पेन्सने भरलेली सीरिज पाहिलीत का?

स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी देशातील नामवंत दिग्दर्शक आणि चित्रपट निर्मात्यांचे परीक्षक मंडळ एकत्र आले आहे. अनुराग कश्यप, रवी जाधव, नाग अश्विन, सृजित मुखर्जी, पी. समुथिराकनी, हेमंत राव आणि लिजो जोस पेलिस्सेरी हे या उपक्रमाचे परीक्षक आहेत. ग्रँड फिनालेमध्ये हे सर्व मान्यवर ज्येष्ठ चित्रपट पत्रकार राजीव मसंद यांच्यासोबत विशेष चर्चासत्रात सहभागी होऊन भारतीय चित्रपटसृष्टीतील बदलते प्रवाह, प्रादेशिक कथांचे वाढते महत्त्व आणि सर्जनशीलतेच्या नव्या संधींवर चर्चा करणार आहेत.

मुंबईतील एका प्रतिष्ठित हॉटेलमध्ये होणाऱ्या या सोहळ्यात आठ भाषांतील विजेत्यांची घोषणा केली जाणार आहे. याशिवाय उत्कृष्ट चित्रपट, अभिनेता, लेखक, संपादक, सिनेमॅटोग्राफर, संगीतकार आणि विनोदी कलाकार अशा विविध श्रेणींतील पुरस्कारांचे वितरणही होणार आहे. या स्पर्धेतील निवडक चित्रपटांना झी5 तसेच झी नेटवर्कच्या विविध प्रादेशिक वाहिन्यांवर प्रदर्शित होण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे नवोदित चित्रपट निर्मात्यांना व्यापक प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचण्याची सुवर्णसंधी मिळेल. तसेच प्रत्येक भाषेतील विजेत्याला २ लाख रुपयांचे रोख पारितोषिकही प्रदान करण्यात येणार आहे.

Boong: न्यूयॉर्कमध्ये ‘बूंग’ची तिहेरी बाजी; इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये तीन पुरस्कारांवर कोरलं नाव

भारतीय कथाकथनातील वैविध्य, नव्या कल्पनांची ताकद आणि तरुण चित्रपट निर्मात्यांची सर्जनशीलता यांचा गौरव करणारा हा ग्रँड फिनाले भारतीय चित्रपटसृष्टीच्या भविष्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

Web Title: Zee short film contest enters final stage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 06:37 PM

Topics:  

  • zee marathi
  • Zee Talkies

संबंधित बातम्या

Sakshee Gandhi: ‘लज्जा से मरे रे…’, कलमकारी साडीत ‘इंदुराणी’ साक्षी गांधीचा कातिल लुक
1

Sakshee Gandhi: ‘लज्जा से मरे रे…’, कलमकारी साडीत ‘इंदुराणी’ साक्षी गांधीचा कातिल लुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.