Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mukkam Post Pandharpur: आषाढी एकादशीनिमित्त ‘मुक्काम पोस्ट पंढरपूर’ची घोषणा; विठ्ठलभक्ती आणि आत्मशोधाचा भावस्पर्शी प्रवास

Mukkam Post Pandharpur: आषाढी एकादशीनिमित्त 'मुक्काम पोस्ट पंढरपूर' या नव्या मराठी नाटकाची घोषणा करण्यात आली असून श्रद्धा, विठ्ठलभक्ती, नाती आणि आत्मशोधाचा भावस्पर्शी प्रवास रंगभूमीवर अनुभवायला मिळणार.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 29, 2026 | 02:24 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • रंगभूमीवर येतोय ‘मुक्काम पोस्ट पंढरपूर
  • मुक्काम पोस्ट पंढरपूर’ रंगभूमीवर उलगडणार अनोखा प्रवास
  • विठ्ठलभक्तांच्या मनाला भिडणाऱ्या नाटकाची घोषणा
Mukkam Post Pandharpur: आषाढी एकादशीच्या (aashadhi ekadashi) पावन मुहूर्तावर एका नव्या आशयघन मराठी नाटकाची घोषणा करण्यात आली आहे. ‘मुक्काम पोस्ट पंढरपूर’ (Mukkam Post Pandharpur)हे नाटक लवकरच रंगभूमीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, श्रद्धा, अध्यात्म, नाती आणि आत्मशोधाचा प्रवास उलगडणारी ही कलाकृती असल्याचे पहिल्या पोस्टरवरून स्पष्ट होत आहे.

श्रद्धा, संघर्ष आणि आत्मशोधाचा वेध घेणारं नाटक

“पंढरीची वाट संपत नाही… ती प्रत्येक पावलागणिक नव्याने सुरू होते,” या अर्थपूर्ण ओळींसह प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये एका प्रवाशाचा पंढरीकडे सुरू असलेला प्रवास आणि विठ्ठलाच्या विराट रूपाचे प्रतीकात्मक दर्शन घडते. त्यामुळे हे नाटक केवळ पंढरपूरच्या वारीपुरते मर्यादित नसून, प्रत्येकाच्या अंतर्मनातील श्रद्धा, संघर्ष आणि आत्मशोधाचा वेध घेणारे असेल, अशी उत्सुकता निर्माण झाली आहे.

या नाटकाचे दिग्दर्शन अशुतोष पोपट जरे यांनी केले असून, डॉ. उमेश आजगावकर, नितीन प्रकाश वैद्य, सचिन सुभाष अवस्थी आणि स्वाती दिवे मुखर्जी यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. आशयपूर्ण कथानक, प्रभावी सादरीकरण आणि भावविश्वाचा सुरेख मिलाफ साधत हे नाटक प्रेक्षकांना वेगळा नाट्यअनुभव देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दिग्दर्शक अशुतोष पोपट जरे म्हणाले, “‘मुक्काम पोस्ट पंढरपूर’ ही केवळ पंढरीच्या वारीची कथा नाही, तर प्रत्येकाच्या अंतर्मनात सुरू असलेल्या प्रवासाची गोष्ट आहे. श्रद्धा, नाती, संघर्ष आणि आत्मशोध यांचा वेध घेणारा हा अनुभव रंगभूमीवर साकारताना प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करणारी कलाकृती सादर करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

Rakhi Sawant On Kangana Ranaut: ‘कंगना रणौतचं तोंड घाणेरडं; पुन्हा चापट बसेल!’ राखी सावंतचा संताप, चारित्र्यावरही साधला निशाणा

निर्माते सचिन अवस्थी म्हणाले, “मराठी रंगभूमीवर दर्जेदार आणि आशयपूर्ण कलाकृती सादर करण्याची समृद्ध परंपरा आहे. त्याच परंपरेला साजेशी कलाकृती म्हणून ‘मुक्काम पोस्ट पंढरपूर’ प्रेक्षकांसमोर आणत आहोत. हे नाटक प्रेक्षकांना भावनिक आणि आध्यात्मिक पातळीवर नक्कीच जोडेल, असा आम्हाला विश्वास आहे.”

रंगप्रेमी आणि विठ्ठलभक्तांमध्ये नाटकाविषयी विशेष उत्सुकता 

आषाढी एकादशीच्या (aashadhi ekadashi) शुभदिनी झालेल्या या घोषणेनंतर रंगप्रेमी आणि विठ्ठलभक्तांमध्ये नाटकाविषयी विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे. श्रद्धा, जीवनमूल्ये आणि अंतर्मनातील प्रवासाची अनुभूती देणारे ‘मुक्काम पोस्ट पंढरपूर’ हे नाटक लवकरच रंगभूमीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Assam Floods: ‘दरवर्षी हे घडतं, तरीही आपण…’; सलमाननंतर आलिया भट्टही आसाम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावली; केली खास विनंती

Web Title: Mukkam post pandharpur new marathi play announced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 02:17 PM

Topics:  

  • aashadhi ekadashi
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

Mary Kom Statement : मैरी कॉमच्या ‘त्या’ कमेंटवरून वाद; सानिया मिर्झा-सायना नेहवालवर बोलणं पडलं महागात, टीमने मागितली माफी
1

Mary Kom Statement : मैरी कॉमच्या ‘त्या’ कमेंटवरून वाद; सानिया मिर्झा-सायना नेहवालवर बोलणं पडलं महागात, टीमने मागितली माफी

Vedika Pinto Musafir Cafe: ‘मुसाफिर कैफे’मध्ये सुधाच्या भूमिकेतून वेदिका पिंटोने जिंकली मनं; जाणून घ्या ७ खास वैशिष्ट्यं
2

Vedika Pinto Musafir Cafe: ‘मुसाफिर कैफे’मध्ये सुधाच्या भूमिकेतून वेदिका पिंटोने जिंकली मनं; जाणून घ्या ७ खास वैशिष्ट्यं

Mithun Chakraborty Farmhouse: मिथुन चक्रवर्तींचं आलिशान फार्महाऊस पाहिलंत का? २२ श्वान अन् घरातच स्टुडिओ, पाहा खास झलक
3

Mithun Chakraborty Farmhouse: मिथुन चक्रवर्तींचं आलिशान फार्महाऊस पाहिलंत का? २२ श्वान अन् घरातच स्टुडिओ, पाहा खास झलक

४१व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार अभिनेत्री; १६ वर्षांनी घरात हलणार पाळणा, बेबी बंप फ्लॉन्ट करत दिली गुडन्यूज
4

४१व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार अभिनेत्री; १६ वर्षांनी घरात हलणार पाळणा, बेबी बंप फ्लॉन्ट करत दिली गुडन्यूज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.