Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘जोडीचा मामला’मधून नव्या कलाकारांची रंगभूमीवर एन्ट्री; विनोदातून मांडणार आजच्या नात्यांचं वास्तव

नव्या दमाच्या कलाकारांसह ‘जोडीचा मामला’ रंगभूमीवर सज्ज झाले आहे. तरुणाईच्या बदलत्या विचारांवर विनोदी शैलीत भाष्य करणारे हे नाटक आहे. Sachin Pilgaonkar यांनी नवोदित कलाकारांना दिल्या शुभेच्छा!

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 14, 2026 | 07:55 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

मराठी रंगभूमी सध्या नव्या विचारांनी, तरुणाईच्या ऊर्जेने आणि समकालीन विषयांनी अधिक समृद्ध होताना दिसत आहे. पारंपरिक कथानकांच्या चौकटी मोडून आजचे तरुण लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार मानवी नातेसंबंध, बदलती सामाजिक मानसिकता आणि नव्या पिढीच्या भावविश्वावर आधारित वेगळे प्रयोग रंगमंचावर साकारत आहेत. अशाच नव्या विचारांच्या वाटेवरून येणारं ‘जोडीचा मामला’ हे दोन अंकी विनोदी नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्माते राहुल भंडारे आणि श्रेयस इंदापूरकर यांनी नवोदित कलाकारांना व्यासपीठ देत या नाटकाची निर्मिती केली आहे.

Sandeep Khare : “अहो सासरेबुबा” ! संदिप खरेच्या जावयाची खास वाढदिवसानिमित्ताने खास पोस्ट, म्हणाला माझ्यासारखे…

या नाटकाची पत्रकार परिषद नुकतीच पार पडली. यावेळी प्रसिद्ध अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक Sachin Pilgaonkar यांनी उपस्थित राहून संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. नव्या कलाकारांमुळे रंगभूमीवर ताजी ऊर्जा निर्माण होते आणि मराठी नाट्यव्यवसायासाठी हे सकारात्मक पाऊल असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

‘दृष्टी’ आणि ‘अद्वैत थिएटर्स’ निर्मित ‘जोडीचा मामला’ या नाटकाची टॅगलाईन आहे “Black & White कुटुंबाची सप्तरंगी गोष्ट!” शुक्रवार १५ मे रोजी दुपारी ४.३० वाजता ठाण्यातील Gadkari Rangayatan येथे या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रंगणार आहे. बदलती कौटुंबिक नाती, तरुणाईचा आत्मकेंद्रित दृष्टिकोन आणि त्यातून निर्माण होणारे विनोदी प्रसंग यावर हलक्याफुलक्या शैलीत भाष्य करणारे हे नाटक प्रेक्षकांना मनोरंजनासोबत विचार करायलाही भाग पाडणार आहे.

निर्माते राहुल भंडारे यांनी सांगितले की, “आजच्या तरुण पिढीचे विचार आणि नात्यांकडे पाहण्याचा बदलता दृष्टिकोन हलक्या-फुलक्या शैलीत मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे. नव्या कलाकारांना संधी देत दर्जेदार मनोरंजन सादर करण्याचा आमचा प्रयत्न प्रेक्षकांना नक्की आवडेल.” दिग्दर्शक श्रेयस इंदापूरकर यांनीही हे नाटक समाजातील वास्तव विनोदातून मांडणारे असून प्रत्येक पात्र प्रेक्षकांना स्वतःशी जोडून घेईल, असे सांगितले.

NEET Paper Leak : Atul Kulkarni यांनी सरकारला लगावला टोला! NEET पेपरफुटीवर केली Sarcastic Post; “गाळलेल्या जागा…”

या नाटकात योगेश कदम, प्राची कात्रे, पायल साळुंके, वैभव महाले, विशाल दुराफे, अश्विनी माळी, विनायक जाधव, प्रदीप कसबे, श्वेता काजळे, अभिजीत पाटसकर, आकाश राठोड, दुर्गेश लांडगे आणि श्रेयस इंदापूरकर हे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत. नाटकाचे लेखन आणि संगीत चैतन्य कुलकर्णी यांचे असून दिग्दर्शन श्रेयस इंदापूरकर यांनी केले आहे. अवधूत गुप्ते, श्रद्धा आपटे-केळकर आणि युगंधर देशमुख यांच्या आवाजातील गाण्यांमुळे नाटकाला विशेष रंगत आली आहे. ठाण्यानंतर या नाटकाचे प्रयोग कल्याण, वाशी, दादर आणि माटुंगा येथेही रंगणार असून मराठी रंगभूमीवर नव्या कलाकारांचा हा ताजा प्रयोग प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.

Web Title: New actors enter the stage through jodicha maalam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 07:55 PM

Topics:  

  • sachin pilgaonkar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.