फोटो सौजन्य - Social Media
NEET पेपरफुटी प्रकरणावर अतुल कुलकर्णीची यांची पोस्ट
NEET पेपरफुटी प्रकरणासंदर्भात अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी संताप व्यक्त केला आहे. X पोस्टमध्ये त्यांनी नमूद केले आहे की,
“फुटलेल्या पेपर मधले नं सोडवलेले प्रश्न..
गाळलेल्या जागा भरा.
१- बोले तैसा ‘नं’ चाले त्याची ……. पाऊले.
अ- वंदावी
ब- पूजावी
क- ओळखावी
२- अति शहाणा त्याचा …….रिकामा
अ- बैल
ब- रेडा
क- पिंप
३- चकाकतं ते सगळंच …….नसतं
अ- ….
ब-….
क-….”
एकंदरीत, NEET पेपरमधील या न सोडवलेल्या प्रश्नांना शेअर करत त्यांनी सरकारला टोला लगावला आहे.
फुटलेल्या पेपर मधले नं सोडवलेले प्रश्न. गाळलेल्या जागा भरा. १- बोले तैसा ‘नं’ चाले त्याची ……. पाऊले.
अ- वंदावी
ब- पूजावी
क- ओळखावी २- अति शहाणा त्याचा …….रिकामा
अ- बैल
ब- रेडा
क- पिंप ३- चकाकतं ते सगळंच …….नसतं
अ- ….
ब-….
क-…. 1/2 — atul kulkarni (@atul_kulkarni) May 14, 2026
6 जणांना करण्यात आली अटक
NEET परीक्षा पेपरफुटी प्रकरणी देशभरात संतापाची लाट उसळली आहे. परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयामुळे पालक आणि विद्यार्थी चिताळले आहेत. परीक्षेच्या अवघ्या 42 तासांपूर्वी सदर प्रकार घडला. या प्रकरणात जयपूरमधून 3, गुरुग्राममधून 1, आहिल्यानगर जिल्ह्यातून 1 आणि नाशिकमधून 1, अशा 6 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पेपरफुटी प्रकणात शामिल असणाऱ्या प्रत्येकावर शासन मोठी कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.






