Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shubham Karoti Marathi Play: मुलांची स्वप्नं की आई-बाबांच्या अपेक्षा? ‘शुभं करोति’मधून उलगडणार घराघरातली गोष्ट

Shubham Karoti Marathi Play: घरातील प्रेम, अपेक्षा, स्वप्नं, मतभेद आणि काळजी याभोवती फिरणारं ‘शुभं करोति’ हे नवं मराठी नाटक १ ऑक्टोबरपासून रंगभूमीवर दाखल होत आहे. ‘नाटकातलं घर नाही… घराघरातलं नाटक…’ अशी ओळख असलेल्या या नाटकाची कथा एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबाभोवती फिरते.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 28, 2026 | 06:20 PM
Shubham Karoti Marathi Play_ मुलांची स्वप्नं (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Shubham Karoti Marathi Play_ मुलांची स्वप्नं (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘शुभं करोति’ नाटक १ ऑक्टोबरपासून रंगभूमीवर दाखल होणार.
  • मुलांची स्वप्नं आणि पालकांच्या अपेक्षांमधील संघर्षावर कथा आधारित.
  • अभिनय बेर्डे, अपूर्वा गोरे, सीमा देशमुख आणि हृषिकेश जोशी प्रमुख भूमिकेत.
 

घर म्हटलं की प्रेम, अपेक्षा, स्वप्नं, मतभेद आणि एकमेकांची काळजी हे सगळं आलंच. मुलांची स्वप्नं आणि पालकांच्या अपेक्षा यांच्यातली तारेवरची कसरत अनेक घरांमध्ये पाहायला मिळते. याच घराघरात घडणाऱ्या गोष्टींना रंगमंचावर घेऊन येत आहे ‘शुभं करोति’ हे नवं मराठी नाटक. ‘नाटकातलं घर नाही… घराघरातलं नाटक…’ अशी उत्सुकता वाढवणारी ओळख घेऊन येणारं हे नाटक १ ऑक्टोबरपासून रंगभूमीवर दाखल होत आहे. Shubham Karoti Marathi Play:

शरद अवस्थी हे नाटकाचे निर्माते

ब्ल्यू रॅम्प एन्टरटेन्मेंट, नितीन वैद्य प्रॉडक्शन्स आणि सरगम क्रिएशन्स निर्मित, रावेतकर प्रस्तुत या नाटकाचं लेखन वैभव जोशी यांनी केलं असून दिग्दर्शन भाग्येश रानडे यांचं आहे. श्रीरंग खापर्डे, सिद्धार्थ गोखले, नितीन प्रकाश वैद्य आणि राहुल शरद अवस्थी हे नाटकाचे निर्माते आहेत. enteriment news

‘शुभं करोति’ची कथा एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबाभोवती फिरणारी आहे. स्वतःच्या आयुष्याबद्दल आणि करिअरबद्दल वेगळी स्वप्नं पाहाणाऱ्या तरुण मुलाचा प्रवास, त्याच्या निर्णयांकडे पालक पाहातात त्या नजरेतून निर्माण होणारे प्रश्न आणि अपयशाच्या टप्प्यावर कुटुंबाची मिळणारी साथ, या सगळ्याची भावनिक गुंफण या नाटकात पाहायला मिळणार आहे. आजच्या पिढीच्या विचारांपासून पालकांच्या मनातील काळजीपर्यंत अनेक परिचित पैलू या कथेतून समोर येणार आहेत.

आयुष्यात योग्य मार्ग शोधण्याचा प्रवास

‘शुभं करोति’ हे नाटक रंगमंचावर कौटुंबिक नात्यांची गोष्ट सांगतानाच अपयशाकडे पाहाण्याचा दृष्टिकोन, स्वतःला समजून घेणं आणि आयुष्यात योग्य मार्ग शोधण्याचा प्रवासही मांडतं. रोजच्या जगण्यात सहजपणे आपल्या कानावर पडणारे मराठी श्लोक आणि संतसाहित्य यातील विचार आधुनिक जीवनाच्या प्रश्नांशी जोडत नाटक पुढे सरकतं. त्यामुळे परंपरा आणि आजची पिढी यांचा एक सुंदर संवादही या नाटकातून घडताना दिसणार आहे.

Athiya Shetty: ‘कम ओव्हर टू द ग्रीनर साइड’! अथिया शेट्टीसोबत प्राइड ऑफ काऊजची खास जाहिरात

दिग्दर्शक भाग्येश रानडे म्हणतात, ‘’ ‘शुभं करोति’ ही एका घराची गोष्ट आहे आणि त्याच वेळी ती अनेक घरांची गोष्टही आहे. आज मुलांच्या स्वप्नांचा आणि पालकांच्या अपेक्षांचा मेळ घालताना अनेक कुटुंबांमध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात. अपयश आलं की आपण स्वतःकडे आणि आपल्या माणसांकडे कसं पाहातो, हा या नाटकाचा महत्त्वाचा भाग आहे. श्लोक आणि संतसाहित्यातले विचार आम्ही कोणताही उपदेश न करता कथेत सहजपणे गुंफले आहेत. प्रेक्षकांनी हे नाटक पाहाताना ‘ही तर आपल्या घरातलीच गोष्ट आहे’ असं कुठेतरी मनापासून जाणवावं, अशी आमची इच्छा आहे.’’

नात्यांमागच्या भावना मांडायच्या

लेखक वैभव जोशी म्हणतात, ‘’ ‘शुभं करोति’ लिहिताना मला आजच्या कुटुंबांमध्ये बदलत जाणारी नाती आणि त्या नात्यांमागच्या भावना मांडायच्या होत्या. मुलांना स्वतःचं आयुष्य घडवायचं असतं तर पालकांना त्यांच्या भविष्याची काळजी असते. या दोन बाजूंमधला संवाद, त्यातून निर्माण होणारे प्रसंग आणि शेवटी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न हा या नाटकाचा गाभा आहे. आजच्या काळातही आपल्या संस्कारांमधले विचार आपल्याला कसे जोडून ठेवतात, हे कथेतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.’’

Akshaye Khanna Property: ‘धुरंधर’च्या यशानंतर अक्षय खन्नाची मोठी प्रॉपर्टी डील; मलबार हिलमध्ये खरेदी केलं आलिशान अपार्टमेंट

या नाटकात अभिनय बेर्डे, अपूर्वा गोरे, सीमा देशमुख आणि हृषिकेश जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. १ ऑक्टोबरपासून घराघरात घडणारी ही गोष्ट रंगमंचावर दाखल होत आहे. आपल्या कुटुंबातील नात्यांची, स्वप्नांची आणि अपेक्षांची काहीशी ओळखीची झलक दाखवणारं ‘शुभं करोति’ प्रेक्षकांना हसवेल, भावेल आणि आपल्या घराकडे नव्या नजरेने पाहायलाही भाग पाडेल.

Web Title: Shubham karoti marathi play october 1 vaibhav joshi bhagyesh ranade

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 06:20 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Entertainmenmt

संबंधित बातम्या

Athiya Shetty: ‘कम ओव्हर टू द ग्रीनर साइड’! अथिया शेट्टीसोबत प्राइड ऑफ काऊजची खास जाहिरात
1

Athiya Shetty: ‘कम ओव्हर टू द ग्रीनर साइड’! अथिया शेट्टीसोबत प्राइड ऑफ काऊजची खास जाहिरात

Ketaki Mategaonkar: आवाजाची जादू अन् चाहत्यांचं भरभरून प्रेम! ‘या’ अभिनेत्रींने पार केला ५ कोटी व्ह्यूजचा टप्पा
2

Ketaki Mategaonkar: आवाजाची जादू अन् चाहत्यांचं भरभरून प्रेम! ‘या’ अभिनेत्रींने पार केला ५ कोटी व्ह्यूजचा टप्पा

The Vvan Box Office Collection: रिव्ह्यू निगेटिव्ह, तरी प्रेक्षकांचा पैसा वसूल! ‘द वन’ने ओपनिंग डेला केली ‘इतकी’ कोटींची कमाई
3

The Vvan Box Office Collection: रिव्ह्यू निगेटिव्ह, तरी प्रेक्षकांचा पैसा वसूल! ‘द वन’ने ओपनिंग डेला केली ‘इतकी’ कोटींची कमाई

Bigg Boss fame Divya Shinde Arrest:  ५ लाखांसाठी थेट डॉक्टरांचं घर गाठलं? ‘बिग बॉस मराठी’ फेम दिव्या शिंदे पोलिसांच्या ताब्यात
4

Bigg Boss fame Divya Shinde Arrest: ५ लाखांसाठी थेट डॉक्टरांचं घर गाठलं? ‘बिग बॉस मराठी’ फेम दिव्या शिंदे पोलिसांच्या ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.