Athiya Shetty: ‘कम ओव्हर टू द ग्रीनर साइड’! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
समकालीन, आधुनिक जीवनशैलीच्या दृष्टिकोनातून प्राइड ऑफ काऊजने जाणीव आणि विचारपूर्वक जीवन जगण्याचे आपले तत्त्वज्ञान साकारले असून, खऱ्या अर्थाने महत्त्वाच्या गोष्टींसाठी वेळ आणि अवकाश निर्माण करण्यास ग्राहकांना प्रोत्साहित केले आहे. Athiya Shetty:
या मोहिमेत ब्रँडची वैशिष्ट्यपूर्ण फार्म परिसंस्था आणि आरोग्यदायी जीवना विषयीचा आधुनिक दृष्टिकोन यांचा सुरेख मेळ साधण्यात आला आहे. अथिया शेट्टी तिच्या सहजता, अस्सलपणा आणि साधेपणातून साकारलेल्या जीवनशैली द्वारे हा विचार साकारते. दैनंदिन जीवनात समतोल शोधण्याच्या मोहिमेच्या मध्यवर्ती विचाराचे प्रतिबिंब तिच्या उपस्थितीत दिसते.
त्याचबरोबर प्राइड ऑफ काऊजच्या जगाशी आणि जीवनाकडे अधिक विचारपूर्वक पाहण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांशी एक नैसर्गिक नाते जोडले जाते. ही मोहीम पारंपरिक डेअरी संवादाच्या पलीकडे जात, आपल्या पोषणाचा स्रोत आपल्याला माहीत असण्याचे भावनिक महत्त्व आणि त्याभोवती असलेल्या अनुभवांचा वेध घेते.
श्रीमती अक्षाली शाह, कार्यकारी संचालक, पराग मिल्क फूड्स लिमिटेड म्हणाल्या,“या मोहिमेद्वारे आम्हाला दैनंदिन जीवनातील धावपळीपासून थोडे दूर जाऊन अधिक नैसर्गिक आणि समाधान देणाऱ्या गोष्टींशी पुन्हा जोडले जाण्याची भावना व्यक्त करायची होती. अथियाच्या व्यक्तिमत्त्वात या संकल्पनेशी सुसंगत अशी सहजता आणि साधेपणा आहे. त्यामुळे या विचारासाठी ती अगदी योग्य ठरली. तिची स्वतःची वेगळी ओळख आहे आणि तिचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा कृत्रिमरीत्या घडवून आणलेला असतो विचारपूर्वक स्वीकारलेला वाटतो.
प्राइड ऑफ काऊजसाठी आम्ही साकारत असलेल्या विश्वाशी हे अतिशय सुसंगत आहे. तिच्या माध्यमातून ही जाहिरात मोहीम पारंपरिक सेलिब्रिटी एंडोर्समेंटपेक्षा आमच्या फार्मचे प्रतिनिधित्व करणारा अनुभव घेण्यासाठी दिलेले एक आमंत्रण वाटावे अशी आमची इच्छा होती. थोडा अधिक मोकळा अवकाश, थोडी अधिक शांतता आणि निसर्गाशी अधिक जवळचे नाते अनुभवण्याचे आमंत्रण.”
पोषण, आरोग्यदायी जीवन आणि निसर्गाशी जोडलेल्या व्यापक जीवनशैलीच्या संकल्पनेवर आधारित प्रीमियम डेअरी ब्रँड म्हणून प्राइड ऑफ काऊजच्या वाटचालीला ही मोहीम पुढे घेऊन जाते. त्याचे सिंगल-ओरिजिन तत्त्वज्ञान कायम असले तरी, आपल्या फार्मचा अनुभव आणि त्याची मूल्ये ग्राहकांच्या अधिक जवळ कशी पोहोचवता येतील, यासाठी ब्रँड सातत्याने नवे मार्ग शोधत आहे.
आपल्या नवीन मोहिमेद्वारे प्राइड ऑफ काऊज ग्राहकांना जीवनाचा वेग थोडा कमी करण्याचे, निसर्गाशी पुन्हा जोडले जाण्याचे आणि दैनंदिन आयुष्यातील छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधण्याचे महत्त्व अनुभवण्याचे आमंत्रण देत आहे.






