Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vandana Gupte: ‘….आणि त्यात काहीच चुकीचं नाही’ ‘आमने सामने’ नाटकावरून मोठा वाद, वंदना गुप्ते यांनी मांडली रोखठोक भूमिका

Vandana Gupte: ‘आमने सामने’ या लोकप्रिय मराठी नाटकातील कलाकारांच्या मानधनवाढीवरून सुरू झालेल्या वादावर ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहन गुजर आणि केतकी विलास यांनी मानधनवाढ मागितल्यामुळे आपल्याला नाटकातून अचानक काढून टाकल्याचा आरोप केला आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 29, 2026 | 06:53 PM
Vandana Gupte Reacts to Aamne Samne Play Controversy: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Vandana Gupte Reacts to Aamne Samne Play Controversy: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘आमने सामने’ नाटकाच्या वादावर वंदना गुप्ते यांची प्रतिक्रिया.
  • रोहन गुजर आणि केतकी विलास यांनी मानधनवाढीवरून काढल्याचा आरोप केला.
  • कलाकारांना मानधनवाढ मागण्याचा हक्क असल्याचे वंदना गुप्ते म्हणाल्या.

Vandana Gupte Reacts to Aamne Samne Play Controversy: मराठी रंगभूमीवर सध्या सगळीकडे चर्चा आहे ती ‘आमने सामने‘ या नाटकाची. हे नाटक गेल्या काही महिन्यांपासून हाऊसफुल्ल चालू आहे. प्रेक्षकांना हे नाटक खूप आवडत आहे. पण आता या नाटकाचे पडद्यामागचे वाद समोर आले आहेत आणि रंगभूमीवर दोन गट पडले आहेत. नाटकात काम करणाऱ्या दोन कलाकारांना अचानक काढून टाकल्यामुळे हा सगळा वाद सुरू झाला आहे. Vandana Gupte:

नेमका वाद काय आहे?

या नाटकात रोहन गुजर आणि केतकी विलास हे दोन कलाकार काम करत होते. त्यांनी नाटकाच्या निर्मात्यांकडे मानधन वाढवून मागितले होते. त्यांना वाटले की नाटक यशस्वी होत आहे, आपली पण मेहनत आहे, त्यामुळे थोडे मानधन वाढले पाहिजे.

परंतु निर्माते असलेल्या लीना भागवत आणि मंगेश कदम यांनी त्यांना नाटकातून काढून टाकले. रोहन आणि केतकी यांचा आरोप आहे की फक्त पगार वाढवून मागितला म्हणून आम्हाला एका रात्रीतून काढलं.

‘त्या दीड हजारांसाठी तडकाफडकी रिप्लेस केलं’; रोहन गुजर-केतकी पालव यांचा …

यावर लीना भागवत आणि मंगेश कदम यांनी पण व्हिडिओ बनवून आपली बाजू सांगितली. त्यांच्या म्हणण्यानुसार, एकदा नाहीतर तीन वेळा मानधन वाढवून मागण्यात आले होते. त्यामुळे नाईलाजाने आम्हाला हा कठोर निर्णय घ्यावा लागला, असे त्यांनी स्पष्ट केले. या आरोप-प्रत्यारोपानंतर मराठी सृष्टीतील अनेक कलाकारांनी आपापली मतं मांडायला सुरुवात केली.

वंदना गुप्ते काय म्हणाल्या?

या सगळ्या प्रकरणावर ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि तो खूप व्हायरल होत आहे. त्यांनी दोन्ही बाजूंना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

वंदना गुप्ते व्हिडिओत म्हणाल्या, “लीना आणि मंगेश, मी तुमचा व्हिडिओ पाहिला. तुम्ही रडत होता ते बघून मला पण खूप वाईट वाटलं. आपण सगळे कलाकार आहोत, या परिस्थितीतून आपण पण गेलो आहोत. मला आठवतंय, माझं एका प्रयोगाचे 80 रुपये मानधन होतं, ते 100 रुपये करा म्हणून मी मोहन काकांकडे 15 वेळा गेले होते. मग 100 व्या प्रयोगाला त्यांनी माझं मानधन वाढवलं.”

पुढे त्या म्हणाल्या, “तुम्ही दोघेही कलाकार आहात, तुम्हाला या गोष्टी समजायला हव्यात. नाटक बंद करायचं असेल तर ठीक आहे, पण अशा पद्धतीने अचानक सांगायचं की आज तुमचा शेवटचा प्रयोग आहे, हे बरोबर नाही. उद्या कोणी तुमचा असा अपमान केला तर तुम्हाला चालेल का? मंगेश, तुला चालेल का? असं करू नये.”

त्याच बरोबर त्यांनी रोहन आणि केतकी यांनाही समजावलं. त्या म्हणाल्या, “कलाकार म्हणून आपल्याला पगार वाढवून मागायचा पूर्ण अधिकार आहे. पण तीन-तीन वेळा वेगवेगळं मागणं हे पण योग्य नाही. तुम्ही पण थोडा विचार करायला हवा होता.”

Aamne Samne Natak: ‘आमने सामने’ नाटकातून रोहन-केतकीला अचानक …

वंदना गुप्ते पुढे म्हणाल्या की, “प्रत्येकाची गरज असते, प्रत्येकाचं स्टेटस वाढत असतं. मी स्वतः 50 वर्षे काम करून सुद्धा मानधन वाढवून मागायला घाबरते. पण आजची नवीन मुलं आहेत, त्यांना हक्काचं मागावं वाटतं आणि त्यात काहीच चुकीचं नाही. प्रत्येकाला वाटतं की नाटकाला यश मिळतंय तर त्यात आपलाही वाटा आहे. पण अशी वादावादी, भांडणं बरी नाहीत.”

शेवटी त्या म्हणाल्या, “मी हे एक कलाकार म्हणून बोलतेय, निर्माता म्हणून नाही. हा वाद असा वाढवू नका.” वंदना गुप्ते यांच्या या रोखठोक व्हिडिओनंतर अनेक कलाकारांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. कमेंटमध्ये अनेकांनी लिहिलं आहे की तुम्ही दोन्ही बाजू अगदी योग्य पद्धतीने मांडल्या. आता हा वाद कसा मिटतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: आमने सामने’ नाटकाचा वाद कशामुळे सुरू झाला?

    Ans: नाटकातील कलाकारांच्या मानधनवाढीच्या मागणीवरून आणि त्यानंतर घेतलेल्या निर्णयावरून हा वाद सुरू झाला.

  • Que: रोहन गुजर आणि केतकी विलास यांनी काय आरोप केला?

    Ans: मानधनवाढ मागितल्यामुळे आपल्याला नाटकातून तडकाफडकी काढून टाकल्याचा आरोप त्यांनी केला.

  • Que: लीना भागवत आणि मंगेश कदम यांनी काय स्पष्टीकरण दिले?

    Ans: तिसऱ्यांदा मानधनवाढीचा प्रस्ताव आल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Vandana gupte reacts aamne samne marathi play remuneration controversy rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2026 | 06:53 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Ramayanam Song Judy Jodi: श्रीराम-सीतेच्या पवित्र प्रेमाचा सुरेल आविष्कार! करवा चौथनिमित्त ‘रामायणम्’चे ‘जुडी जोडी’ गाणे प्रदर्शित
1

Ramayanam Song Judy Jodi: श्रीराम-सीतेच्या पवित्र प्रेमाचा सुरेल आविष्कार! करवा चौथनिमित्त ‘रामायणम्’चे ‘जुडी जोडी’ गाणे प्रदर्शित

Bhaubeej Gift Ideas: भाऊबीजेला बहिणीला द्या बचतीचं गिफ्ट! गॅसचा खर्च कमी करणारे ‘हे’ ५ स्मार्ट गॅझेट्स ठरतील फायदेशीर
2

Bhaubeej Gift Ideas: भाऊबीजेला बहिणीला द्या बचतीचं गिफ्ट! गॅसचा खर्च कमी करणारे ‘हे’ ५ स्मार्ट गॅझेट्स ठरतील फायदेशीर

Ranbir Kapoor: ‘रामायण’मधून संस्कारांची शिदोरी! रणबीर कपूरसह दिग्गजांचा ५०० हून अधिक शाळांतील विद्यार्थ्यांशी संवाद
3

Ranbir Kapoor: ‘रामायण’मधून संस्कारांची शिदोरी! रणबीर कपूरसह दिग्गजांचा ५०० हून अधिक शाळांतील विद्यार्थ्यांशी संवाद

Income Tax Data 2025: १ कोटींपेक्षा जास्त पगार असणारे भारतीय किती? आयकर विभागाच्या आकडेवारीतून मोठा खुलासा!
4

Income Tax Data 2025: १ कोटींपेक्षा जास्त पगार असणारे भारतीय किती? आयकर विभागाच्या आकडेवारीतून मोठा खुलासा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.