Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘संताप’ गाणे का ठरतंय Gen Z चा आवाज? विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची पार्श्वभूमी अन् एमिनेमची प्रेरणा! रॅपर Vishay Khxl तुफान चर्चा

Vishay Khxl Santap Rap Song : आजच्या Gen Z पिढीचे प्रश्न, अस्वस्थता आणि शिक्षणव्यवस्थेतील अन्यायाविरोधात आवाज उठवणारे मराठी रॅपर Vishay Khxl चे 'संताप' हे रॅप गाणे सोशल मीडियावर कमालीचे ट्रेंड होत आहे. जंतरमंतर येथील विद्यार्थी आंदोलनाची पार्श्वभूमी आणि एमिनेमच्या प्रेरणेतून साकारलेलं हे गाणं आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 02, 2026 | 05:15 PM
'विषय खोल'चे 'संताप' गाणे सोशल मीडियावर ट्रेंडिंग ( सौजन्य - सोशल मीडिया )

'विषय खोल'चे 'संताप' गाणे सोशल मीडियावर ट्रेंडिंग ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • Gen Z च्या मनातला ‘संताप’ रॅपर रॅपमधून व्यक्त
  • सोशल मीडियावर गाणं ट्रेंडिंग
  • संताप Gen Z च्या प्रश्नांचा आवाज!
Vishay Khxl Santap Rap Song : आजच्या Gen Z पिढीच्या मनात असलेले प्रश्न, अस्वस्थता आणि सामाजिक वास्तवावरचा आक्रोश रॅपच्या माध्यमातून व्यक्त करणारा रॅपर विषय खोल (Vishay Khxl) सध्या चर्चेत आहे. त्याचे ‘संताप’ हे गाणे सोशल मीडियावर ट्रेंडिंग असून, शिक्षणव्यवस्था, विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचा संदेश या रॅपमधून देण्यात आला आहे. तरुणाईच्या मनातील भावना थेट आणि परखड शब्दांत मांडल्यामुळे या गाण्याला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. ( Vishay Khxl Santap Rap Song )

Kantara Chapter 1: ‘कंतारा: ए लीजेंड चॅप्टर 1’च्या यशाला एक वर्ष पूर्ण; होम्बले फिल्म्सने मानले जगभरातील प्रेक्षकांचे आभार

पहिल्या फोनमध्ये फक्त एमिनेमची गाणी

विषयच्या संगीतप्रवासामागे एमिनेमचा मोठा प्रभाव आहे. आपल्या पहिल्या फोनमध्ये फक्त एमिनेमची गाणी असल्याचे सांगताना तो म्हणतो की, “माझ्या लिखाणात, रॅपिंग सेन्समध्ये, म्युझिक सेन्समध्ये, फ्लोज आणि केडन्समध्ये एमिनेमने मला खूप प्रेरणा दिली.” मात्र त्याचा प्रवास थेट रॅपर म्हणून सुरू झालेला नाही. “मी आधी म्युझिक प्रोड्युसर आहे आणि नंतर रॅपर,” असे तो सांगतो.

बीट्स तयार करण्यापासून संगीताची सुरुवात

बीट्स तयार करण्यापासून त्याने संगीताची सुरुवात केली. विशेष म्हणजे संगीताशी कोणताही संबंध नसलेल्या मित्राकडे MPC किट असल्याचे त्याला एकदा स्वप्नात दिसले. त्या स्वप्नातील अनुभवातून त्याला बीट मेकिंगची उत्सुकता निर्माण झाली आणि पुढे म्युझिक प्रोडक्शनमधून त्याचा रॅपकडे प्रवास सुरू झाला.”

सामाजिक परिस्थिती विषयीचा तीव्र आक्रोश

‘संताप’ या गाण्यामागे मात्र केवळ संगीताची प्रेरणा नसून सामाजिक परिस्थिती विषयीचा तीव्र आक्रोश आहे. जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांनी चांगल्या शिक्षणव्यवस्थेसाठी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीने विषय अस्वस्थ झाला. देशाचे भवितव्य असलेल्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे होणारे दुर्लक्ष, आंदोलनादरम्यान झालेला अन्याय आणि महिला विद्यार्थिनींच्या झालेल्या अपमानाच्या घटनांनी त्याच्या मनात निर्माण झालेला संताप त्याने रॅपच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. या संपूर्ण अनुभवातून ‘संताप’ या गाण्याची निर्मिती झाली.

रॅपची चर्चा आणखी रंगण्याची शक्यता

“आपल्या आजूबाजूला चुकीच्या गोष्टी आणि अन्याय घडत असताना आपण अनेकदा त्याकडे दुर्लक्ष करतो. जिथे चुकीचं दिसतं, जिथे अन्याय दिसतो, तिथे आवाज उठवला पाहिजे. कारण त्याशिवाय आपल्या देशाचा विकास होणार नाही,” असा स्पष्ट संदेश रॅपर विषय (Vishay Khxl) देतो. त्यामुळे ‘संताप’ हे केवळ एक रॅप साँग न राहता Gen Z च्या प्रश्नांना, अस्वस्थतेला आणि सामाजिक जाणीवेला आवाज देणारा ट्रॅक ठरत आहे. सोशल मीडियावर मिळणारा प्रतिसाद पाहता विषय (Vishay Khxl) च्या या परखड रॅपची चर्चा आगामी काळात आणखी रंगण्याची शक्यता आहे.

Nimrat Kaur: ‘७ दिवस तडफडले’, काश्मीर दहशतवादी हल्ल्यात वडिलांचा मृत्यू; निमरत कौरने सांगितला काळजाचा ठाव घेणारा प्रसंग

Web Title: Marathi rapper vishay khxl santap rap song trending on social media ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 05:14 PM

Topics:  

  • marathi entertainment
  • Rap Song

संबंधित बातम्या

डान्सर-कोरिओग्राफर Avi Payal  यांचा मनोरंजनविश्वात डंका! नव्या प्रोजेक्ट्सची सध्या सोशल मीडियावर चर्चा
1

डान्सर-कोरिओग्राफर Avi Payal यांचा मनोरंजनविश्वात डंका! नव्या प्रोजेक्ट्सची सध्या सोशल मीडियावर चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.