Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aai Tulja Bhavani Serial: ‘त्रिदल राजदंडा’साठी बालगणेश-कार्तिकेय देणार महापरीक्षा; शक्ती, युक्ती अन् भक्तीची रंगणार चुरस

Aai Tulja Bhavani Serial: ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत त्रिदल राजदंडासाठी बालगणेश आणि कार्तिकेय यांच्यात शक्ती, युक्ती आणि भक्तीच्या तीन परीक्षा रंगणार आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 24, 2026 | 08:07 AM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Aai Tulja Bhavani Serial: कलर्स मराठीवरील लोकप्रिय ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत सध्या प्रेक्षकांना एक अनोखा सामना पाहायला मिळत आहे. पार्वतीमातेला तिच्या तुळजाई अवतारात भेटण्यासाठी आलेल्या बालगणेश आणि कार्तिकेय यांच्यातील वाद आता एका महत्त्वाच्या वळणावर पोहोचला आहे. दोघांमध्ये श्रेष्ठ कोण, हे ठरवण्यासाठी तुळजाईने त्यांच्यासमोर तीन परीक्षा ठेवलेल्या आहेत.

शक्ती, युक्ती आणि भक्तीची परीक्षा

बालगणेश आणि कार्तिकेय यांच्यातील वाद मिटवण्यासाठी तुळजाईने शक्ती, युक्ती आणि भक्ती अशा तीन परीक्षांचे आव्हान दिले आहे. या तीन परीक्षा जो जिंकेल, त्याला दैवी ‘त्रिदल राजदंड’ मिळणार आहे.

बालतुळजाईच्या दैवी अवतारात तिच्या हातातील तेजोवलयातून शक्तीचा राजदंड, युक्तीचे चक्र आणि भक्तीचे सुवर्णकमळ प्रकट होतात. ही तिन्ही दैवी चिन्हे एकत्र येऊन ‘त्रिदल राजदंडा’चे रूप धारण करतात. या राजदंडाच्या दिव्य प्रकाशाने संपूर्ण राजवाडा उजळून निघतो.

कार्तिकेयची शक्तीची तयारी, तर गणेश शांत

या महापरीक्षेसाठी कार्तिकेय आक्रमकपणे तयारी करत आहे. अचूक लक्षभेदाचा सराव करण्यासोबतच तो गावातील बलशाली आणि शक्तिशाली सवंगड्यांनाही आपल्या बाजूने गोळा करत आहे.

दुसरीकडे बालगणेश मात्र अत्यंत शांतपणे आणि निखळ भावनेने या स्पर्धेकडे पाहत आहे. त्यामुळे शक्ती आणि शांतता यांच्यातील हा सामना नेमका कोणत्या वळणावर जाणार, याची उत्सुकता वाढली आहे.

गावातही पडले दोन गट

गणेश आणि कार्तिकेय यांच्यातील या स्पर्धेमुळे गावातील लोकही दोन गटांत विभागले गेले आहेत. तारा आणि पद्मा यांच्यातही आपल्या लाडक्या देवासाठी चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे मालिकेतील हा दैवी सामना आता गावातील वातावरणही बदलताना दिसत आहे.

मात्र, या स्पर्धेच्या आडून एक मोठं असुरी षड्यंत्रही रचलं जात आहे. शुक्राचार्य आणि भुजंग यांनी महिषासुराला मुक्त करण्यासाठी नवा डाव आखला आहे. त्यामुळे बालगणेश आणि कार्तिकेयच्या या स्पर्धेसोबतच असुरांचा कटही महत्त्वाचा ठरणार आहे.

Elnaaz Norouzi: हॉलिवूडमध्ये एलनाझ नोरौझीची दमदार एंट्री; ‘द फिक्स’मधील पहिल्याच मुख्य भूमिकेचं अमेरिकन समीक्षकांकडून कौतुक

‘त्रिदल राजदंडा’चा मानकरी कोण?

शक्ती, युक्ती आणि भक्तीच्या या तीन कठीण परीक्षा पार करून ‘त्रिदल राजदंडा’चा खरा मानकरी कोण ठरणार? बालगणेश आणि कार्तिकेय यांच्यातील या स्पर्धेचा निकाल काय लागणार? तसेच बालगणेशाच्या भक्तांना जाळ्यात ओढण्याचा असुरांचा डाव यशस्वी होणार की भगवान महादेव तुळजाईच्या भक्तांच्या रक्षणासाठी नवी लीला घडवणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या आगामी भागात मिळणार आहेत. ‘आई तुळजाभवानी’ दररोज रात्री ८.५० वाजता फक्त कलर्स मराठीवर पाहता येणार आहे.

Hanuman Ansh: कमी बजेटच्या ‘हनुमान अंश’चा जगभरात डंका; १२ दिवसांत ओव्हरसीजमध्ये $3.5 मिलियनहून अधिक कमाई

Web Title: Aai tulja bhavani serial bal ganesh kartikeya mahapariksha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 08:07 AM

Topics:  

  • Colours Marathi
  • Entertainemnt News
  • Marathi Serial

संबंधित बातम्या

Hanuman Ansh: कमी बजेटच्या ‘हनुमान अंश’चा जगभरात डंका; १२ दिवसांत ओव्हरसीजमध्ये $3.5 मिलियनहून अधिक कमाई
1

Hanuman Ansh: कमी बजेटच्या ‘हनुमान अंश’चा जगभरात डंका; १२ दिवसांत ओव्हरसीजमध्ये $3.5 मिलियनहून अधिक कमाई

Elnaaz Norouzi: हॉलिवूडमध्ये एलनाझ नोरौझीची दमदार एंट्री; ‘द फिक्स’मधील पहिल्याच मुख्य भूमिकेचं अमेरिकन समीक्षकांकडून कौतुक
2

Elnaaz Norouzi: हॉलिवूडमध्ये एलनाझ नोरौझीची दमदार एंट्री; ‘द फिक्स’मधील पहिल्याच मुख्य भूमिकेचं अमेरिकन समीक्षकांकडून कौतुक

Devghar On Rent Movie: मराठमोळ्या ठेक्यावर गौतमी पाटीलचा जलवा; ‘अगं आई गं…’ गाणं रिलीज
3

Devghar On Rent Movie: मराठमोळ्या ठेक्यावर गौतमी पाटीलचा जलवा; ‘अगं आई गं…’ गाणं रिलीज

OTT Releases This Week: मनोरंजनाचा फुल्ल डोस! ‘टॉक्सिक’, ‘शक’सह 7 चित्रपट-सीरिज OTTवर होणार रिलीज
4

OTT Releases This Week: मनोरंजनाचा फुल्ल डोस! ‘टॉक्सिक’, ‘शक’सह 7 चित्रपट-सीरिज OTTवर होणार रिलीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.