Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aai Tuljabhavani: ‘इंद्रायणी’ फेम सांची भोयर साकारणार ‘लहान तुळजाई’; ‘आई तुळजाभवानी’मध्ये होणार मोठा दैवी खुलासा

Aai Tuljabhavani: ‘इंद्रायणी’ फेम बालकलाकार सांची भोयर आता ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत लहान तुळजाईच्या रूपात दिसणार आहे. श्रावण आणि नागपंचमीच्या मुहूर्तावर मोठा दैवी खुलासा होणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 13, 2026 | 10:28 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Aai Tuljabhavani: ‘कलर्स मराठी’वरील लोकप्रिय मालिका ‘आई तुळजाभवानी’मध्ये सध्या भक्तीमय चातुर्मास पर्व सुरू आहे. श्रावण महिन्याच्या आणि नागपंचमीच्या शुभ मुहूर्तावर मालिकेत एक रंजक आणि भावनिक वळण पाहायला मिळणार आहे. ‘इंद्रायणी’ मालिकेत लाडकी ‘इंदू’ची भूमिका साकारणारी बालकलाकार सांची भोयर आता ‘आई तुळजाभवानी’मध्ये लहान तुळजाईच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सांची भोयर साकारणार ‘लहान तुळजाई’

येत्या १३ ऑगस्टपासून प्रेक्षकांना मालिकेत तुळजाईच्या बालरूपाची अद्भुत लीला पाहायला मिळणार आहे. कथानकानुसार, देवी वाड्यात कुठेच सापडत नसताना भक्तांसमोर एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो—“ही दिव्य पोथी कोण उघडणार?”

त्याचवेळी गर्दीतून एक दहा-बारा वर्षांची निरागस, तेजस्वी आणि बुद्धिमान मुलगी पुढे येते. ती शांतपणे “मी उघडते…” असं म्हणत पायऱ्या चढते आणि देवीच्या मुख्य आसनावर जाऊन बसते. त्यानंतर ती पोथीवर हात ठेवताच त्यातून सुवर्णप्रकाश बाहेर पडतो आणि रिकाम्या पानांवर दिव्य अक्षरं उमटू लागतात.

बालिकेचं होतं साक्षात तुळजाभवानीमध्ये रूपांतर

पद्मा या मुलीला ती नेमकी कोण आहे, असा प्रश्न विचारते. त्यानंतर या बालिकेचं रूपांतर साक्षात आई तुळजाभवानीच्या भव्य आणि दिव्य रूपात होतं. नऊवारी साडी, सुवर्ण अलंकार, मुकुट, हातातील त्रिशूळ आणि कपाळावरील मळवट अशा देवीच्या रूपात सांची भोयर दिसणार आहे.

या दैवी रूपातून आई तुळजाभवानी नागपंचमीची कथा सांगणार आहे. लहान मुलीच्या रूपात आलेली ही बालिका साधी मुलगी नसून साक्षात तुळजाईचं बालरूप असल्याचं अखेर उलगडणार आहे. मात्र, तुळजाईने ही लीला का रचली आहे आणि वाड्यात बालरूप धारण करून येण्यामागचा तिचा नेमका उद्देश काय आहे, हे आगामी भागांत स्पष्ट होणार आहे.

‘छोटी तुळजाई’ची भूमिका साकारणं माझ्यासाठी जबाबदारीची भावना – सांची भोयर

या भूमिकेबद्दल बोलताना सांची भोयरने आपला अनुभव शेअर केला. ‘इंद्रायणी’नंतर पुन्हा ‘कलर्स मराठी’च्या कुटुंबात परतताना जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि खूप आनंद झाला, असं तिने सांगितलं.

‘छोटी तुळजाई’ हे केवळ एक पात्र नसून महाराष्ट्राच्या श्रद्धेशी जोडलेलं बालदैवी रूप असल्यामुळे ही भूमिका स्वीकारताना वेगळीच जबाबदारी जाणवली, असंही सांचीने म्हटलं. ‘इंदू’ ही साधी मुलगी होती, तर ‘लहान तुळजाई’च्या भूमिकेत बालपणासोबत देवत्वाचा समतोल साधण्यासाठी तिने संवादफेक आणि देहबोलीवर विशेष मेहनत घेतल्याचं सांगितलं.

Urmila Matondkar: उर्मिला मातोंडकरची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत; एक्स हसबंडवर टोला? ‘लॉयल्टी’चा उल्लेख करत साधला निशाणा?

पोथी वाचतानाचा आणि त्यानंतर दैवी रूपात रूपांतरित होतानाचा अनुभव रोमांचक असल्याचं सांचीने सांगितलं. ‘इंद्रायणी’मधून मिळालेल्या प्रेमाप्रमाणेच या नव्या आणि पवित्र भूमिकेलाही महाराष्ट्रातील प्रेक्षक भरभरून प्रेम देतील, अशी अपेक्षाही तिने व्यक्त केली.

भक्तांच्या श्रद्धेची होणार परीक्षा

मालिकेच्या कथानकात तुळजाईच्या बालरूपाच्या आगमनामुळे मोठं वळण येणार आहे. भक्तांची श्रद्धा आणि आत्मविश्वासाची परीक्षा पाहण्यासाठी तुळजाई बालिकेचं रूप धारण करून वाड्यात प्रवेश करते. आता बालरूपातील आई तुळजाभवानी नागपंचमीची दिव्य कथा कशी उलगडणार आणि तिच्या या लीलेमागचं रहस्य काय आहे, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Mamachya Govyala Jauya: ७ कोटींच्या बजेटमध्ये बनलेला ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ बॉक्स ऑफिसवर हिट, टॉप १० मध्ये मिळवले स्थान

Web Title: Aai tuljabhavani indrayani fame sanchi bhoyar to play little tuljai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 10:28 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Marathi Serial

संबंधित बातम्या

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य
1

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म
2

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं! 1-2 नाही तर एकाच वेळी 11 जण नॉमिनेट, ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार
3

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं! 1-2 नाही तर एकाच वेळी 11 जण नॉमिनेट, ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार

National Crush: कोण आहे नवी ‘नॅशनल क्रश’ तान्या मिश्रा? बिहारच्या या तरुणीच्या डोळ्यांवर फिदा झाले नेटकरी
4

National Crush: कोण आहे नवी ‘नॅशनल क्रश’ तान्या मिश्रा? बिहारच्या या तरुणीच्या डोळ्यांवर फिदा झाले नेटकरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.