Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य

Bakaiti Season 2 मध्ये कटारिया कुटुंबाची नवी गोष्ट पाहायला मिळणार आहे. सुष्मा कटारियाची भूमिका साकारणाऱ्या शीबा चड्ढा यांनी नव्या सीझनमधील आपल्या पात्राच्या बदलाबद्दल सांगितलं.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 29, 2026 | 02:52 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘बकैती’ सीझन 2 मध्ये काय आहे खास?
  • शीबा चड्ढा यांनी सीझन 2 बद्दल काय सांगितलं?
  • कटारिया कुटुंबाच्या आयुष्यात पुन्हा रंगणार गोंधळ
Bakaiti Season 2: ZEE5वरील लोकप्रिय हिंदी वेब सीरिज ‘बकैती’चा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कटारिया कुटुंबातील दैनंदिन गोंधळ, कौटुंबिक नाती, मजेशीर किस्से आणि भावनिक क्षणांची सांगड पुन्हा एकदा या सीझनमध्ये पाहायला मिळत आहे. ‘बकैती’ सीझन 2 चे सातही भाग 25 सप्टेंबरपासून ZEE5 वर उपलब्ध आहेत.

पहिल्या सीझनमधील विनोद आणि कौटुंबिक जिव्हाळा कायम ठेवत या सीझनमध्ये कटारिया कुटुंबातील प्रत्येक पात्राला नव्या परिस्थितींचा सामना करताना दाखवण्यात आलं आहे. त्यासोबतच पात्रांच्या व्यक्तिमत्त्वाचे काही नवे पैलूही समोर येणार आहेत.

‘प्रत्येक पात्र काहीतरी नवीन करत आहे’

सीझन 2 मध्ये नेमका काय बदल पाहायला मिळणार आहे, याबद्दल सुष्मा कटारियाची भूमिका साकारणाऱ्या शीबा चड्ढा यांनी आपलं मत व्यक्त केलं. त्यांच्या मते, दुसऱ्या सीझनचं लेखन अशा पद्धतीने करण्यात आलं आहे की पहिल्या सीझनचा मूळ गाभा कायम ठेवतानाच प्रत्येक पात्राचा प्रवास पुढे जातो.

शीबा चड्ढा म्हणाल्या, “याचे लेखन खूप छान आहे आणि प्रत्येक पात्र काहीतरी नवीन करत आहे.”

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं! 1-2 नाही तर एकाच वेळी 11 जण नॉमिनेट, ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार

सुष्माच्या पात्रात झाला बदल

शीबा यांच्या मते, या सीझनमध्ये सुष्माच्या व्यक्तिमत्त्वातही महत्त्वाचा बदल पाहायला मिळतो. यावेळी ती आपल्या इच्छा आणि कुटुंबासाठीच्या निर्णयांबाबत अधिक पुढाकार घेताना दिसणार आहे.

आपल्या पात्राच्या प्रवासाबद्दल बोलताना शीबा म्हणाल्या, “तिला जे करायचे आहे, त्याबाबत ती अधिक पुढाकार घेतेय. ती स्वतःसाठी आणि कुटुंबासाठीही गोष्टी करत आहे आणि पुढाकार घेत आहे.”

सुष्माच्या पात्रातील हा बदल आपल्याला यावेळी विशेष आवडल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यांच्या मते, सीझन 2 मध्ये सुष्माच्या पात्राचा एक प्रकारे विकास झाला आहे.

National Crush: कोण आहे नवी ‘नॅशनल क्रश’ तान्या मिश्रा? बिहारच्या या तरुणीच्या डोळ्यांवर फिदा झाले नेटकरी

कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार कौटुंबिक गोंधळ

‘बकैती’च्या दुसऱ्या सीझनमध्ये कटारिया कुटुंबातील नातेसंबंध आणि दैनंदिन आयुष्यातील छोट्या-मोठ्या प्रसंगांमधून विनोद आणि भावना उलगडताना पाहायला मिळणार आहेत. नव्या परिस्थितींमुळे कुटुंबातील सदस्यांसमोर काही नवी आव्हानं उभी राहणार असून, त्यातूनच अनेक मजेशीर आणि भावनिक प्रसंग घडणार आहेत.

ZEE5च्या अधिकृत माहितीनुसार, या सीझनमध्ये राजेश तैलंग, शीबा चड्ढा, तान्या शर्मा, आदित्य शुक्ला आणि रमेश राय हे कलाकार झळकत आहेत.

‘बकैती’ सीझन 2 आता ZEE5 वर स्ट्रीम होत असून, कटारिया कुटुंबाच्या नव्या गोंधळाची आणि त्यांच्या नात्यांमधील बदलांची गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Web Title: Bakaiti season 2 sheeba chaddha sushma kataria zee5

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 02:52 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • entertainment
  • Web Series

संबंधित बातम्या

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म
1

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म

Aali Mothi Shahani Movie: हृता-सारंगची ऑनस्क्रीन जुगलबंदी; ‘बोनिता बोनिता’ गाण्याने वेधलं लक्ष
2

Aali Mothi Shahani Movie: हृता-सारंगची ऑनस्क्रीन जुगलबंदी; ‘बोनिता बोनिता’ गाण्याने वेधलं लक्ष

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं! 1-2 नाही तर एकाच वेळी 11 जण नॉमिनेट, ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार
3

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं! 1-2 नाही तर एकाच वेळी 11 जण नॉमिनेट, ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार

National Crush: कोण आहे नवी ‘नॅशनल क्रश’ तान्या मिश्रा? बिहारच्या या तरुणीच्या डोळ्यांवर फिदा झाले नेटकरी
4

National Crush: कोण आहे नवी ‘नॅशनल क्रश’ तान्या मिश्रा? बिहारच्या या तरुणीच्या डोळ्यांवर फिदा झाले नेटकरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.