
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बिग बॉस मराठी सिझन ६ सुरू झाल्यापासून रोज काही ना काही पाहायला मिळत असते. प्रेक्षक मात्र प्रत्येक वीकेंडची आतुरतेने वाट पाहत
असतात. कारण, भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख कोण कोणत्या स्पर्धकाची शाळा घेणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक वाट पाहत असतात. सध्या घरातील काही सदस्य फ्रंटफूटवर येऊन हा गेम खेळत आहेत. तर काही सदस्य अजूनही बॅकफूटवर खेळताना दिसत आहेत.
या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर रितेशने एक बॅकफूटवर खेळणाऱ्या सदस्याची शाळा घेतली आहे. ज्या सदस्याची शाळा घेतली तिचं नाव आहे दिव्या शिंदे. खरंतर, दिव्याचा घराबाहेर खूप मोठ्या प्रमाणात चाहतावर्ग आहे. तिली चाहत्यांचा सपोर्ट सुद्धा मिळताना दिसत आहे. पण बिग बॉस मराठीच्या घरात दिव्या फ्रंटफूटवर खेळताना दिसली नाही. यामुळे रितेशने भाऊच्या धक्क्यावर तिला जाब विचारला आहे.
या सीझनमध्ये पार पडलेल्या आधीच्या दोन धक्क्यांवर रितेश देशमुखने बऱ्याच स्पर्धकांना त्यांची चूक लक्षात आणून दिली होती. आज 31 जानेवारीला पार पडणाऱ्या भाऊच्या धक्क्याचा पहिला प्रोमो प्रदर्शित झाला आहे. ज्यामध्ये रितेश दिव्याला खडे बोल सुनावताना दिसत आहे. या प्रोमोत दिसत आहे रितेश बोलतो की आता बिग बॉसच्या घरात लाडका भाऊ योजना सुरू करण्यात आली आहे. त्याची सुरूवात दिव्याने केली आहे.
रितेशने दिव्याला तिच्या गेमबाबत आरसा दाखवला आहे. तो म्हणाला, “घरात एक लाडका भाऊ योजना सुरू झालेली आहे आणि त्याची सुरुवात दिव्या तुम्ही केलीये. ‘राकेश दादा हे…राकेश दादा ते…’ तुमचं घरातील नातं दिसतंय पण, गेमचं काय? गेम दिसत नाहीये. तुम्ही बाहेर लीडर आहात ना? इथे फक्त सपोर्टर दिसताय. राकेश यांच्या प्रवक्ता”
कलर्स मराठीने शेअर केलेल्या या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. रितेश आला की कुणालाच सुट्टी मिळत नाही”, “बरं झालं…दिव्या एकटी हा गेम खूप छान खेळू शकते”, “राकेश फक्त गेमसाठी त्यांना जवळ करतोय”, “विषय संपला”, “हेच ऐकायचं होतं आम्हाला..” अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.