Tharala Tar Mag Star Pravah Serial : ‘ठरलं तर मग’ मालिकेने आजवर प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकांच्या टीआरपीमध्ये ठरलं तर मालिका कायमच अव्वल स्थानी राहिली आहे. मात्र मालिकेचा नवा प्रोमो पाहताच नेटकऱ्यांनी मात्र चांगलेच ताशेरे ओढले आहेत. असं काय झालं प्रोमोमध्ये चला जाणून घेऊयात.
गेले 22 वर्ष किल्लेदारांच्या कुटुंबाचं एक रहस्य लपून होतं ते म्हणजे रविराज किल्लेदार प्रतिमा आणि तन्वीच्या अपघाताचं. प्रॉपर्टीसाठी नागराजने मोठ्या भावाच्या गाडीच्या अपघात घडवून आणतो. इतके दिवस दडवून ठेवलेलं हे सत्य आता नागराजने स्वत:च्या तोंडून कबूल केलं. प्रॉपर्टीसाठी वाट्टेल ते करणारा नागराज स्वत:च्या बायकोला सुमनला किडनॅप करायला देखील मागेपुढे पाहत नाही. नागराजचं हे सत्य सुमन कोणाला सांगू नये म्हणून नागराज तिचं मानसिक खच्चीकरण करतो. या सगळ्यामध्ये नागराजने कबूल केलेला व्हिडीओ सुमन अर्जुन आणि सायलीला दाखवते. नागराज विरुद्धचा हा भक्कम पुरावा असल्याने अर्जुन नागराजला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करतो. मात्र प्रोमो काही वेगळचं पाहायला मिळत आहे.
मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला असून नागराजला जामिनावर सुटका मिळताना दाखवलं आहे. जेव्हा नागराजची जेलमधून सुटका होते तेव्हा सायली, अर्जुन आणि सुमन नागराज समोर येतात. आणि सायली नागराजला म्हणते की, अपघाताच्या गुन्ह्यातून जरी जामिनावर सुटला असलास तरी बायकोचा मानसिक आणि शारीरिक छळ केलास त्याचं काय ? याची शिक्षा तर तुला मिळायलाच पाहिजे. इन्स्पेक्टर साहेब FIR लिहून घ्या, नागराज तुझी इथून सुटका नाही असं सायली नागराजला ठणकावून सांगते.
या सगळ्यावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नेटकऱ्यांनी म्हटलं की, नागराजच्या ऐवजी दिग्दर्शक आणि लेखकाला जेलमध्ये पाठवा. मालिका वाढवायची म्हणून काहीही दाखवणार का असा सवाल देखील नेटकऱ्यांनी केला आहे. या सगळ्याने उदया लोक मालिका पाहणं देखील बंद करतील, अशी टीका देखील करण्यात आली. दरम्यान मालिकेतील प्रोमोचा हा भाग 3 फेब्रुवारीला पाहायला मिळणार आहे. हा ट्विस्ट आता पुढे अजून कोणतं नवं वळण घेणार ? नागराजच्या पाठोपाठ तन्वी किल्लेदारचं देखील खरं सत्य जगासमोर येणार का ? हे सगळं येत्या काही भागात पाहायला मिळेल.






