Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi 6: दिपाली आणि राकेशच्या मैत्रीत पडली फूट, पाहायला मिळणार ‘बिग बॉस’ च्या घरात नवा ट्विस्ट

सध्या 'बिग बॉस' मराठीची चर्चा सर्वत्र सुरु असल्याचे दिसून येत आहे. आता अशातच आणखी एक नवा ट्विस्ट या शो मध्ये पाहायला मिळालेला आहे. 'बिग बॉस'च्या नुकत्याच शेअर केलेल्या प्रोमोमध्ये नवा राडा पाहायला मिळालेला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 29, 2026 | 12:25 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • दिपाली आणि राकेशच्या मैत्रीत पडली फूट
  • पाहायला मिळणार ‘बिग बॉस’ च्या घरात नवा ट्विस्ट
  • ‘बिग बॉस’ च्या नव्या प्रोमोने वेधले लक्ष
 

कलर्स मराठीवरील लोकप्रिय रिॲलिटी शो ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आतापर्यंत घट्ट आणि विश्वासार्ह वाटणारी दिपाली आणि राकेशची मैत्री आता तुटण्याच्या मार्गावर येऊन थांबली आहे. एकमेकांसाठी नेहमी उभे राहणारे, प्रत्येक टास्कमध्ये खांद्याला खांदा लावून खेळणारे हे दोन सदस्य आता थेट एकमेकांसमोर उभे ठाकताना दिसत आहेत. त्यामुळे घरात आणि प्रेक्षकांमध्येही मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकं असं काय घडलं की ही मैत्री इतक्या टोकाला जाऊन पोहोचली? हे आपण आता जाणून घेणार आहोत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये दिसतंय की एका साध्या मुद्द्यावरून सुरू झालेला वाद हळूहळू गंभीर स्वरूप घेत आहे. चर्चा, आरोप-प्रत्यारोप आणि जुन्या गोष्टी बाहेर येत जातात, ज्यामुळे दोघांमधील दुरावा अधिकच वाढताना दिसतो आहे. समोर आलेल्या प्रोमोमध्ये दिपाली आणि राकेशमध्ये वाद होताना दिसत आहे. आता या प्रोमो व्हिडीओवर चाहते भरभरून प्रतिसाद देत आहेत.

Mayur Patel : मद्यधुंद अवस्थेत कन्नड अभिनेत्याचा सुटला गाडीवरील ताबा; चार वाहनांना दिली धडक, FIR दाखल

वादाच्या दरम्यान राकेश थेट दिपालीवर आरोप करत म्हणतो की, “रंग बदलताना दिसत आहेत लोकं.” यावर दिपालीही शांत न राहता ठामपणे उत्तर देते. ती म्हणते, “रंग बदलताना मला त्याच दिवशी दिसलं, नॉमिनेशनच्या वेळी.” यानंतर राकेश दिव्याला सपोर्ट करण्याचा मुद्दा मांडतो आणि म्हणतो की तो तिच्या बाजूने उभा राहणार आहे. यावर दिपाली संतप्त होत प्रश्न विचारते, “मी तुझी मैत्रीण नव्हते का? तू neutral राहायला हवं होतंस.”

 

दिपाली पुढे स्पष्टपणे सांगते की, घरात प्रत्येकजण स्वतःचा खेळ खेळत आहे आणि अशा परिस्थितीत मैत्रीला बाजूला ठेवणं चुकीचं आहे. यावर राकेशही तितक्याच तीव्रतेने प्रतिक्रिया देत “थॅंकलेस असतात लोकं…” असं म्हणतो. या संवादातून दोघांमधील कटुता स्पष्टपणे समोर दिसून येत आहे. या तीव्र वादामुळे बिग बॉसच्या घरातलं वातावरण पूर्णपणे बदलून जातं. इतर घरसदस्यही या वादाकडे लक्ष देताना दिसतात. काही जण दिपालीच्या बाजूने उभे राहतात, तर काही राकेशच्या भूमिकेचं समर्थन करताना दिसणार का, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे.

दहशत अन् भीतीने भरलेले चेहरे, आणखी एक थरारक कथेची झलक; The Kerala Story 2 चे मोशन पोस्टर रिलीज

आता खरा प्रश्न असा आहे की, ही मैत्री कायमची संपणार की पुन्हा एकदा दोघांमध्ये संवाद होऊन सगळं पूर्वीसारखं होणार? की हा वाद ‘बिग बॉस मराठी’च्या खेळाला आणखी रंगतदार वळण देणार? दिपाली आणि राकेश यांच्यातील हा संघर्ष पुढे कोणतं रूप घेणार, हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे. तसेच आता ‘बिग बॉस’ च्या भागात पुढे काय घडणार हे जाणून घेण्यास चाहते आतुर आहेत.

Web Title: Bigg boss marathi 6 dipali sayyed vs raqesh bapat major fight

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2026 | 12:25 PM

Topics:  

  • bigg boss marathi 6
  • Colours Marathi
  • entertainment

संबंधित बातम्या

Taarak Mehta शोच्या सेटवर तोडफोड? गोकुलधाम सोसायटीचा व्हिडीओ पाहताच प्रेक्षकांची धडधड वाढली… अखेर निर्मात्यांनी सत्य सांगितलंच
1

Taarak Mehta शोच्या सेटवर तोडफोड? गोकुलधाम सोसायटीचा व्हिडीओ पाहताच प्रेक्षकांची धडधड वाढली… अखेर निर्मात्यांनी सत्य सांगितलंच

Dhamaal 4 Review : ‘धमाल 4’ हिट की फ्लॉप? काहींना हसवला, तर काहींनी चित्रपटाला म्हटलं ‘घटिया कॉमेडी’
2

Dhamaal 4 Review : ‘धमाल 4’ हिट की फ्लॉप? काहींना हसवला, तर काहींनी चित्रपटाला म्हटलं ‘घटिया कॉमेडी’

Colours Marathi Serial: ‘मी जिंकून घेईन सारं’मध्ये हायव्होल्टेज ड्रामा! शांभवीला छवीचा थेट इशारा; राजगुरू कुटुंबावर नवं संकट
3

Colours Marathi Serial: ‘मी जिंकून घेईन सारं’मध्ये हायव्होल्टेज ड्रामा! शांभवीला छवीचा थेट इशारा; राजगुरू कुटुंबावर नवं संकट

Marathi Serial: ‘मोहिनी’मध्ये मोठा ट्विस्ट! RK च्या आयुष्यात दीपाची एंट्री; सुपरस्टार जेलमध्ये जाणार?
4

Marathi Serial: ‘मोहिनी’मध्ये मोठा ट्विस्ट! RK च्या आयुष्यात दीपाची एंट्री; सुपरस्टार जेलमध्ये जाणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.