Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marathi Serial: ‘मोहिनी’मध्ये मोठा ट्विस्ट! RK च्या आयुष्यात दीपाची एंट्री; सुपरस्टार जेलमध्ये जाणार?

प्रेम, विश्वासघात, सूड आणि नात्यांमधील संघर्ष अशा अनेक भावनांचा संगम असलेल्या 'मोहिनी – प्रेमाची फिल्मी कहाणी' मालिकेत आता पुढे काय घडणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 08, 2026 | 12:41 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

‘मोहिनी – प्रेमाची फिल्मी कहाणी’ या कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिकेत सध्या एकापाठोपाठ एक धक्कादायक घडामोडी घडत असून, कथानकाने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. RK आणि त्याच्या कुटुंबातील वाढता संघर्ष आता निर्णायक वळणावर आला आहे. आपल्या वडिलांशी गैरवर्तन केल्यामुळे संतापलेल्या मोहिनीने थेट RK च्या कानशिलात लगावल्याने संपूर्ण कुटुंब हादरून गेले आहे.

या धक्क्यातून कुटुंब सावरत नाही, तोच RK च्या आयुष्यातील भूतकाळ पुन्हा समोर येतो. त्याची माजी प्रेयसी दीपा पुन्हा त्याच्या आयुष्यात दाखल झाली असून, ही भूमिका अभिनेत्री विधीशा म्हस्कर साकारत आहे. एकेकाळी दीपाच्या विश्वासघातामुळे प्रेमावरचा विश्वास गमावलेल्या RK च्या आयुष्यात मोहिनी आल्यावर अनेक बदल झाले होते. मात्र, दीपाच्या पुनरागमनामुळे पुन्हा एकदा त्याच्या भावविश्वात मोठं वादळ निर्माण होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

दरम्यान, दीपाने RK ची बंद पडलेली फिल्म स्वतः मुख्य अभिनेत्री बनून पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव दिला आहे. सुरुवातीला याला तीव्र विरोध करणारा RK अखेर परिस्थितीपुढे झुकतो आणि तिच्यासोबत काम करण्यास तयार होतो. मात्र, त्याच्या मनात प्रेम नसून केवळ सूडाची भावना असते. शूटिंगला सुरुवात होताच RK पुन्हा दारूच्या आहारी जातो आणि त्याचा रागीट व बेफिकीर स्वभाव संपूर्ण युनिटसाठी डोकेदुखी ठरतो.

DADA The Sourav Ganguly Story: ‘दादा’च्या भूमिकेत राजकुमार राव; सौरव गांगुली बायोपिकचा फर्स्ट लुक प्रदर्शित, रिलीज डेटही आली समोर

या सर्वांमध्ये RK मोहिनीला स्वतःची पर्सनल मेकअप आर्टिस्ट म्हणून कामावर ठेवतो. दीपाला जाणीवपूर्वक चिडवण्यासाठी तो मोहिनीचा वापर करू लागतो. या गोष्टीमुळे दीपासोबतच मोहिनीशी लग्न करण्याची इच्छा असलेला मुकुंदही संतप्त होतो. त्यामुळे मोहिनी, RK, दीपा आणि मुकुंद यांच्यातील नातेसंबंध अधिकच गुंतागुंतीचे बनतात.

याचदरम्यान कथानकात आणखी एक धक्कादायक ट्विस्ट येणार आहे. सुपरस्टार RK थेट जेलमध्ये जाणार असल्याचे प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे. मात्र, त्यामागचं नेमकं कारण काय? या संपूर्ण प्रकरणात मोहिनीची भूमिका काय असेल? RK च्या सूडाच्या प्रवासाचा शेवट कुठे होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं आगामी भागांमध्ये मिळणार आहेत.

‘मासिक पाळी सुरू होती, वॉशरूमलाही जाता आलं नाही’, ९ तास वाहतूक कोंडीत अडकली मराठी अभिनेत्री; सांगितला थरारक अनुभव

प्रेम, विश्वासघात, सूड आणि नात्यांमधील संघर्ष अशा अनेक भावनांचा संगम असलेल्या ‘मोहिनी – प्रेमाची फिल्मी कहाणी’ मालिकेत आता पुढे काय घडणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Major twist in mohini deepa enters rks life will the superstar land in jail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 12:41 PM

Topics:  

  • Colours Marathi
  • Entertainemnt News
  • marathi serial update

संबंधित बातम्या

Colors Marathi Serial: ‘मी जिंकून घेईन सारं’चे २०० भाग पूर्ण; बर्फावर अनवाणी उभी राहिली जान्हवी तांबट, सांगितला खडतर अनुभव
1

Colors Marathi Serial: ‘मी जिंकून घेईन सारं’चे २०० भाग पूर्ण; बर्फावर अनवाणी उभी राहिली जान्हवी तांबट, सांगितला खडतर अनुभव

Jai Jai Swami Samarth: ‘जागर शक्तीचा – महिमा स्वामींचा’; नवरात्रीत रंगणार स्वामी विरुद्ध रणजीत संघर्ष
2

Jai Jai Swami Samarth: ‘जागर शक्तीचा – महिमा स्वामींचा’; नवरात्रीत रंगणार स्वामी विरुद्ध रणजीत संघर्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.