Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Taarak Mehta शोच्या सेटवर तोडफोड? गोकुलधाम सोसायटीचा व्हिडीओ पाहताच प्रेक्षकांची धडधड वाढली… अखेर निर्मात्यांनी सत्य सांगितलंच

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: तारक मेहता शोमधील लोकप्रिय गोकुलधाम सोसायटीचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गोकुलधाम सोसायटीचा सेट तुटत असल्याचे पाहायला मिळत आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 11, 2026 | 10:32 AM
Taarak Mehta शोच्या सेटवर तोडफोड? गोकुलधाम सोसायटीचा व्हिडीओ पाहताच प्रेक्षकांची धडधड वाढली... अखेर निर्मात्यांनी सत्य सांगितलंच

Taarak Mehta शोच्या सेटवर तोडफोड? गोकुलधाम सोसायटीचा व्हिडीओ पाहताच प्रेक्षकांची धडधड वाढली... अखेर निर्मात्यांनी सत्य सांगितलंच

Follow Us
Follow Us:
  • गोकुलधाम सोसायटीचा सेट पाडला जात नसून त्याचे रिनोव्हेशन सुरू आहे.
  • व्हायरल व्हिडिओमुळे शो बंद होणार का, अशी चाहत्यांमध्ये चर्चा रंगली.
  • असित मोदी यांनी सेट नव्या लूकमध्ये लवकरच प्रेक्षकांसमोर येणार असल्याचे स्पष्ट केले.
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Gokuldham Renovation Video: ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ हा गेल्या 17 वर्षांपासून प्रेक्षकांचा आवडता टिव्ही शो आहे. या 17 वर्षांच्या प्रवासात अनेक कलाकार बदलले, अनेक पात्रांनी शोला रामराम केला तर अनेक नवीन चेहरे देखील पाहायला मिळाले. या सर्व बदलांमध्ये प्रेक्षकांसाठी एक गोष्ट कायम आहे. ही गोष्ट म्हणजे गोकुलधाम सोसायटी. गोकुलधाम सोसायटी ही एक अशी जागा आहे, जिधे जेठालाल, भिडे, पोपटलाल, अय्यर, डॉ. हाथी आणि इतर सर्व कलाकारांच्या रोजच्या जीवनातील गोष्टी पाहायला मिळाल्या.

Dhamaal 4 Review : ‘धमाल 4’ हिट की फ्लॉप? काहींना हसवला, तर काहींनी चित्रपटाला म्हटलं ‘घटिया कॉमेडी’

गोकुलधाम सोसायटीच्या सेटवर तोडफोड

तारक मेहता शोच्या प्रत्येक चाहत्याच्या मनात गोकुलधाम सोसायटी वसलेली आहे. मात्र आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओमुळे प्रेक्षकांची धाकधूक वाढली आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये गोकुलधाम सोसायटीच्या सेटवर मोठ्या प्रमाणात तोडफोड होत असल्याचे पाहायला मिळत आहे. चारही बाजूला मजूर काम करत असल्याचे दिसत आहेत, तसेच संपूर्ण सेट खांब आणि फळ्यांनी झाकून टाकण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांची धाकधूक वाढली आहे आणि गोकुलधाम सोसायटी आता कायमची संपणार आहे का, असा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण झाला आहे.  (फोटो सौजन्य: Instagram) 

व्हायरल व्हिडीओमुळे वाढली प्रेक्षकांची उत्सुका

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये गोकुलधाम सोसायटीचा लोकप्रिय सेट पाहायला मिळत आहे. हा सेट प्रेक्षक गेल्या अनेक वर्षांपासून पाहत आहेत. पण यावेळी सेटवर शूटिंग नाही तर तर कंस्ट्रक्शनच काम सुरु असल्याचं दिसत आहे. ठिकठिकाणी भिंती आणि स्ट्रक्चरवर काम सुरु असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओमुळे आता प्रेक्षकांनी वेगवेगळे अंदाज वर्तवण्यास सुरुवात केली आहे. एका यूजरने विचारले आहे की, शो बंद होणार आहे का? सेट तुटण्याचे कारण काय? तर दुसऱ्या यूजरने म्हटलं आहे की, गोकुलधामचा संपूर्ण सेट आता बदलणार आहे.

असित मोदीने सांगितलं सत्य

चाहत्यांची चिंता वाढत असतानाच आता शोचे प्रोड्यूसर असित कुमार मोदी यांनी स्वत: या व्हायरल व्हिडीओमागील संपूर्ण सत्य सांगितलं आहेत. त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की, गोकुलधाम सोसायटी कायमची तोडली जात नाही तर ती केवळ दुरुस्त केली जात आहे.

व्हिडीओमध्ये असित मोदी यांनी म्हटलं आहे की, जे होत आहे चांगल्यासाठी होत आहे. गोकुलधाम सोसायटी दुरुस्त केली जात आहे. काही दिवसांनी तुम्हाला नव्या रंग-रुपात आणि एका नव्या अवतारात आपली गोकुलधाम सोसायटी पाहायला मिळणार आहे. देवाकडे प्रार्थना आहे की, तुम्हाला सोसायटीचे हे नवीन रुप नक्कीच आवडेल. व्हिडिओमध्ये असित मोदी कामाचा आढावा घेतानाही दिसत आहेत. ते कार्यस्थळावरील अभियंते, पर्यवेक्षक आणि कामगारांशी संवाद साधत आहेत आणि काम सुरक्षितपणे पूर्ण होईल याची खात्री करण्यासाठी सूचना देत आहेत.

Prashant Damle : प्रशांत दामलेंच्या जबाबदारीत वाढ! मुंबईच्या महापौरांनी सुपूर्त केले नियुक्तीपत्र; सर्वानुमते मिळाली मंजुरी

प्रेक्षकांची उत्सुकता वाढली

गोकुलधाम सोसायटीच्या सेटला आधुनिक लुक देण्याची तयारी सुरु आहे. सेटच्या अनेक भागांना नवीन डिझाईन दिले जाईल, ज्यामुळे सेट आधीपेक्षा जास्त आकर्षक आणि फ्रेश विजुअल अनुभव देईल. यापूर्वी देखील शो मध्ये गोकुलधाम सोसायटीचे रेनोवेशन करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा गोकुलधाम सोसायटी एका नव्या रुपात पाहायला मिळणार आहे. ज्यामुळे प्रेक्षकामध्ये उत्सुकता वाढली आहे.

Web Title: Taarak mehta ka ooltah chashmah gokuldham society renovation video viral on instagram

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 10:31 AM

Topics:  

  • entertainment
  • instagram
  • Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
  • Video Viral

संबंधित बातम्या

Viral News : २१ पत्नींसोबत बांग्लादेशी भिकाऱ्याचा अनोखा संसार! ८ जणींचीच नावे लक्षात; रोज एका बायकोला सोबत नेऊन मागतो भीक
1

Viral News : २१ पत्नींसोबत बांग्लादेशी भिकाऱ्याचा अनोखा संसार! ८ जणींचीच नावे लक्षात; रोज एका बायकोला सोबत नेऊन मागतो भीक

अजब-गजब! प्राणीसंग्रहालयातून नव्या नवरीला घेऊन बाॅयफ्रेंड फरार, नवरा गाडी पार्क करायला गेला अन् घटनेचा Video Viral
2

अजब-गजब! प्राणीसंग्रहालयातून नव्या नवरीला घेऊन बाॅयफ्रेंड फरार, नवरा गाडी पार्क करायला गेला अन् घटनेचा Video Viral

वर्गात गुरुजींचे संतापजनक कृत्य! चिमुरड्याच्या डोक्यावरच बजावला तबला; VIDEO व्हायरल होताच गेली नोकरी!
3

वर्गात गुरुजींचे संतापजनक कृत्य! चिमुरड्याच्या डोक्यावरच बजावला तबला; VIDEO व्हायरल होताच गेली नोकरी!

Mohini Serial: ‘मोहिनी’मध्ये रंगणार तलवारबाजीचा थरार; समीर परांजपे आणि अनघा ठाकूरने घेतली विशेष मेहनत
4

Mohini Serial: ‘मोहिनी’मध्ये रंगणार तलवारबाजीचा थरार; समीर परांजपे आणि अनघा ठाकूरने घेतली विशेष मेहनत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.