Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BB Marathi 6 : ‘बिग बॉस म्हणजेच ट्विस्ट…’, प्राजक्ताने घराबाहेर पडताच उघड केला सदस्यांचा गेम, म्हणाली ‘विशालवरच विश्वास होता’

'बिग बॉस' च्या घरात या आठवड्यात खूप धक्कादायक नॉमिनेशन झाले आहे आणि महाराष्ट्राची लाडकी गायिका प्राजक्ता शुक्रे घरा बाहेर पडली. अशातच आता नवराष्ट्रसोबत गप्पा मारताना प्राजक्ताने आपल्या गेमबद्दल सांगितले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 17, 2026 | 11:38 AM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • प्राजक्ताने घराबाहेर पडताच उघड केला सदस्यांचा गेम
  • राकेश आणि विशालला दुखावले मन
  • घरातील सदस्यांबद्दल काय म्हणाली?
 

‘बिग बॉस मराठी 6’च्या घरातील सुरांची राणी आणि शांत, संयमी खेळासाठी ओळखली जाणारी प्राजक्ता शुक्रे अखेर घरातून बाहेर पडली आहे. रविवारी ‘भाऊंचा धक्का’ या एपिसोडमध्ये तिच्या एलिमिनेशनने संपूर्ण घरात एक वेगळीच शांतता पसरली. तिच्या बाहेर पडण्याने विशेषतः ‘बाल्कनी ग्रुप’ला मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळाले आहे.

घरात नेहमी शांतपणे आणि समजूतदारपणे गेम खेळणाऱ्या प्राजक्ता शुक्रेने प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी छाप निर्माण केली होती. वादांपासून दूर राहून, टास्कमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत तिने स्वतःचा गेम मजबूत ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिचं अचानक झालेलं एलिमिनेशन अनेकांसाठी धक्कादायक ठरलं आहे. घरातून बाहेर आल्यानंतर प्राजक्ता शुक्रेने नवराष्ट्रासोबत भरभरून गप्पा मारल्या. आणि तिने घरातील सदस्यांचा देखील गेम उघड केला आहे.

सुबोध भावेच्या दमदार आवाजात “फुला”चा टीझर रिलीज! वाघ्या-मुरळी संस्कृतीवर भाष्य करणारा चित्रपट

तिने सांगितलं की, बिग बॉसच्या घरातला तिचा प्रवास खूप खास होता आणि प्रत्येक क्षण तिने मनापासून अनुभवला. तिने प्रेक्षकांचे आणि चाहत्यांचे आभार मानत त्यांच्या प्रेमामुळेच इतक्या दिवसांपर्यंत टिकून राहता आलं, असंही नमूद केलं. प्राजक्ताला तू घराबाहेर पडणं फेअर होतं की अनफेअर होतं? असं विचारले असता प्राजक्ता म्हणाली, ‘हो, मी आणखी राहायला हवं होतं ‘बिग बॉस’च्या घरात, कारण मी गेम खूप चांगला खेळली आहे माझ्या पद्धतीने आणि मला टास्क लवकर समजायचे.’ इतरांच्या पद्धती टास्क खेळायच्या वेगळ्या होत्या, ‘बिग बॉस’च्या घरात सदस्यांचा आरडा- ओरड करण्याचा गेम होता. परंतु मला तसे समजले नाही, मी नेहमीच माझ्या शैलीत प्रत्येक टास्क रंगवला आहे. म्हणून मला वाटतं की ‘बिग बॉस’च्या घरात आणखी काही दिवस राहण्यास मी पात्र होते.’

 

‘बिग बॉस’च्या घरात असा कोणता धक्का तुला मिळाला आहे, ज्या सदस्यावर तू विश्वास ठेवला आणि त्याचा तुला धक्का मिळाला? याबद्दल सांगताना प्राजक्ता म्हणाली, “‘बिग बॉस’च्या घरात चावीच्या भागात जे घडलं ते माझ्यासाठी धक्कादायक होतं, कारण मी विशालवर खूप विश्वास ठेवला होता. आणि त्याने त्याचा फायदा उचलला मला या गोष्टीचे खूप वाटले होते तेव्हा, राकेशबद्दल बोलायचे झाले तर, तो माझ्या समोर तोंडावर काही वेगळं बोलायचा आणि गेम त्याचा वेगळा खेळायचा. ती ॲक्शनमध्ये सतत मला नॉमिनेट करत होता हे मला खूप वाईट वाटलं. ‘

Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस मराठी’मध्ये नवा ट्विस्ट! कॅप्टन संकेत पाठकच्या एका निर्णयाने वाढला घरातील सदस्यांचा वाद

तसेच, सदस्यांच्या गेमबद्दल बोलताना प्राजक्त पुढे म्हणाली, ”बिग बॉस’च्या घरात कोणीच खरं वागत नाही आहे, सगळेच आपआपला गेम खेळतायत आणि त्यांच्या सोईनुसार वागतायत हे मला समजलं.’ असे म्हणत प्राजक्ताने घरातील सदस्यांचा गेम उघड केला आहे. एकूणच, प्राजक्ता शुक्रेचा ‘बिग बॉस मराठी 6’मधील प्रवास संपला असला, तरी तिच्या खेळाची आणि व्यक्तिमत्त्वाची चर्चा मात्र पुढेही कायम राहणार आहे. आणि ती तिच्या पुढच्या आयुष्यात नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहे.

 

Web Title: Bigg boss marathi 6 prajakta shukre elimination first reaction balcony group shock

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 11:38 AM

Topics:  

  • bigg boss marathi 6
  • entertainment
  • Marathi News

संबंधित बातम्या

National Award: योगेश देशपांडेला मिळाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘स्वर्गंधर्व सुधीर फडके’साठी सन्मान
1

National Award: योगेश देशपांडेला मिळाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘स्वर्गंधर्व सुधीर फडके’साठी सन्मान

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
2

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
3

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
4

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.