Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Exclusive: ‘वाईट प्रवृत्ती कितीही शक्तिशाली असली तरी…’, सुनील गोडसे साकारणार स्वामींच्या भूमिकेत जागर शक्तीचा

Exclusive: ‘जय जय स्वामी समर्थ’ या कलर्स मराठीवरील मालिकेत ‘जागर शक्तीचा – महिमा स्वामींचा’ हे पर्व सुरू होत आहे आणि नवरात्रीच्या निमित्ताने अभिनेता सुनील गोडसे यांनी नवराष्ट्रशी खास बातचीत केली आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 11, 2026 | 07:16 AM
Exclusive: स्वामींची भूमिका साकारणाऱ्या सुनील गोडसेंचे नवरात्रीचे रुप, साकारणार नऊ देवी

Exclusive: स्वामींची भूमिका साकारणाऱ्या सुनील गोडसेंचे नवरात्रीचे रुप, साकारणार नऊ देवी

Follow Us
Follow Us:

Exclusive: कलर्स मराठीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेत ‘जागर शक्तीचा – महिमा स्वामींचा’ या विशेष भागात स्वामी एका बाजूला स्त्रीशक्तीला संघर्षासाठी प्रवृत्त करत आहेत आणि दुसरीकडे रणजीतसारख्या महिषासुरी प्रवृत्तीला खडे बोल सुनावत आहेत. प्रेक्षकांसाठी ही मालिका म्हणजे एक पर्वणी आहे. देवीच्या नऊ रूपांचा भास व स्वामींची लीला: या विशेष पर्वात देवीच्या नऊ रूपांच्या पार्श्वभूमीवर स्वामींचा हा प्रवास उलगडताना दाखविण्यात येणार आहे. नवरात्रीनिमित्ताने स्वामींची भूमिका साकारणारे सुनील गोडसे यांच्याशी ‘नवराष्ट्र’ने खास गप्पा मारल्या आणि जाणून घेतले त्यांचे अनुभव. 

हा तीव्र संघर्ष आणि मालिकेतील हा टप्पा अभिनेता म्हणून तुमच्यासाठी किती आव्हानात्मक आणि वेगळा ठरला आहे? असं विचारल्यावर सुनील गोडसे यांनी सांगितले की, ‘या मालिकेतील प्रत्येक भाग हा खूप महत्वाचा असतो. पण ‘जागर शक्तीचा – महिमा स्वामींचा’ हे अधिक महत्त्वाचं वाटतं कारण महिलांमधील स्त्री शक्ती जागृत करण्यासाठी, आत्मविश्वास जागा कऱण्यासाठी आपण हे भाग प्रसारित करत आहोत. अनादी काळापासून स्त्री वर जुलूम करणारे महिषासुर हे निर्माण झालेच आहेत. हा भाग माझ्याकरिता खूप महत्त्वाचा आणि वेगळा आहे’

Swami Samarth Story: श्री स्वामी समर्थांच्या आत्मलिंग पादुकांचा अद्भुत इतिहास; जाणून घ्या मठाचे धार्मिक महत्त्व

जेव्हा तुम्ही पडद्यावर हा स्त्रीशक्तीचा जागर आणि स्वामींची ही करारी भूमिका साकारता, तेव्हा प्रत्यक्ष सेटवर तो माहूर किंवा अक्कलकोटच्या लीलेचा अनुभव कसा असतो? यावर उत्तर देताना सुनील गोडसे म्हणाले की, ‘हा अनुभव खूपच सुंदर असतो, विशेषतः माहुर किंवा अक्कलकोट असं सांगण्यापेक्षा सेटवर पीडित महिला येतात तेव्हा सादर करताना वेगळा अनुभव येतो. आपण काहीतरी वेगळं करतोय म्हणण्यापेक्षा स्वामी आपल्याकडून करून घेत असल्याचं वाटतंय. नवरात्रीच्या निमित्ताने हा अनुभव घेता येत आहे’

स्वामींच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्यापासून तुम्हाला मिळालेला लोकांचा प्रतिसाद आणि जेव्हा चाहते तुम्हाला प्रत्यक्ष भेटतात तेव्हा होणारा भावनिक अनुभव कसा आहे? असं विचारल्यावर सुनील गोडसे म्हणाले की, ‘अवर्णनीय हा एकच शब्द याला पुरेसा आहे. कारण मी जेव्हापासून या मालिकेत काम करायला सुरूवात केली ना तेव्हापासून बाहेर कुठेही असलो तरी प्रेक्षकांचा मला मिळणारा प्रतिसाद हा अवर्णयीन आहे. अंगावर काटा येतो, ती भूमिका करताना आम्ही तुमच्यात स्वामी बघतो असं म्हणून महिला पाया पडतात. मी जे काम करतोय त्याची पावती मिळत आहे असं वाटतं आणि या कामाचं वेगळं समाधान मिळतंय.’

नवरात्रीच्या या पर्वातून रणजीतसारख्या शक्तींचा अंत आणि विजयादशमीच्या सीमोल्लंघनाचा जो संदेश दिला जात आहे, तो आजच्या काळातील प्रेक्षकांशी कसा जोडला गेला आहे असं तुम्हाला वाटतं? यावर सुनील गोडसे म्हणाले की, ‘आजच्या काळातील युवकांशी तो खरंच जोडला गेलाय असं मला वाटतं. कारण ही एक खूपच महत्त्वाची गोष्ट आहे, की आपण नक्की कोणत्या गोष्टींचं सीमोल्लंघन करायचं असेल तर चांगल्या गोष्टींसाठी करून जी स्त्री शक्ती जागी होत आहे त्यामागे खंबीरपणे उभं रहायला हवं असं मला वाटतं’

अभिनेता म्हणून तो प्रवास मानसिक आणि शारीरिक पातळीवर किती कठीण आणि तितकाच ऊर्जा देणारा होता? ‘हा प्रवास कठीण तर नक्कीच होता पण त्याच्या दुप्पट नऊ देवींची रुपं साकारतना मला दुप्पट उर्जा मिळाली आणि प्रेक्षक मला यावर नक्की चांगला प्रतिसाद देतील अशी मला खात्री आहे आणि अगदी पुढेही काम करताना ही देवीची उर्जा मला नक्कीच उपयोगी ठरेल असा विश्वास वाटतो’ असं त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलं. 

रणजीतसारख्या सत्तेचा गैरवापर करणाऱ्या प्रवृत्तीविरुद्ध चार स्त्रियांना एकत्र आणून स्वामी त्यांना जो लढा द्यायला शिकवतात, तो प्रेक्षकांच्या मनावर आणि विशेषतः आजच्या पिढीवर कसा प्रभाव पाडेल? यावर सुनील गोडसे म्हणाले की, ‘नक्कीच चांगला प्रभाव पाडेल. कारण इथे जरी प्रतिकात्मक ४ महिला घेतल्या असल्या तरीही त्या आपल्या पिढीतील महिलांचं नक्कीच प्रतिनिधित्व करत आहेत. स्वामी जी शक्ती जागृत करत आहोत ती उर्जा प्रेक्षकांच्या मनात निर्माण होईल आणि समाज ही उर्जा चांगल्या पद्धतीने नक्कीच स्वीकारेल अशी मला खात्री आहे.’

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे… स्वामी समर्थ महाराज कधी प्रकट झाले? जाणून घ्या समर्थ कोणाचे अवतार होते

स्वामींची भूमिका करताना श्रद्धा आणि अभिनय यांच्यातील समतोल कसा साधला? आणि हे आव्हान कसे पेलले? यावर अगदी ठामपणे स्वामींवरील विश्वास दाखवत सुनील यांनी सांगितले की, ‘श्रद्धा होतीच आणि स्वामींची भूमिका करायला मिळण्याची इच्छा होती आणि ती स्वामींच्या कृपेने मिळाली आणि माझ्याकडून स्वामीच ते काम करवून घेत आहेत असं मी ठामपणे सांगेन. भावनिक म्हणाल तर प्रत्येक कलाकार हा भावनिक नसेल तर त्याला हावभावातून ते प्रेक्षकांपर्यंत पोहचवता येणार नाही. तुम्ही जेव्हा भावना प्रकट करता तेव्हा प्रेक्षक लवकर तुम्हाला स्वीकारतात आणि अशाच पद्धतीने हे आव्हान पेलल्यासारखं मला वाटतं’ 

वाईट प्रवृत्ती कितीही शक्तिशाली असली, तरी सत्य आणि न्यायाचा विजय होऊ शकतो, हा विचार आजच्या प्रेक्षकांसाठी किती महत्त्वाचा आहे? यावर त्यांनी सांगितले की, ‘हा विचार खूप महत्त्वाचा असून १०० टक्के सत्य आहे. आपली महाकाव्य आहेत, त्या अभ्यासातून लक्षात येतं की, अंतिम विजय हा सत्याचाच असतो. शेवटी वाईट शक्तीचा अंत हा ठरलेला आहे आणि तो आजच्या युगातही होणार यात कोणताही वाद नाही.’ 

‘जागर शक्तीचा – महिमा स्वामींचा’ पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी कोणता विचार सोबत घेऊन जावा? यावर पटकन सुनील गोडसेंनी सांगितले की, ‘जागर शक्तीचा जरी असला तरीही तो खरं तर स्त्री शक्तीचा आहे. अनादी अनंत कालापासून प्रत्येकवेळी स्त्री शक्तीच जगाला तारण्यासाठी पुढे आली आहे, ती माता-भगिनी आहे आणि स्त्री शक्तीने प्रत्येकवेळी समाजाला तारून नेलंय, याबाबत माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. ही स्त्री शक्ती आताच्या काळात जागृत होणं खूप गरजेचे आहे. ’

ही केवळ चार स्त्रियांची कथा नाही. ही प्रत्येक स्त्रीच्या अंतर्मनात दडलेल्या शक्तीची, आत्मसन्मानाची आणि स्वतःसाठी उभं राहण्याच्या सामर्थ्याची गोष्ट आहे! त्यामुळे हे पर्व नक्की पहा असं सांगत सुनील गोडसे यांनी प्रेक्षकांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. 

Web Title: Exclusive suni godase on jagar shakticha mahima swamincha on colors marathi dn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 07:16 AM

Topics:  

  • colors marathi
  • Shree Swami Samarth

संबंधित बातम्या

Navarashtra Exclusive: ऑक्टोबरमध्येच पाण्यासाठी टाहो! पाथर्डीत हजारो फळझाडांचे भवितव्य टांगणीला
1

Navarashtra Exclusive: ऑक्टोबरमध्येच पाण्यासाठी टाहो! पाथर्डीत हजारो फळझाडांचे भवितव्य टांगणीला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.