Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मला भीती होती…’ दीपज्योती मध्ये पूर्वा कौशिक चा नवा अवतार, मालिकेतील भूमिकेबद्दल अभिनेत्रीने केला खुलासा

१३ एप्रिल पासून सुरू होणारी नवी मालिका ‘दीपज्योती’ प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. या मालिकेत अभिनेत्री पूर्वा कौशिक एका नव्या भूमिकेत दिसणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Apr 06, 2026 | 01:50 PM
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

झी मराठी अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी अनेक मालिका घेऊन येत असते. लवकरच एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १३ एप्रिल पासून सुरू होणारी नवी मालिका ‘दीपज्योती’ प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. या मालिकेत अभिनेत्री पूर्वा कौशिक एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्या आधीच्या भूमिकांपेक्षा पूर्णतः वेगळी असलेली ‘ज्योती’ ही व्यक्तिरेखा साकारताना तिचा अनुभव, तयारी आणि भावना व्यक्त केल्या. “झी मराठीवर परत एकदा ‘दीपज्योती’सोबत येते आहे आणि माझ्या भूमिकेचं नाव आहे ‘ज्योती’ . माझ्या आधीच्या भूमिकेपेक्षा ही खूप वेगळी भूमिका आहे. ज्योती ही खूप समजूतदार, गुणी, घरगुती आणि साधी, गोड अशी मुलगी आहे. तिला नटण्याची-सजण्याची आवड आहे आणि ती खूप सुंदर दिसते. तिला दोन बहिणी आणि एक भाऊ आहे आणि ती आईसोबत राहते. वडीलही आहेत, पण त्यांच्या व्यसनामुळे तिला त्यांच्यावर खूप राग आहे. ज्योतीची ही सोज्वळ भूमिका प्रेक्षकांना नक्की आवडेल.

आधीही मी झी मराठीवर ‘शिवा’ नावाची भूमिका साकारली होती, जी खूप वेगळी होती आणि सर्वसामान्य मुलींसारखी नव्हती. त्यामुळे मला भीती होती की त्या भूमिकेनंतर मला पुन्हा मुख्य नायिकेची भूमिका मिळेल का. तसेच, पुन्हा एका साध्या मुलीच्या भूमिकेत प्रेक्षक मला स्वीकारतील का, असा प्रश्न मनात होता. पण झी मराठीने माझा हा समज मोडून काढला. त्यामुळे ‘ज्योती’च्या भूमिकेसाठी जेव्हा कॉल आला तेव्हा माझा आनंद गगनात मावेनासा झाला. तो क्षण शब्दांत सांगणं कठीण आहे. ही भूमिका माझ्या आधीच्या भूमिकेपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. या भूमिकेसाठी तयारी करताना माझ्या मनात सतत माझ्या आधीच्या भूमिकेशी तुलना होत राहते. खऱ्या आयुष्यात माझा स्वभाव थोडा थेट आहे. ‘शिवा’ करताना मला एवढी तयारी करावी लागली नव्हती, जितकी ‘ज्योती’साठी करावी लागत आहे. ज्योती ही खूप समजूतदार, नाजूक आणि सोज्वळ मुलगी आहे. तिचं राहणीमान, वागणं आणि तिचा साधेपणा साकारण्यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागत आहे.

‘Dhurandhar 2’ चा 19 व्या दिवशीही ऐतिहासिक विक्रम; ₹1000 कोटींची कमाई करणारा ठरला पहिला चित्रपट

ज्योतीचं बोलणं, वागणं, तिचे हावभाव, तिचं बघणं, राग व्यक्त करण्याची पद्धत, तिचा अबोला आणि तिचा साधेपणा – हे सगळं खूप सूक्ष्म आहे. या सगळ्याची तयारी करणं माझ्यासाठी सध्या तारेवरची कसरत आहे. पण ही भूमिका करताना मला खूप आनंदही मिळतो आहे. मला हळू बोलायचं आहे, शब्दांचा तोल राखायचं आहे आणि वागताना स्वतःला ओव्हर दाखवायचं नाही. साध्या मुलीची भूमिका करणं सोपं वाटत असलं तरी माझ्यासाठी ते आव्हानात्मक आहे. मी खूप मेहनत घेत आहे आणि ती प्रेक्षकांना नक्की दिसेल. प्रोमोला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, ज्योतीच्या भूमिकेबद्दल मला थोडी भीती आहे – मी कशी दिसेन आणि प्रेक्षकांना कितपत आवडेन याची. पण मी पूर्ण प्रयत्न करत आहे की प्रेक्षक ज्योतीवरही तितकंच प्रेम करतील. प्रेक्षकांमध्ये या भूमिकेबद्दल उत्सुकता आहे, याचा मला आनंद आहे. आम्ही सर्वजण पहिल्यांदा भेटलो तेव्हा एपिसोडचं वाचन होतं. तेव्हाच सगळ्यांची ओळख झाली. माझ्या बहिणींच्या भूमिका करणाऱ्या मानसी आणि सलोनी खूप छान आहेत. शूटिंगच्या पहिल्याच दिवशी असं वाटलं की आपण खूप दिवसांपासून एकत्र काम करत आहोत. संपूर्ण टीम पहिल्याच दिवशी खूप छान मिसळून गेली.”

सोशल मीडियाला ‘उलटीचा पॉट’ म्हणत Paresh Rawal यांनी केली टीका; ‘धुरंधर 2’ वादामुळे रंगली चर्चा

Web Title: I was scared purva kaushik reveals details about her role unveils a new avatar in deepjyoti

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 01:50 PM

Topics:  

  • marathi serial news
  • New Marathi Serial
  • zee marathi

संबंधित बातम्या

Veen Doghantali Hi Tutena : समर-स्वानंदीच्या आयुष्यात येणार नवा बहर; फुलणार सुखी संसार, मालिकेत पाहायला मिळणार नवा ट्विस्ट!
1

Veen Doghantali Hi Tutena : समर-स्वानंदीच्या आयुष्यात येणार नवा बहर; फुलणार सुखी संसार, मालिकेत पाहायला मिळणार नवा ट्विस्ट!

Dhaktya Sunbai Marathi Serial: अंबाबाईचं दर्शन, मनात श्रद्धा अन् हातात काम! मंदार जाधवांनी कोल्हापुरात केला शूटिंगचा श्रीगणेशा
2

Dhaktya Sunbai Marathi Serial: अंबाबाईचं दर्शन, मनात श्रद्धा अन् हातात काम! मंदार जाधवांनी कोल्हापुरात केला शूटिंगचा श्रीगणेशा

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा
3

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.