(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
रणवीर सिंगचा ‘धुरंधर 2: द रिव्हेंज’ हा चित्रपट 6 एप्रिल 2026 रोजी प्रदर्शित होऊन 18 व्या दिवशीही जोरदार कमाई करत आहे. आदित्य धर दिग्दर्शित या थ्रिलर चित्रपटाने अनेक बॉक्स ऑफिस विक्रम मोडले असून, अमेरिकेत सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. तसेच, या चित्रपटाने ‘धुरंधर’च्या कलेक्शनलाही मागे टाकले आहे.
अनेक स्टार्सनी सजलेल्या या अॅक्शनपटाने रिलीजच्या पहिल्याच आठवड्यात 674.17 कोटी रुपयांची कमाई केली, तर दुसऱ्या आठवड्यात 263.65 कोटींचा गल्ला जमवला. आता या चित्रपटाने भारतात 1000 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. लवकरच हा चित्रपट ‘बाहुबली २: द कन्क्लुजन’ च्या 1030.42 कोटींच्या कलेक्शनलाही मागे टाकण्याची शक्यता आहे. आता सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे की, ‘धुरंधर 2’ हा चित्रपट अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २: द रुल’ या भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाला मागे शक्यता आहे. ‘पुष्पा 2’ने भारतात 1234.10 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
‘धुरंधर 2: द रिव्हेंज’चा बॉक्स ऑफिसवर धडाका कायम असून, सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार चित्रपटाने 18 व्या दिवशी म्हणजे रविवारी 34.44 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या आकड्यांत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यासह, चित्रपटाचे भारतातील एकूण नेट कलेक्शन 1013.77 कोटी रुपयांवर पोहोचले असून, एकूण ग्रॉस कलेक्शन 1213.74 कोटी रुपये झाले आहे. या ऐतिहासिक यशासह ‘धुरंधर 2’ हा भारतात 1000 कोटी रुपयांचा नेट कलेक्शन करणारा पहिला बॉलीवूड चित्रपट ठरला आहे. सध्या या आकड्यापुढे फक्त दक्षिणेतील काही चित्रपटच आघाडीवर आहेत.
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर 2: द रिव्हेंज’ने भारतीय बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. सर्व भाषांमध्ये मिळून 1000 कोटी रुपयांचा टप्पा पार करणारा हा पहिला बॉलीवूड चित्रपट ठरला आहे. भारतीय चित्रपटांमध्ये, पुष्पा २: द रुल आणि बाहुबली २: द कन्क्लुजन नंतर ही कामगिरी करणारा हा तिसरा चित्रपट आहे. जागतिक कमाईबाबत बोलायचे झाल्यास, या चित्रपटाने 1598.74 कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे.
‘हास्यजत्रा’ फेम Gaurav More ने केलं गुपचूप लग्न; नवीन घरासोबत चाहत्यांना दिली डबल गुडन्यूज
‘धुरंधर 2’ यादीतील तिसऱ्या क्रमांकावर
पुष्पा २ ₹१२३४.१० कोटी
बाहुबली 2 ₹१०३०.४० कोटी
धुरंधर २ ₹१,०१३.७७ कोटी
या स्पाय-अॅक्शन थ्रिलर चित्रपटाने रिलीजपासूनच बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा कायम ठेवला आहे आणि मोठ्या सुट्ट्यांचा फायदा न मिळूनही तो प्रेक्षकांमध्ये तुफान चालला आहे. अवघ्या 18 व्या दिवशीच या चित्रपटाने 1000 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाने केवळ हिंदी भाषेतच 900 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली असून, हिंदीमध्ये ही कामगिरी करणारा तो पहिलाच चित्रपट ठरला आहे.






