Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jahnavi Killekar : ओम यादवसोबत केले देवदर्शन! ‘तुम्ही लग्न करा’, ‘जोडी छान दिसते…’ कमेंट्स पाहून तापला अभिनेता

अभिनेत्री जान्हवी किल्लेकर आणि अभिनेता ओम यादव यांचा जेजुरी दर्शनाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे. या व्हिडीओनंतर दोघांच्या नात्याबाबत नेटकऱ्यांनी विविध तर्क-वितर्क लावत "लग्न करा" आणि "तुमची जोडी छान दिसते" अशा कमेंट्स केल्या.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 07, 2026 | 05:20 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • सध्या अभिनेत्री जान्हवी किल्लेकर आणि अभिनेता ओम यादव यांच्याबाबत सोशल मीडियावर अशीच चर्चा!
  • अभिनेता ओम यादवचा जेजुरी दर्शनाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
  • “दोघे फक्त मित्र आहेत”, “कलाकारांनाही वैयक्तिक आयुष्य असते” अशा प्रतिक्रिया देत अनेकांनी जान्हवी आणि ओमची बाजू घेतली.
फक्त अभिनय नव्हे तर सोशल मीडियावर पोस्ट केल्या जाणाऱ्या गोष्टीही एका कलाकाराला लोकांच्या चर्चेत आणण्यासाठी पुरेशा असतात. आपल्या आवडत्या चाहत्याच्या पोस्टवर कमेंट्स करण्यासाठी काही चाहते तर वाट पाहत बसलेले असतात. पण चाहतेमंडळी कधी कौतुक करतात तर कधी आपल्या आवडत्या कलाकाराच्या गोष्टी पटल्या नाहीत तर त्याला ट्रॉलही करतात. सध्या अभिनेत्री जान्हवी किल्लेकर आणि अभिनेता ओम यादव यांच्याबाबत सोशल मीडियावर अशीच चर्चा रंगली आहे.

‘भाग्य दिले तू मला’, ‘आई तुळजाभवानी’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकणारी जान्हवी किल्लेकर सोशल मीडियावरही सक्रिय असते. Bigg Boss Marathi Season 5 मधल्या या किलर गर्लने बिग बॉस संपल्यानंतर सिनेक्षेत्रात खरी धमाल करण्यास सुरुवात केली. आता महाराष्ट्रातल्या बहुतेक कार्यक्रमात जान्हवी किल्लेकरचीच हवा असते. परंतु, तिचा आणि अभिनेता ओम यादवचा जेजुरी दर्शनाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ओम यादवने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जान्हवी आणि ओम जेजुरीच्या श्री मार्तंड देवस्थानात दर्शन घेताना दिसत आहेत. दोघांनी पारंपरिक पद्धतीने देवदर्शन केले असून भंडाराही उधळल्याचे व्हिडीओत पाहायला मिळते. दर्शनानंतर अनेक चाहत्यांनी त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी गर्दी केल्याचेही दिसून आले.

बॉलिवूडला रामराम? ग्लॅमर सोडून आध्यात्माच्या मार्गावर निघाली परिणीती चोप्रा? सोशल मीडियावर शेअर केली खास पोस्ट

हा व्हिडीओ पोस्ट करताना ओम यादवने “जेजुरी दर्शन” असे कॅप्शन दिले होते. त्यावर जान्हवीने “यळकोट यळकोट जय मल्हार” अशी प्रतिक्रिया दिली. मात्र, या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर दोघांच्या नात्याबाबत विविध तर्क-वितर्क लावले जाऊ लागले.

नेटकऱ्यांनी केली Trolling!

अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना “तुम्ही लग्न करा”, “तुमची जोडी खूप छान दिसते”, “लग्न झालं का?”, “अभिनंदन, जोडी भारी आहे” अशा कमेंट्स केल्या. काहींनी तर जान्हवी विवाहित असल्याचा मुद्दा उपस्थित करत तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही प्रतिक्रिया दिल्या. मात्र, दुसऱ्या बाजूला अनेक चाहत्यांनी या ट्रोलिंगला विरोध केला. “तिच्या नवऱ्याला काही अडचण नाही, मग इतरांनी का बोलावे?”, “एकत्र दिसले म्हणजे अफेअर आहे असे नाही”, “दोघे फक्त मित्र आहेत”, “कलाकारांनाही वैयक्तिक आयुष्य असते” अशा प्रतिक्रिया देत अनेकांनी जान्हवी आणि ओमची बाजू घेतली.

या सर्व चर्चांनंतर ओम यादवने स्वतः कमेंट करत संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिले. त्याने म्हटले की, “अति उत्साही कमेंट करणाऱ्यांनी गैरसमज करून घेऊ नये. आम्ही फक्त एकमेकांना पाठिंबा देणारे चांगले मित्र आहोत आणि कायम राहू. कार्यक्रमांच्या निमित्ताने आम्ही महाराष्ट्रभर फिरत असतो. ज्या भागात कार्यक्रम असतो, त्या भागातील प्रसिद्ध देवस्थानांना भेट देण्याची आमची सवय आहे. जेजुरी दर्शनही त्याचाच एक भाग होता.” ओमने पुढे स्पष्ट केले की, जेजुरीला जाताना जान्हवीचे संपूर्ण कुटुंबदेखील त्यांच्यासोबत होते. त्यामुळे सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे त्याने सांगितले. तसेच विविध कार्यक्रमांमध्ये आयोजकांच्या आग्रहास्तव दोघांना एकत्र डान्स परफॉर्मन्स करावे लागतात. त्यामुळे त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात.

‘तू ही रे माझा मितवा’ मध्ये ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री, अर्णवसमोर उभे राहणार मोठे आव्हान; कथानकाला मिळणार वेगळं वळण

“आयोजक आणि प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही कलाकार म्हणून मंचावर एकत्र सादरीकरण करतो. त्याचा वेगळा अर्थ काढू नये. प्रेक्षकांना आमची जोडी आवडते याचा आम्हाला आदर आहे. मात्र, कमेंट करताना वास्तव लक्षात घ्यावे,” असेही ओम यादवने नमूद केले. दरम्यान, जान्हवी किल्लेकरनेदेखील तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर जेजुरी दर्शनाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्या कुटुंबातील सदस्य स्पष्टपणे दिसत आहेत. त्यामुळे ओम यादवने दिलेल्या स्पष्टीकरणाला आणखी दुजोरा मिळाल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Jahnavi killekar and om yadav got trolled for jejuri video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 05:20 PM

Topics:  

  • Janhvi Killekar
  • Wedding

संबंधित बातम्या

Video: नादच खुळा! लग्नात आलेल्या तरुणावर चढला ‘मायकेल जॅक्सन’चा पारा! डान्स फ्लोअरवरील थरार पाहून सगळेच दंग
1

Video: नादच खुळा! लग्नात आलेल्या तरुणावर चढला ‘मायकेल जॅक्सन’चा पारा! डान्स फ्लोअरवरील थरार पाहून सगळेच दंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.