Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jay Jay Swami Samarth: स्वामींच्या संयमामागे दडलीये मोठी लीला; मार्तंडच्या आव्हानाला कसं उत्तर देणार स्वामी?

Jay Jay Swami Samarth: ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत शंकरच्या अटकेनंतर मार्तंड स्वामींच्या भक्तीला आव्हान देणार आहे. दुसरीकडे, रुही-शंकरच्या नात्याची कठीण परीक्षा पाहायला मिळणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 20, 2026 | 02:13 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Jay Jay Swami Samarth:  कलर्स मराठीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ ही मालिका सध्या रंजक वळणावर आली आहे. मालिकेत स्वामींच्या भक्तीचा मार्ग नेहमीच श्रद्धा, संयम आणि विश्वासाची परीक्षा पाहणारा ठरला आहे. मात्र, जेव्हा संकट आपल्या जवळच्या माणसावर येतं, तेव्हा श्रद्धेवरचा विश्वास टिकवणं किती कठीण असतं, याची प्रचिती मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

तुरुंगात शंकरचा छळ, रुहीच्या आनंदावर विरजण

शंकरला तुरुंगात डांबून त्याचा अनन्वित छळ केला जात आहे. अशा परिस्थितीत त्याला भेटायला आलेली रुही त्याची अवस्था पाहून व्याकूळ होते. लग्नानंतरचा पहिलाच पाडवा आणि तोही पतीपासून दूर, तुरुंगाच्या चार भिंतींमध्ये साजरा करण्याची वेळ तिच्यावर आली आहे. तरीही या कठीण प्रसंगात रुही शंकरसोबत तुरुंगातच पाडवा साजरा करण्याचा प्रयत्न करते. मात्र, तिचा हा प्रयत्न अपयशी ठरतो.

Manoj Bajpayee: मनोज बाजपेयी साकारणार महात्मा गांधींची भूमिका; गांधीजींच्या लूकमधील फोटो लीक, चाहत्यांची उत्सुकता वाढली!

मार्तंडचं स्वामींना थेट आव्हान

दुसरीकडे, शंकरच्या अटकेने मार्तंड आणि संपत यांचा उन्माद वाढला आहे. शंकरच्या अटकेचा आनंद साजरा करत ते गावोगावी दवंडी पिटून स्वामींच्या भक्तीविरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. एवढंच नाही, तर स्वामींच्या भक्तांची संख्या कमी झाल्याचा दावा करत मार्तंड त्यांच्यासमोर आपल्या नव्या भक्तांची यादीही सादर करतो.

मार्तंड आता शंकर आणि रुहीच्या नात्याला स्वामींनी दिलेल्या पाठिंब्यालाच आव्हान देतो. त्यांच्या प्रेमाची आणि नात्याची परीक्षा घेण्याचं तो ठरवतो. दिवाळीचा प्रकाश स्वामींसाठी अंधकारमय ठरेल, असं म्हणत तो स्वामींच्या श्रद्धेला आव्हान देतो. मात्र, या सगळ्या घडामोडींदरम्यान स्वामींचा आत्मविश्वास अढळ आहे. भक्ती ही केवळ भक्तांची संख्या मोजण्यात नसून श्रद्धेच्या सामर्थ्यात असते, हे स्वामी आपल्या कृतीतून कसं दाखवणार, याची उत्सुकता आहे.

Bigg Boss 20: चाहत्यांसाठी मोठी खुशखबर! सलमान खानचा शो २ ते ४ आठवड्यांनी Extend होणार? ग्रँड फिनालेबाबत लवकरच निर्णय

रुहीला स्वामी देणार विश्वासाची शिकवण

शंकरच्या अटकेने खचलेल्या रुहीला स्वामी पुन्हा एकदा विश्वासाचा अर्थ समजावून सांगतात. संकट कितीही मोठं असलं, तरी गुरूंवरचा विश्वास डळमळू द्यायचा नसतो, हे ते तिला पटवून देतात. स्वामींच्या या शिकवणीनंतर रुही नव्या आशेने पाडव्याच्या तयारीला लागते.

मात्र, शंकर तुरुंगात असताना रुही त्याच्यासोबत पहिला पाडवा कसा साजरा करणार? शंकर-रुहीच्या नात्याची परीक्षा आणि मार्तंडने स्वामींसमोर उभं केलेलं आव्हान यामुळे कथानकाला कोणतं नवं वळण मिळणार? मार्तंडच्या कपटनीतीला स्वामी कशा प्रकारे उत्तर देणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

‘जय जय स्वामी समर्थ’ ही मालिका दररोज रात्री ८.१० वाजता कलर्स मराठीवर पाहायला मिळते.

Manoj Bajpayee: मनोज बाजपेयी साकारणार महात्मा गांधींची भूमिका; गांधीजींच्या लूकमधील फोटो लीक, चाहत्यांची उत्सुकता वाढली!

Web Title: Jay jay swami samarth serial new twist shankar arrest martand challenge ruhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 02:13 PM

Topics:  

  • entertainment
  • Marathi Serial

संबंधित बातम्या

Harshad Atkari: दोन वर्षांनंतर हर्षद अतकरीचं छोट्या पडद्यावर पुनरागमन; ‘येतेच आता मी नांदायला’ मालिकेत साकारणार ‘ही’ हटके भूमिका
1

Harshad Atkari: दोन वर्षांनंतर हर्षद अतकरीचं छोट्या पडद्यावर पुनरागमन; ‘येतेच आता मी नांदायला’ मालिकेत साकारणार ‘ही’ हटके भूमिका

Ramayana: ‘धुरंधर २’लाही टाकले मागे? रणबीर कपूरच्या ‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कामगिरी; १५ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी!
2

Ramayana: ‘धुरंधर २’लाही टाकले मागे? रणबीर कपूरच्या ‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कामगिरी; १५ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी!

Bigg Boss 20: चाहत्यांसाठी मोठी खुशखबर! सलमान खानचा शो २ ते ४ आठवड्यांनी Extend होणार? ग्रँड फिनालेबाबत लवकरच निर्णय
3

Bigg Boss 20: चाहत्यांसाठी मोठी खुशखबर! सलमान खानचा शो २ ते ४ आठवड्यांनी Extend होणार? ग्रँड फिनालेबाबत लवकरच निर्णय

Manoj Bajpayee: मनोज बाजपेयी साकारणार महात्मा गांधींची भूमिका; गांधीजींच्या लूकमधील फोटो लीक, चाहत्यांची उत्सुकता वाढली!
4

Manoj Bajpayee: मनोज बाजपेयी साकारणार महात्मा गांधींची भूमिका; गांधीजींच्या लूकमधील फोटो लीक, चाहत्यांची उत्सुकता वाढली!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.