Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ramayana: ‘धुरंधर २’लाही टाकले मागे? रणबीर कपूरच्या ‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कामगिरी; १५ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी!

Ramayana Movie: रणबीर कपूरच्या 'रामायण'ने अवघ्या १५ दिवसांत जगभरात १५४७ कोटींची कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर २'ला मागे टाकत चित्रपटाने नवा विक्रम केला.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 20, 2026 | 12:43 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Ramayana Movie:रणबीर कपूरच्या ‘रामायण’ चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटगृहात प्रदर्शित होऊन १५ दिवस उलटले असले, तरी चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड अद्याप सुरूच आहे. अवघ्या १५ दिवसांत या चित्रपटाने जगभरात १५०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत रणवीर सिंगच्या ‘धुरंधर २’लाही मागे टाकल्याचा दावा केला जात आहे. चित्रपटातील कलाकारांचा अभिनय, भव्य सेट आणि व्हीएफएक्सचे सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत आहे.

१५ दिवसांत ‘रामायण’ची १५०० कोटींची कमाई

सॅकनिल्कच्या अहवालानुसार, ‘रामायण’ने प्रदर्शनाच्या १५ व्या दिवशी १९.३५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या दिवशी चित्रपटाला १६.९ टक्के प्रेक्षक मिळाले. आतापर्यंत देशभरात या चित्रपटाचे २१,४३७ शो झाले आहेत. भारतात चित्रपटाने आतापर्यंत ८६३.७५ कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली आहे. तर भारतीय बॉक्स ऑफिसवरील एकूण कमाई १,०३२.१५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

हिंदीसह इतर भाषांमध्येही चित्रपटाची दमदार कमाई

‘रामायण’ने हिंदीसह विविध भाषांमध्येही चांगली कमाई केली आहे. चित्रपटाच्या १५ व्या दिवसाच्या कमाईचा विचार केला, तर हिंदी भाषेत १४ कोटी रुपये, मल्याळममध्ये १.७५ कोटी रुपये, तमिळमध्ये १.५० कोटी रुपये, कन्नडमध्ये १.४० कोटी रुपये आणि तेलुगूमध्ये ७० लाख रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे देशांतर्गत बॉक्स ऑफिसवरही चित्रपटाची पकड कायम असल्याचे दिसत आहे.

Bigg Boss 20: चाहत्यांसाठी मोठी खुशखबर! सलमान खानचा शो २ ते ४ आठवड्यांनी Extend होणार? ग्रँड फिनालेबाबत लवकरच निर्णय

‘धुरंधर २’चा विक्रम मोडत ‘रामायण’ची ऐतिहासिक कामगिरी

जगभरातील कमाईचा विचार केला, तर ‘रामायण’ने आतापर्यंत तब्बल १,५४७.१५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. अवघ्या १५ दिवसांत १,५०० कोटींचा टप्पा पार करत चित्रपटाने नवा विक्रम नोंदवला आहे. विशेष म्हणजे, रणवीर सिंगच्या ‘धुरंधर २’ने १५ दिवसांत जगभरात १,४९४.७७ कोटी रुपयांची कमाई केली होती. आता ‘रामायण’ने हा आकडा पार करत कमाईच्या बाबतीत ‘धुरंधर २’ला मागे टाकल्याचे सांगितले जात आहे. येत्या दिवसांत चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

रणबीर कपूरसह या कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक

‘रामायण’मध्ये रणबीर कपूरने प्रभू श्रीरामांची भूमिका साकारली आहे. त्याच्यासोबत रवी दुबे, यश आणि साई पल्लवी हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसत आहेत. या कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय लारा दत्ता, रकुल प्रीत सिंग, विवेक ओबेरॉय, शीबा चड्ढा, सौरभ सचदेवा आणि इंदिरा कृष्णन यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

चित्रपटातील कलाकारांचा अभिनय, भव्य दृश्ये आणि व्हीएफएक्स यामुळे ‘रामायण’ची चर्चा सर्वत्र रंगली आहे. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाईचे आणखी कोणते विक्रम प्रस्थापित करणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

Manoj Bajpayee: मनोज बाजपेयी साकारणार महात्मा गांधींची भूमिका; गांधीजींच्या लूकमधील फोटो लीक, चाहत्यांची उत्सुकता वाढली!

Web Title: Ramayana box office 1500 crore 15 days ranbir kapoor movie beats dhurandhar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 12:43 PM

Topics:  

  • Box Office
  • entertainment
  • ranbir kapoor

संबंधित बातम्या

Bigg Boss 20: चाहत्यांसाठी मोठी खुशखबर! सलमान खानचा शो २ ते ४ आठवड्यांनी Extend होणार? ग्रँड फिनालेबाबत लवकरच निर्णय
1

Bigg Boss 20: चाहत्यांसाठी मोठी खुशखबर! सलमान खानचा शो २ ते ४ आठवड्यांनी Extend होणार? ग्रँड फिनालेबाबत लवकरच निर्णय

Manoj Bajpayee: मनोज बाजपेयी साकारणार महात्मा गांधींची भूमिका; गांधीजींच्या लूकमधील फोटो लीक, चाहत्यांची उत्सुकता वाढली!
2

Manoj Bajpayee: मनोज बाजपेयी साकारणार महात्मा गांधींची भूमिका; गांधीजींच्या लूकमधील फोटो लीक, चाहत्यांची उत्सुकता वाढली!

Salman Khan: भाईजानचा स्वॅग आणि डान्सचा तडका! ‘मातृभूमी’मधील नवं गाणं रिलीज, चाहत्यांची उत्सुकता वाढली
3

Salman Khan: भाईजानचा स्वॅग आणि डान्सचा तडका! ‘मातृभूमी’मधील नवं गाणं रिलीज, चाहत्यांची उत्सुकता वाढली

Gaurav Khanna: सगळ्यांची स्वप्नं पूर्ण करताना स्वतःचं स्वप्न विसरला; गौरव खन्नाच्या नव्या मालिकेचा भावूक प्रोमो
4

Gaurav Khanna: सगळ्यांची स्वप्नं पूर्ण करताना स्वतःचं स्वप्न विसरला; गौरव खन्नाच्या नव्या मालिकेचा भावूक प्रोमो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.