Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ketaki Kulkarni: ‘कठीण काळात स्वतःवरचा विश्वासच माझी शक्ती ठरला’; ‘कमळी’ फेम केतकी कुलकर्णीचा प्रेरणादायी खुलासा

Ketaki Kulkarni: ‘कमळी’ मालिकेतील अनिका अर्थात केतकी कुलकर्णीने त्वचेच्या समस्येशी सामना करत स्वतःवरचा विश्वास कसा जपला, याबद्दल सांगितलं. नवरात्रीनिमित्त महिलांना दिला प्रेरणादायी संदेश.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 16, 2026 | 02:06 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Ketaki Kulkarni:नवरात्री म्हणजे केवळ देवीची पूजा आणि आराधना नव्हे, तर प्रत्येक स्त्रीमध्ये असलेल्या सामर्थ्याचा आणि आत्मविश्वासाचा उत्सव आहे. आयुष्यात कितीही आव्हानं आली, तरी त्यांचा धैर्याने सामना करत स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभं राहणाऱ्या स्त्रियांमध्येही देवीचं रूप पाहायला मिळतं. झी मराठीवरील ‘कमळी’ मालिकेत अनिकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री केतकी कुलकर्णी हिने आपल्या आयुष्यातील अनुभवांतून स्त्रीशक्तीचा असाच अर्थ उलगडला आहे. त्वचेच्या समस्येचा सामना करतानाही स्वतःवरचा विश्वास कायम ठेवणाऱ्या केतकीसाठी तिच्यातील आत्मविश्वास आणि जिद्द हीच तिची खरी शक्ती आहे.

‘स्वतःवरचा विश्वास हीच माझी खरी शक्ती’

स्त्रीशक्तीबद्दल बोलताना केतकी कुलकर्णी म्हणाली, “माझ्यासाठी स्त्रीशक्ती म्हणजे स्वतःसाठी उभं राहण्याची धमक आणि स्वतःच्या निर्णयांवर ठाम राहण्याची हिंमत, कुठल्याही परिस्थितीत स्वतःला हरवू न देण्याची ताकद. माझ्यासाठी स्त्रीशक्ती म्हणजे फक्त स्ट्राँग असणं नाही, तर गरज पडली तर स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी खंबीरपणे उभं राहणं आहे.”

ती पुढे म्हणाली की, आजच्या काळात प्रत्येक मुलीने आणि स्त्रीने स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. लोक काय म्हणतात याकडे लक्ष न देता, न घाबरता पुढे जात राहणं गरजेचं आहे. सध्या केतकीच्या त्वचेची समस्या सुरू असून, ती त्यातून सावरण्याच्या प्रक्रियेत आहे. मात्र, या कठीण काळातही तिने स्वतःवरील विश्वास आणि आपल्यातील शक्ती कायम जपली आहे.

त्वचेच्या समस्येचा सामना करत महिलांना दिला प्रेरणादायी संदेश

आपल्या अनुभवांबद्दल बोलताना केतकीने महिलांना स्वतःची काळजी घेण्याचा आणि अडचणींमध्ये खचून न जाण्याचा संदेश दिला. ती म्हणाली, “नवरात्रीच्या निमित्ताने आजच्या मुलींना आणि महिलांना मला हाच संदेश द्यायला आवडेल की, आपण अनेकदा शारीरिक वेदना आणि पीसीओडी, थायरॉईड यांसारख्या आरोग्याच्या समस्यांना सामोरं जात असतो. अशा वेळी खचून न जाता स्वतःसाठी प्रयत्न करा, स्वतःसाठी लढा आणि स्वतःची काळजी घ्या.”

ती पुढे म्हणाली, “जवळचे लोक आपल्याला सहकार्य करतात, पण शेवटी स्वतःसाठी आपल्यालाच उभं राहावं लागतं. त्यामुळे खंबीर राहा आणि मनमोकळेपणाने आयुष्य जगा. आयुष्य खूप सुंदर आहे.”

अभिनयाच्या प्रवासात अनेक चढ-उतारांचा केला सामना

केतकी कुलकर्णी लहानपणापासून अभिनय क्षेत्रात काम करत आहे. या प्रवासात तिने अनेक चढ-उतार अनुभवले. प्रत्येक वेळी स्वतःला सावरून पुन्हा उभं राहणं आणि पुढे जाणं तिने शिकल्याचं सांगितलं. अनेक गोष्टी कठीण वाटल्या, तरी स्वतःवर विश्वास ठेवून तिने त्यांचा सामना केला.

“मला असं वाटतं की, स्त्रीने जर काही ठरवलं, तर ती काहीही करू शकते. तिच्यासाठी काहीच अशक्य नाही. माझ्या करिअरमध्ये स्वतःवर विश्वास ठेवून आजपर्यंत मी पुढे येत राहिले आणि यापुढेही अशीच वाटचाल करत राहीन,” असं केतकी म्हणाली.

Mahesh Tinaikar Death: भारतीय रॉक संगीतविश्वाला मोठा धक्का; महेश तिनैकर यांचं वयाच्या ६३व्या वर्षी निधन

‘देवी आई आणि माझे बाप्पा कायम माझ्या पाठीशी आहेत’

आपल्या श्रद्धेबद्दल बोलताना केतकीने देवीशक्ती आणि स्त्रीशक्ती यांच्यातील नातंही अधोरेखित केलं. “या प्रवासात मला देवीशक्ती आणि स्त्रीशक्ती जाणवते. देवी आई आणि माझे बाप्पा कायम माझ्या पाठीशी आहेत, याची मला जाणीव आहे. प्रत्येक स्त्रीमध्ये एक दैवी शक्ती असते आणि त्या शक्तीच्या जोरावर ती आयुष्यात सतत पुढे जाऊ शकते, असा माझा विश्वास आहे,” असं तिने सांगितलं.

केतकी कुलकर्णीचे विचार या नवरात्रीत प्रत्येक स्त्रीला स्वतःमधील शक्ती ओळखण्याची आणि स्वतःवरचा विश्वास अधिक दृढ करण्याची प्रेरणा देतात. स्त्रीशक्ती ही केवळ संकटांचा सामना करण्यापुरती मर्यादित नसून, स्वतःच्या आयुष्याला आत्मविश्वासाने दिशा देण्याची ताकदही आहे.

Jailer 2 Box Office Collection: रजनीकांतच्या ‘जेलर 2’चा बॉक्स ऑफिसवर धमाका; ‘धुरंधर 2’चा रेकॉर्ड मोडला, ‘ॲनिमल’लाही टाकलं मागे!

Web Title: Ketaki kulkarni skin problem women empowerment navratri message ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 02:06 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi actress
  • Navratri 2026

संबंधित बातम्या

kareena kapoor: करीना कपूर रात्री झोपण्यापूर्वी पायांना का लावते तूप? सैफ अली खानने कपिल शर्माच्या शोमध्ये उडवली खिल्ली!
1

kareena kapoor: करीना कपूर रात्री झोपण्यापूर्वी पायांना का लावते तूप? सैफ अली खानने कपिल शर्माच्या शोमध्ये उडवली खिल्ली!

Navratri Special : “आयुष्यात सतत काहीतरी करत राहायचंय”; मिताली जगताप यांनी सांगितला संघर्षाचा प्रवास
2

Navratri Special : “आयुष्यात सतत काहीतरी करत राहायचंय”; मिताली जगताप यांनी सांगितला संघर्षाचा प्रवास

Harsh Gujral Madhur Virli Summons: स्टँडअप कॉमेडियन्सना अश्लील वक्तव्य भोवलं! महाराष्ट्र सायबरची मोठी कारवाई, समन्स जारी
3

Harsh Gujral Madhur Virli Summons: स्टँडअप कॉमेडियन्सना अश्लील वक्तव्य भोवलं! महाराष्ट्र सायबरची मोठी कारवाई, समन्स जारी

Jailer 2 Box Office Collection: रजनीकांतच्या ‘जेलर 2’चा बॉक्स ऑफिसवर धमाका; ‘धुरंधर 2’चा रेकॉर्ड मोडला, ‘ॲनिमल’लाही टाकलं मागे!
4

Jailer 2 Box Office Collection: रजनीकांतच्या ‘जेलर 2’चा बॉक्स ऑफिसवर धमाका; ‘धुरंधर 2’चा रेकॉर्ड मोडला, ‘ॲनिमल’लाही टाकलं मागे!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.