Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

kareena kapoor: करीना कपूर रात्री झोपण्यापूर्वी पायांना का लावते तूप? सैफ अली खानने कपिल शर्माच्या शोमध्ये उडवली खिल्ली!

kareena kapoor: करीना कपूर रात्री झोपण्यापूर्वी पायांना तूप लावते, असा खुलासा सैफ अली खानने ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये केला. त्याच्या मजेशीर वक्तव्याने सर्वांना हसू फुटले.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 16, 2026 | 01:24 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

kareena kapoor: कॉमेडियन-अभिनेता कपिल शर्माच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या नव्या भागात बॉलिवूडची लोकप्रिय जोडी करीना कपूर आणि सैफ अली खान प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या भागाचा प्रोमो नेटफ्लिक्सने प्रदर्शित केला असून, त्यात कपिल शर्मा या जोडीसोबत धमाल करताना दिसत आहे. गप्पांच्या ओघात करीनाने तिच्या काही खास सवयी सांगितल्या, तर सैफने तिची मजेशीर पद्धतीने चेष्टा केली. विशेष म्हणजे, रात्री झोपण्यापूर्वी करीना तिच्या पायांना तूप लावते, असा खुलासा सैफने केला आहे.

‘रात्री बेडरूममध्ये ढाब्यासारखा वास येतो’

प्रोमोमध्ये कपिल शर्मा करीना आणि सैफचे स्वागत करताना त्यांच्या लग्नाला १४ वर्षे झाल्याचा उल्लेख करतो. दोघेही इतकी वर्षे झाली तरी तरुण आणि फ्रेश कसे दिसतात, असा प्रश्न विचारत तो सैफला त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींबद्दल विचारतो.

यावर सैफ अली खान म्हणतो, “आजकाल घरी खूप तूप येतं.” त्यानंतर करीना सांगते की, त्यांच्या घरात तुपाचा भरपूर वापर होतो. घरात तूप खरंच खाल्लं जातं का, असा प्रश्न कपिलने विचारल्यावर करीना म्हणते, “मुले खातात… आम्ही खातो.”

मात्र, त्यानंतर सैफने करीनाची एक खास सवय सांगितली. तो म्हणाला, “आम्ही फक्त तूप खात नाही… ती रात्री तिच्या पायांना तूप लावते.” करीनाने यामागचं कारण सांगण्यास सुरुवात केली असता सैफने पुन्हा एक मजेशीर टिप्पणी केली.

“किती रोमँटिक आहे ना? रात्री आमच्या बेडरूममध्ये अगदी रस्त्याच्या कडेला असलेल्या ढाब्यासारखा वास येतो,” असं सैफ म्हणाला. त्याच्या या वक्तव्याने सेटवर उपस्थित असलेले सर्वजण हसू लागले.

Jailer 2 Box Office Collection: रजनीकांतच्या ‘जेलर 2’चा बॉक्स ऑफिसवर धमाका; ‘धुरंधर 2’चा रेकॉर्ड मोडला, ‘ॲनिमल’लाही टाकलं मागे!

करीना कपूरने सांगितलं तिच्या सवयीमागचं कारण

या गप्पांदरम्यान करीना कपूरने रात्री पायांना तूप लावण्याच्या सवयीबद्दलही सांगितलं. तिच्या या सवयीवर सैफने केलेली मस्करी सध्या प्रोमोमधील लक्षवेधी क्षण ठरत आहे. दोघांमधील हा मिश्किल संवाद पाहून चाहत्यांनाही या भागाची उत्सुकता लागली आहे.

कधी आणि कुठे पाहता येणार हा एपिसोड?

सैफ अली खान आणि करीना कपूर यांचा ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मधील हा विशेष भाग १७ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता नेटफ्लिक्सवर प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमात सुनील ग्रोव्हर, अर्चना पूरण सिंह यांच्यासह इतर कलाकारही प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसतात.

करीना आणि सैफ यांची जोडी, त्यांचा मजेशीर संवाद आणि कपिल शर्माची विनोदी शैली यामुळे हा भाग प्रेक्षकांसाठी खास ठरण्याची शक्यता आहे.

Ramayana Trailer: रणबीर कपूरच्या ‘रामायण’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; राम-रावण युद्धाची भव्य झलक पाहून चाहते भारावले

Web Title: Kareena kapoor why applies ghee on feet before sleeping saif ali khan ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 01:24 PM

Topics:  

  • entertainment
  • kareena kapoor khan
  • the kapil sharma show

संबंधित बातम्या

Harsh Gujral Madhur Virli Summons: स्टँडअप कॉमेडियन्सना अश्लील वक्तव्य भोवलं! महाराष्ट्र सायबरची मोठी कारवाई, समन्स जारी
1

Harsh Gujral Madhur Virli Summons: स्टँडअप कॉमेडियन्सना अश्लील वक्तव्य भोवलं! महाराष्ट्र सायबरची मोठी कारवाई, समन्स जारी

Jailer 2 Box Office Collection: रजनीकांतच्या ‘जेलर 2’चा बॉक्स ऑफिसवर धमाका; ‘धुरंधर 2’चा रेकॉर्ड मोडला, ‘ॲनिमल’लाही टाकलं मागे!
2

Jailer 2 Box Office Collection: रजनीकांतच्या ‘जेलर 2’चा बॉक्स ऑफिसवर धमाका; ‘धुरंधर 2’चा रेकॉर्ड मोडला, ‘ॲनिमल’लाही टाकलं मागे!

Ramayana Trailer: रणबीर कपूरच्या ‘रामायण’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; राम-रावण युद्धाची भव्य झलक पाहून चाहते भारावले
3

Ramayana Trailer: रणबीर कपूरच्या ‘रामायण’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; राम-रावण युद्धाची भव्य झलक पाहून चाहते भारावले

Mahesh Tinaikar Death: भारतीय रॉक संगीतविश्वाला मोठा धक्का; महेश तिनैकर यांचं वयाच्या ६३व्या वर्षी निधन
4

Mahesh Tinaikar Death: भारतीय रॉक संगीतविश्वाला मोठा धक्का; महेश तिनैकर यांचं वयाच्या ६३व्या वर्षी निधन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.