Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Mohini’मध्ये थरारक अ‍ॅक्शन ट्रॅक; अनघा ठाकूर-शांतनू मोघेची दमदार केमिस्ट्री चर्चेत

कलर्स मराठीवरील 'मोहिनी' मालिका सध्या चर्चेत आहे. अशातच या मालिकेमध्ये अनेक ट्विस्ट आणि नवी कथा प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. अनघा ठाकूर-शांतनू मोघेची दमदार केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 09, 2026 | 02:06 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘Mohini’मध्ये थरारक अ‍ॅक्शन ट्रॅक
  • अनघा ठाकूर-शांतनू मोघेची दमदार केमिस्ट्री
  • ‘मोहिनी’ मालिकेत मोठा ट्विस्ट
 

कलर्स मराठीवरील ‘मोहिनी’ मालिकेत सध्या प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा थरारक अ‍ॅक्शन ट्रॅक पाहायला मिळत आहे. मोहिनी आणि तिचे वडील महेंद्र (शांतनू मोघे) यांच्यातील दमदार फाईट सीक्वेन्स केवळ अ‍ॅक्शनपुरते मर्यादित न राहता नात्यांमधील संघर्ष, भावनिक गुंतागुंत आणि एका वडिलांचा आपल्या मुलीला सक्षम बनवण्याचा प्रयत्न प्रभावीपणे मांडतो आहे. या सीनमुळे मालिकेची रंगत अधिकच वाढली असून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

खऱ्या इतिहासावर आधारित ‘रणबली; विजय आणि रश्मिकासाठी चाहते उत्सुक, भव्य ऐतिहासिक चित्रपटाची जोरदार चर्चा

मोहिनीची भूमिका साकारणारी अनघा ठाकूर हिने या अ‍ॅक्शन सीनबद्दल अनुभव सांगताना म्हटले की, शंतनू मोघे यांनी तिला खूप मार्गदर्शन केले. फाईट सीक्वेन्स करताना कोणती काळजी घ्यावी, स्वतःला आणि समोरच्या कलाकाराला इजा होऊ नये यासाठी काय करावे, याबाबत त्यांनी तिला महत्त्वाच्या टिप्स दिल्या. सुरुवातीला भीती आणि दडपण जाणवत असतानाही अ‍ॅक्शन डायरेक्टर आणि टीमच्या मदतीने तिने हा सीन आत्मविश्वासाने साकारला. डान्सर असल्यामुळे तिने या सीनमध्ये एक वेगळा रिदम आणत अ‍ॅक्शन अधिक प्रभावी बनवली.

महेंद्रची भूमिका साकारणारे शांतनू मोघे यांनी सांगितले की, अ‍ॅक्शन सीन हे कलाकारांसाठी थरारक असतात, मात्र प्रेक्षकांच्या दृष्टीने या सीनमध्ये एक बाप आपल्या मुलीची परीक्षा घेताना दिसतो. पालकत्वातील जबाबदारी, मुलांना जगाशी भिडण्यासाठी तयार करण्याची प्रक्रिया या माध्यमातून अधोरेखित केली जाते. त्यांनी अनघासोबतची केमिस्ट्रीही उत्कृष्ट असल्याचे सांगितले आणि स्टंट्स करताना घेतली जाणारी काळजी, त्यामागील मेहनत आणि शिस्त यावरही भर दिला.

‘सुपर डुपर’चा बॉक्स ऑफिसवर कल्ला; तिन्ही पिढ्यांना एकत्र आणणारा फॅमिली एंटरटेनर चित्रपट

एकंदरीत, मोहिनी मालिकेतील हा अ‍ॅक्शन ट्रॅक केवळ थरार निर्माण करत नाही, तर नात्यांमधील भावनिक बाजूही प्रभावीपणे उलगडतो. दमदार अ‍ॅक्शन, उत्कृष्ट अभिनय आणि भावनिक मांडणी यामुळे हा ट्रॅक सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला आहे.

Web Title: Mohini serial action track anagha thakur shantanu moghe fight sequence colors marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 02:06 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • marathi serial news

संबंधित बातम्या

Nana Patekar Death: नाना पाटेकरांच्या आठवणी सांगताना प्रताप सरनाईकांना अश्रू अनावर; ‘अंकुश’ चित्रपटाचा सांगितला खास किस्सा
1

Nana Patekar Death: नाना पाटेकरांच्या आठवणी सांगताना प्रताप सरनाईकांना अश्रू अनावर; ‘अंकुश’ चित्रपटाचा सांगितला खास किस्सा

Mary Kom: Ex पतीविरोधात गंभीर आरोप करणं पडलं महागात, पती ओनलरने दाखल केला मानहानीचा खटला
2

Mary Kom: Ex पतीविरोधात गंभीर आरोप करणं पडलं महागात, पती ओनलरने दाखल केला मानहानीचा खटला

Kapus Konda Movie Teaser: एका कुत्र्यामुळे उलगडणार नात्यांची गोष्ट; ‘कापूसकोंडा’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
3

Kapus Konda Movie Teaser: एका कुत्र्यामुळे उलगडणार नात्यांची गोष्ट; ‘कापूसकोंडा’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

OTT Releases: थ्रिलरपासून रोमांसपर्यंत सगळं काही; OTTवर येतायत हे जबरदस्त चित्रपट-सीरीज
4

OTT Releases: थ्रिलरपासून रोमांसपर्यंत सगळं काही; OTTवर येतायत हे जबरदस्त चित्रपट-सीरीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.