Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mary Kom: Ex पतीविरोधात गंभीर आरोप करणं पडलं महागात, पती ओनलरने दाखल केला मानहानीचा खटला

Mary Kom: मेरी कोमविरोधात तिचे माजी पती ओन्लर यांनी मानहानीची कारवाई सुरू केली आहे. टीव्ही शो आणि मुलाखतींमध्ये केलेल्या कथित वक्तव्यांवरून हे प्रकरण न्यायालयात पोहोचले.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 08, 2026 | 03:56 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Mary Kom:  ऑलिम्पिक पदक विजेती बॉक्सर मेरी कोम सध्या ‘बिग बॉस २०’मध्ये सहभागी झाली आहे. दरम्यान, तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मेरी कोमने विविध टीव्ही कार्यक्रम आणि मुलाखतींमध्ये आपल्याबद्दल बदनामीकारक वक्तव्ये केल्याचा आरोप तिचे माजी पती ओन्लर ने केला आहे. या प्रकरणी ओन्लर ने भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५६ अंतर्गत मेरी कोमविरोधात फौजदारी मानहानीची कारवाई सुरू केल्याचे समोर आले आहे.

मेरी कोम आणि ओन्लर यांचे नाते गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. आता या वादाला कायदेशीर वळण मिळाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विविध टीव्ही कार्यक्रम आणि मुलाखतींमध्ये मेरीने केलेल्या कथित वक्तव्यांवर आक्षेप घेत ओन्लर यांनी ही कायदेशीर कारवाई केली आहे.

ओन्लर म्हणाला, ‘माझी बाजू भक्कम आहे’

‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तानुसार, मेरीने एका टीव्ही शोमध्ये आणि त्यानंतर इतर माध्यमांमध्ये ओन्लरच्याविरोधात कथित अपमानजनक टिप्पणी केल्यानंतर तो कायदेशीर कारवाईचा विचार करत होते.

ओन्लर ने  या प्रकरणाचा पाठपुरावा करत असल्याचे मान्य केले आहे. मात्र, प्रकरण न्यायालयात असल्याने याबाबत अधिक भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला. तो म्हणाला, “माझी बाजू भक्कम आहे. माझा भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. हे प्रकरण सध्या न्यायालयात आहे, त्यामुळे मी त्यावर अधिक भाष्य करणार नाही.”

या प्रकरणाची पुढील सुनावणी १९ नोव्हेंबर रोजी होणार असल्याचे सांगितले जात आहे.

मेरी कोमने ओन्लरवर केले होते आर्थिक आरोप

मेरी कोमने यापूर्वी ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात ओन्लर याच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले होते. ओन्लर ने तिच्या बॉक्सिंग कारकिर्दीतून कमावलेल्या कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा दावा मेरीने केला होता.

तसेच, तिच्या नावावर कर्ज घेण्यात आले, तिची मालमत्ता गहाण ठेवण्यात आली आणि तिच्या संमतीशिवाय काही संपत्ती ओन्लर यांच्या नावावर हस्तांतरित करण्यात आल्याचा आरोपही तिने केला होता. ओन्लर यांनी हे आरोप वारंवार फेटाळले आहेत. त्यांनी मेरीला हे आरोप सिद्ध करण्याचे आव्हानही दिले आहे.

नाना पाटेकरांची शेवटची इच्छा काय होती? आज पुण्यातील डोणजे येथे शासकीय इतमामात अखेरचा निरोप

अशी सुरू झाली होती मेरी-ओन्लर यांची प्रेमकहाणी

मेरी कोम आणि ओन्लर यांची प्रेमकहाणी २००० मध्ये दिल्लीत सुरू झाली. दिल्ली विद्यापीठाच्या विधी शाखेत शिक्षण घेत असलेल्या ओन्लर यांनी एका स्पर्धेसाठी जाताना मेरीचे सामान हरवल्यानंतर तिला मदत केली होती. यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि पुढे त्याचे प्रेमात रूपांतर झाले.

२००५ मध्ये दोघांनी लग्न केले. २००७ मध्ये त्यांना जुळे मुलगे झाले, तर २०१३ मध्ये आणखी एका मुलाचा जन्म झाला. २०१८ मध्ये त्यांनी एका मुलीला दत्तक घेतले.

मेरीच्या बॉक्सिंग कारकिर्दीला पाठिंबा देण्यासाठी आणि मुलांची जबाबदारी सांभाळण्यासाठी ओन्लर यांनी काही काळ आपल्या कारकिर्दीला विराम दिला होता. मेरी कोमच्या नावावर सहा विश्वविजेतेपदं आणि एक ऑलिम्पिक कांस्यपदक आहे.

दरम्यान, दोघांच्या विभक्त होण्याच्या चर्चांनंतर मेरीने २०२३ मध्ये पारंपरिक रूढी कायद्यानुसार दोघांचा घटस्फोट झाल्याचे स्पष्ट केले होते.

Kapus Konda Movie Teaser: एका कुत्र्यामुळे उलगडणार नात्यांची गोष्ट; ‘कापूसकोंडा’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

Web Title: Mary kom ex husband defamation case bigg boss 20 ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 03:56 PM

Topics:  

  • Bigg Boss 20
  • entertainment
  • Mary Kom

संबंधित बातम्या

Kapus Konda Movie Teaser: एका कुत्र्यामुळे उलगडणार नात्यांची गोष्ट; ‘कापूसकोंडा’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
1

Kapus Konda Movie Teaser: एका कुत्र्यामुळे उलगडणार नात्यांची गोष्ट; ‘कापूसकोंडा’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

OTT Releases: थ्रिलरपासून रोमांसपर्यंत सगळं काही; OTTवर येतायत हे जबरदस्त चित्रपट-सीरीज
2

OTT Releases: थ्रिलरपासून रोमांसपर्यंत सगळं काही; OTTवर येतायत हे जबरदस्त चित्रपट-सीरीज

Tanushree Dutta: ‘EVIL DEAD..’, नाना पाटेकरांच्या निधनावर तनुश्री दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत, ‘त्या’ शब्दांनी वेधलं लक्ष
3

Tanushree Dutta: ‘EVIL DEAD..’, नाना पाटेकरांच्या निधनावर तनुश्री दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत, ‘त्या’ शब्दांनी वेधलं लक्ष

Nana Patekar Death: ‘ माझे निकटचे मित्र, नाना कधीच मागे राहिले नसते पण…’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भावूक
4

Nana Patekar Death: ‘ माझे निकटचे मित्र, नाना कधीच मागे राहिले नसते पण…’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भावूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.