Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Prapti Redkar: स्त्रीशक्ती म्हणजे नेमकं काय? प्राप्ती रेडकरने सांगितला स्वाभिमान आणि आत्मविश्वासाचा अर्थ

Prapti Redkar: झी मराठीच्या ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील प्राप्ती रेडकरने नवरात्रीनिमित्त स्त्रीशक्ती, स्वसंरक्षण आणि आत्मविश्वासाबाबत खास संदेश दिला.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 14, 2026 | 03:35 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Prapti Redkar:  नवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीचा जागर आणि देवीच्या विविध रूपांना वंदन करण्याचा उत्सव! देवीच्या पूजेसोबतच तिच्यातील धैर्य, आत्मविश्वास आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद या काळात अधोरेखित केली जाते. मात्र, खरी स्त्रीशक्ती केवळ देवीच्या आराधनेपुरती मर्यादित नसून स्वतःच्या हक्कांसाठी खंबीरपणे उभं राहण्यात आणि स्वाभिमानाने जगण्यातही आहे. झी मराठीवरील ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत सावलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राप्ती रेडकर हिचाही स्त्रीशक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन असाच आहे. नवरात्रीच्या निमित्ताने तिने स्वसंरक्षणाचं महत्त्व सांगत प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या आयुष्याची नायिका बनावं, असा खास संदेश दिला आहे.

‘स्वतःसाठी खंबीरपणे उभं राहणं, हीच खरी स्त्रीशक्ती’

स्त्रीशक्ती म्हणजे स्वतःचा स्वाभिमान जपणं आणि स्वतःसाठी योग्य भूमिका घेणं, असं प्राप्ती रेडकर सांगते. एखादी गोष्ट पटत नसेल, तर त्याविरोधात आवाज उठवणं आणि स्वतःच्या निर्णयांवर ठाम राहणं महत्त्वाचं असल्याचं तिचं मत आहे. आजच्या काळात प्रत्येक स्त्रीला स्वसंरक्षणाची माहिती असणं गरजेचं आहे. प्रत्येक मुलीने कराटे किंवा मार्शल आर्ट शिकायलाच हवं, असं नाही; मात्र संकटाच्या वेळी स्वतःचं संरक्षण कसं करायचं, याची जाणीव प्रत्येक महिलेला असायला हवी, असं ती म्हणते.

‘स्वतःच्या आयुष्याची नायिका बना’

नवरात्रीच्या निमित्ताने प्राप्तीने प्रत्येक महिला आणि मुलीला स्वतःची काळजी घेण्याचा आणि कोणत्याही परिस्थितीत खचून न जाण्याचा संदेश दिला आहे. स्वतःसोबत काही चुकीचं घडत असेल, तर त्याचा विरोध करा आणि स्वतःसाठी हिंमतीने लढा, असं ती सांगते. आयुष्यात काय करायचं, कसं जगायचं आणि कोणते निर्णय घ्यायचे, हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येक स्त्रीला आहे. त्यामुळे आपल्या आयुष्याचे निर्णय दुसऱ्यांना घेऊ देऊ नका; स्वतःच्या आयुष्याची नायिका बना आणि आत्मविश्वासाने जगा, असं आवाहन प्राप्तीने केलं आहे.

मार्शल आर्टमुळे वाढला आत्मविश्वास

प्राप्ती रेडकर २०२२ पासून मार्शल आर्ट शिकत आहे. सध्या मालिकेच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे तिचा सराव थांबला असला, तरी मार्शल आर्ट शिकण्यापूर्वी आणि त्यानंतर स्वतःमध्ये मोठा बदल जाणवल्याचं तिने सांगितलं. पूर्वी कोणी जाणूनबुजून चुकीचं वागलं किंवा धाक दाखवण्याचा प्रयत्न केला, तर तिला अस्वस्थ वाटायचं. अशा वेळी समोरच्या व्यक्तीला विरोध करण्याचा आत्मविश्वास तिच्यात नव्हता. मात्र, मार्शल आर्ट शिकल्यामुळे स्वतःसाठी उभं राहण्याची हिंमत आणि आत्मविश्वास वाढल्याचं ती सांगते.

मालाड स्टेशनवरील प्रसंगातून झाली स्त्रीशक्तीची जाणीव

स्वतःमधील स्त्रीशक्तीचा अनुभव देणारा एक प्रसंगही प्राप्तीने सांगितला. मालाड स्टेशनवर एका मुलाने मुद्दाम चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचं तिने सांगितलं. सुरुवातीला तो कोण होता, हे तिच्या लक्षात आलं नाही. मात्र, काही वेळाने तो पुन्हा त्याच हेतूने तिच्या दिशेने येताना दिसला. तेव्हा प्राप्तीने त्याची कॉलर पकडून त्याला जोरदार विरोध केला. त्यानंतर तो माफी मागू लागला आणि तिथून पळून गेला.

हा प्रसंग तिच्यासाठी महत्त्वाचा ठरला. कारण त्या क्षणी स्वतःमधील ताकदीची आणि अन्यायाविरोधात उभं राहण्याच्या क्षमतेची जाणीव झाल्याचं तिने सांगितलं. म्हणूनच प्रत्येक मुलीला आणि स्त्रीला किमान स्वतःचं संरक्षण करण्याइतकी माहिती असणं गरजेचं असल्याचं तिचं म्हणणं आहे.

Vidya Balan: ‘आता AI नेच मुलं जन्माला घाला!’,विद्या बालनचं वक्तव्य चर्चेत; नेमकं काय घडलं?

नवरात्र म्हणजे आनंद, उत्साह आणि एकत्र येण्याचा उत्सव

प्राप्तीसाठी नवरात्र हा केवळ देवीच्या आराधनेचा काळ नसून आनंदाने आणि उत्साहाने सण साजरा करण्याची संधीही आहे. तिच्या नानींच्या घराजवळ सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा केला जातो. या उत्सवात लहान मुलांचे खेळ, महिला आणि पुरुषांसाठी विविध स्पर्धा, गरबा, फॅन्सी ड्रेस गरबा आणि पाककला स्पर्धा असे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. मित्रमंडळींसोबत या कार्यक्रमांमध्ये सहभागी होताना नवरात्रीचे दिवस कसे जातात, हे कळतही नाही, असं ती सांगते.

याशिवाय, विविध नवरात्र मंडळांकडून आलेल्या आमंत्रणांना प्रतिसाद देत ती आवर्जून देवीच्या दर्शनासाठीही जाते. नऊ दिवसांत देवीच्या दर्शनातून मिळणारी सकारात्मक ऊर्जा आणि उत्सवातील उत्साह तिला विशेष भावतो.

नवरात्रीच्या निमित्ताने प्राप्ती रेडकरने दिलेला संदेश प्रत्येक स्त्रीला स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव करून देणारा आहे. स्वाभिमान जपणं, चुकीच्या गोष्टींना विरोध करणं, स्वतःच्या सुरक्षिततेबाबत जागरूक राहणं आणि आत्मविश्वासाने आयुष्याचे निर्णय घेणं, हीच खरी स्त्रीशक्ती असल्याचं तिच्या विचारांतून अधोरेखित होतं.

Milind Gawali: ‘जगणंसुद्धा आपल्या हातात नसतं..’, अभिनेत्री मधू कांबीकर यांच्या निधनाने मिलिंद गवळी भावूक; जुन्या आठवणींना उजाळा

Web Title: Prapti redkar women empowerment self respect confidence message ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi actress
  • Navratri 2026

संबंधित बातम्या

Marathi Web Series: ‘कोण यशवंत पानसरे?’मध्ये भरत जाधव यांची दमदार भूमिका; न्याय, सत्ता आणि सत्याचा उलगडा होणार!
1

Marathi Web Series: ‘कोण यशवंत पानसरे?’मध्ये भरत जाधव यांची दमदार भूमिका; न्याय, सत्ता आणि सत्याचा उलगडा होणार!

Milind Gawali: ‘जगणंसुद्धा आपल्या हातात नसतं..’, अभिनेत्री मधू कांबीकर यांच्या निधनाने मिलिंद गवळी भावूक; जुन्या आठवणींना उजाळा
2

Milind Gawali: ‘जगणंसुद्धा आपल्या हातात नसतं..’, अभिनेत्री मधू कांबीकर यांच्या निधनाने मिलिंद गवळी भावूक; जुन्या आठवणींना उजाळा

Vidya Balan: ‘आता AI नेच मुलं जन्माला घाला!’,विद्या बालनचं वक्तव्य चर्चेत; नेमकं काय घडलं?
3

Vidya Balan: ‘आता AI नेच मुलं जन्माला घाला!’,विद्या बालनचं वक्तव्य चर्चेत; नेमकं काय घडलं?

Nana Patekar: नाना पाटेकरांच्या निधनानंतर ५ दिवसांनी ‘साळू’ची पोस्ट; सोशल मीडियावर पोस्ट लिहित व्यक्त केलं दुःख
4

Nana Patekar: नाना पाटेकरांच्या निधनानंतर ५ दिवसांनी ‘साळू’ची पोस्ट; सोशल मीडियावर पोस्ट लिहित व्यक्त केलं दुःख

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.