Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 12 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Purva Kaushik: आईच्या हातचा फराळ, मित्रांसोबतचा किल्ला अन् फटाक्यांची धमाल; ‘दीपज्योती’च्या ज्योतीने सांगितल्या दिवाळीच्या आठवणी

Purva Kaushik: ‘दीपज्योती’ मालिकेतील ज्योती अर्थात पूर्वा कौशिकने सांगितल्या बालपणीच्या दिवाळीच्या खास आठवणी. आईच्या हातचा फराळ, आवडता चिवडा, किल्ला बनवण्याची मजा आणि कलाकार म्हणून सेटवर साजरी होणारी दिवाळी याबद्दल तिने मारल्या खास गप्पा.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 12, 2026 | 11:24 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Purva Kaushik: दिवाळी म्हटलं की डोळ्यांसमोर येतात ते लखलखते दिवे, आकाशकंदील, फटाक्यांची आतषबाजी, घराघरांतून दरवळणारा फराळाचा सुगंध आणि कुटुंबीयांसोबत साजरे केलेले आनंदाचे क्षण. प्रत्येकाच्या दिवाळीच्या आठवणी खास असतात. बालपणी मित्रमैत्रिणींसोबत किल्ला बनवण्यापासून ते आईच्या हातच्या फराळाचा आस्वाद घेण्यापर्यंत अनेक आठवणी मनात घर करून असतात. झी मराठीवरील ‘दीपज्योती’ या मालिकेत ज्योतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री पूर्वा कौशिक हिच्याही दिवाळीच्या अनेक गोड आठवणी आहेत. बालपणीची धमाल, किल्ला बनवण्याची मजा, आईच्या हातचा फराळ आणि आज कलाकार म्हणून सेटवर अनुभवायला मिळणारी दिवाळी, अशा अनेक गोष्टी तिने खास गप्पांमध्ये सांगितल्या.

लहानपणी बिल्डिंगमधल्या मुलांसोबत किल्ला बनवण्याची मजाच वेगळी!

पूर्वा सांगते, “सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा! मी अंबरनाथला राहते आणि मुळची मुंबई-ठाण्याची आहे. लहानपणी माझी दिवाळी घरीच साजरी व्हायची. आम्ही खूप छान दिवाळी साजरी करायचो. माझे बाबा मला नेहमी खूप फटाके आणून द्यायचे. मात्र, मला बॉम्बसारखे मोठे फटाके फोडायला आवडायचे नाहीत. सुरसुरी आणि छोटे छोटे फटाके फोडण्यात मला जास्त आनंद मिळायचा. मुळात मला दिवाळी हा सणच खूप आवडायचा आणि आजही आवडतो.

आकाशकंदील विकत आणायचा की घरी बनवायचा, हे दरवर्षी आमच्या मूडवर अवलंबून असायचं. लहानपणी प्रत्येक बिल्डिंगमध्ये किल्ला बनवण्याची जणू स्पर्धाच असायची. कोणाचा किल्ला सर्वात छान झाला आहे, याची उत्सुकता असायची. आम्ही सगळे मिळून किल्ला बनवायचो आणि तुळशीपूजनाच्या वेळी किल्ला फोडण्याची वेळ आली की त्या स्पर्धेचा विजेता जाहीर करायचो. किल्ला असो किंवा आकाशकंदील, या सगळ्या गोष्टी करताना मी खूप मजा करायचे.”

आईच्या हातचा फराळ आणि चिवडा म्हणजे पूर्वाचा वीक पॉइंट!

दिवाळीच्या फराळाबद्दल बोलताना पूर्वाने तिच्या आवडीचाही खुलासा केला. ती म्हणाली, “माझ्या घरी दिवाळीला सगळ्या प्रकारचा फराळ बनायचा. आमची आई एकटीच सगळा फराळ करायची. फराळाची तयारी जवळपास आठवडाभर आधीच सुरू व्हायची. शाळेतून घरी आल्यानंतर मी आईला फराळ बनवण्यासाठी मदत करायचे. फराळात मला सगळ्यात जास्त चिवडा आवडतो. मला चिवडा इतका आवडतो की सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी कधीही खायला दिला तरी मी खात बसेन!”

नवीन कपड्यांबद्दलही पूर्वाच्या अनेक गोड आठवणी आहेत. लहानपणी शॉपिंगला गेल्यावर मोठी झाल्यानंतर खूप कपडे खरेदी करण्याचे स्वप्न ती पाहायची. वर्षातील ३६५ दिवसांसाठी ३६५ वेगवेगळे ड्रेस असावेत, अशी तिची इच्छा होती. आई-बाबांसोबत कपड्यांच्या खरेदीला जाण्यातही तिला खूप मजा यायची.

Kareena Kapoor: करीना कपूरच्या दिवाळी लूकवरून वाद; कुराणातील आयत असलेल्या ३० कॅरेटच्या पेंडंटवरून अभिनेत्रीला कायदेशीर नोटीस

पूर्वीसारखी दिवाळी आता अनुभवायला मिळत नाही!

आताच्या दिवाळीबद्दल बोलताना पूर्वा सांगते, “आताची माझी दिवाळी मी घरीच भावंडांसोबत साजरी करते. आम्ही सगळे एकत्र आलो की खूप धमाल करतो. सध्या अनेक गोष्टी वैयक्तिक पातळीवर केल्या जातात. त्यामुळे प्रत्येकाची दिवाळी वेगळी झाली आहे, असं मला वाटतं. पूर्वीसारखे किल्ले आता दिवाळीत क्वचितच पाहायला मिळतात. आमच्या लहानपणी पहाटे चार वाजता उठून आंघोळ आवरायची आणि मग फटाके फोडायला जायचं. आता मात्र लहान मुलं-मुली पहाटे चार वाजता उठून फटाके फोडताना दिसत नाहीत. ही परंपराही आता जवळपास बंद झाल्यासारखी वाटते.”

सध्या कामाच्या व्यापामुळे घरी फारसे पदार्थ बनवले जात नसले तरी गेल्या दोन वर्षांपासून पूर्वा आवर्जून घरी चिवडा बनवते. त्यामुळे तिच्या दिवाळीच्या फराळात चिवड्याला खास स्थान आहे.

कलाकार म्हणून सेटवर दोनदा साजरी होते दिवाळी!

एक कलाकार म्हणून सण साजरे करण्याचा अनुभव वेगळाच असतो, असं पूर्वाला वाटतं. याबद्दल ती म्हणते, “एक कलाकार म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक कलाकार सण दोनदा अनुभवत असतो. दिवाळीचंही तसंच आहे. सेटवरची दिवाळी वेगळी असते आणि आपण घरी साजरी करतो ती दिवाळी वेगळी असते. एक माणूस म्हणून जगताना आपल्याला एखादा अनुभव एकदाच घेता येतो, पण कलाकार म्हणून तोच अनुभव दोनदा घेता येतो. सेटवर जरी सगळं खोटं असलं तरी त्या सणांमध्ये आणि उत्सवांमध्ये आपलं मन मात्र खरंच गुंतलेलं असतं. त्यामुळे ते सगळं खूप खरं आणि आपलंसं वाटतं.”

मालिकांमधून मिळणाऱ्या नात्यांबद्दलही तिने एक खास अनुभव सांगितला. वैयक्तिक आयुष्यात एखादी मुलगी घरात एकुलती एक असू शकते, पण मालिकेत तिला दोन भाऊ आणि दोन बहिणी असं कुटुंब मिळू शकतं. मालिकेतून अचानक मिळणारं भावंडांचं प्रेम अनुभवताना खूप छान वाटतं. कलाकार म्हणून मालिकांमधून नाती नव्याने जगता आणि अनुभवता येतात, ही एक वेगळीच भेट असल्याचं पूर्वाने सांगितलं.

पूर्वाच्या या दिवाळीच्या आठवणींमधून सणाचा खरा आनंद हा केवळ रोषणाई आणि फराळात नसून कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्यात, एकत्र येण्यात आणि नाती जपण्यात आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित होतं. ‘दीपज्योती’ मालिकेतील ज्योती अर्थात पूर्वा कौशिकच्या या खास आठवणींनी तिच्या चाहत्यांनाही आपल्या बालपणीच्या दिवाळीची आठवण नक्कीच करून दिली असेल.

Shashank Shende: पैशांसाठी रक्ताची नातीही विसरतो माणूस! ‘अफरातफरी’च्या कथेबद्दल शशांक शेंडेंनी मांडले परखड मत

Web Title: Purva kaushik diwali memories deepjyoti marathi serial ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2026 | 11:24 AM

Topics:  

  • Diwali 2026
  • entertainment
  • Marathi Serial

संबंधित बातम्या

Ramayana Box Office Collection: रणबीर कपूरच्या ‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड; भाऊबीजला केली छप्परफाड कमाई
1

Ramayana Box Office Collection: रणबीर कपूरच्या ‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड; भाऊबीजला केली छप्परफाड कमाई

Shashank Shende: पैशांसाठी रक्ताची नातीही विसरतो माणूस! ‘अफरातफरी’च्या कथेबद्दल शशांक शेंडेंनी मांडले परखड मत
2

Shashank Shende: पैशांसाठी रक्ताची नातीही विसरतो माणूस! ‘अफरातफरी’च्या कथेबद्दल शशांक शेंडेंनी मांडले परखड मत

Kareena Kapoor: करीना कपूरच्या दिवाळी लूकवरून वाद; कुराणातील आयत असलेल्या ३० कॅरेटच्या पेंडंटवरून अभिनेत्रीला कायदेशीर नोटीस
3

Kareena Kapoor: करीना कपूरच्या दिवाळी लूकवरून वाद; कुराणातील आयत असलेल्या ३० कॅरेटच्या पेंडंटवरून अभिनेत्रीला कायदेशीर नोटीस

Saif Ali Khan Fitness: वयाच्या ५६व्या वर्षी सैफ अली खानचा जबरदस्त फिटनेस; सूर्यनमस्कार करतानाचा व्हिडीओ व्हायरल
4

Saif Ali Khan Fitness: वयाच्या ५६व्या वर्षी सैफ अली खानचा जबरदस्त फिटनेस; सूर्यनमस्कार करतानाचा व्हिडीओ व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.