
Savlyachi Janu Savali Promo
ज्या सुनेला तिलोत्तमाने कटकारस्थान करुन घरातून हाकलून दिलं तिच सावली आता तिलोत्तमाला ओपन चॅलेंज करणार आहे. याबाबतच प्रोमो नुकताच झी मराठीच्या इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेला आहे. प्रोमोमध्ये दाखवण्यात आल्यानुसार, एका संगीत विद्यालयाची गुरुकुलाची जागा तिलोत्तमाला पाहिजे असते आणि ती जगन्नाथकडून बळकवण्याच्या प्रयत्नात असते. त्यावेळी जगन्नाथ म्हणजेच सावलीने ज्यांना वडिल मानलेलं असतं ते तिलोत्तमाला म्हणतात की, तुझ्या आणि जागेच्यामध्ये मी नाही तर ती उभी आहे. तिलोत्तमा मागे वळून बघते आणि पाहते तर काय तिथे चक्क सावली उभी असते.
त्यावेळी तिलोत्तमाला आठवतं की ती सावलीला म्हणते हा चेहरा मला पुन्हा कधीच दाखवायचा नाही. तेवढ्यात सावली पुढे येते आणि म्हणते की, गुरुकुलाची जागा मी तुम्हाला कधीच मिळुू देणार नाही. असं ओपन चॅलेंज सावली तिलोत्तमाला देते. हा मालिकेचा हा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून येत्या 24 मे रोजी संध्याकाळी आठ वाजता पाहायला मिळणार आहे. मालिकेतील हे वळण आता तरी सारंग आणि सावलीला एकत्र आणेल का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.