Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आई तुळजाभवानी’ मालिकेत देवीचे ‘व्यसनखंडीनी’ रूप; व्यसनमुक्तीचा देणार शक्तिशाली संदेश

कलर्स मराठीवरील ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत ‘दिव्य स्वस्तिकाचा निर्णायक महिना’ या विशेष ट्रॅकमध्ये देवीचे अलौकिक ‘व्यसनखंडीनी’ रूप प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. व्यसनाच्या गर्तेत अडकलेल्या भिक्याला स्वतःच्या इच्छाशक्तीच्या बळावर उभे राहण्याची प्रेरणा देत देवी व्यसनमुक्तीचा प्रभावी संदेश देणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 22, 2026 | 05:07 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • हे कथानक भक्ती, अध्यात्म आणि सामाजिक आशय यांचा सुंदर संगम घडवणार आहे.
  • या कथानकातून व्यसनमुक्तीचा सामाजिक संदेशही प्रभावीपणे पोहोचवला जाणार आहे.
  • आत्मपरिवर्तन यांचा संगम या विशेष भागांमध्ये अनुभवायला मिळणार आहे.
कलर्स मराठीवरील लोकप्रिय ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत प्रेक्षकांना आता आणखी एक थरारक आणि आध्यात्मिक पर्व अनुभवायला मिळणार आहे. ‘दिव्य स्वस्तिकाचा निर्णायक महिना’ या विशेष कथानकातून देवीचे अलौकिक ‘व्यसनखंडीनी’ रूप प्रथमच उलगडणार असून, व्यसनाधीनतेविरुद्धचा प्रभावी संदेश या भागांमधून दिला जाणार आहे. निर्जला ते आषाढी एकादशी या पवित्र कालखंडाच्या पार्श्वभूमीवर उलगडणारे हे कथानक भक्ती, अध्यात्म आणि सामाजिक आशय यांचा सुंदर संगम घडवणार आहे.

‘पांडुरंगाचे बोलवणं आले अन्…’ अभिनेत्री अक्षया नाईकने सांगितला पहिल्या वारीचा अनुभव, भावना व्यक्त करत म्हणाली…

मालिकेच्या सध्याच्या कथानकात पाताळदेवी आणि तिचा चेला भुजंग यांनी चातुर्मास सुरू होऊ नये म्हणून अकालमृत्यू, भय, चिंता आणि व्यसन या चार विकारांच्या माध्यमातून भुलोकावर संकट निर्माण केले आहे. यापैकी अकालमृत्यू, भय आणि चिंता या संकटांवर मात केल्यानंतर आता व्यसनाच्या रूपातील सर्वात कठीण आव्हान देवीसमोर उभे ठाकले आहे. त्यामुळे कथेला अधिक नाट्यमय आणि भावनिक वळण मिळाले आहे.

‘दिव्य स्वस्तिकाचा’ चौथा आठवडा भिक्या या पात्राभोवती फिरणार आहे. भुजंगाने दिलेल्या मायावी सारीपाटाच्या मोहात अडकलेल्या भिक्याला जिंकण्याची सवय लागते आणि हळूहळू त्याचे रूपांतर व्यसनात होते. प्रत्येक विजयासोबत त्याच्या आयुष्यातील काही वर्षे कमी होत जातात, मात्र या भयावह सत्याची त्याला जाणीव होत नाही. व्यसनाच्या गर्तेत अडकलेला भिक्या स्वतःचे आयुष्य, नातेसंबंध आणि कुटुंब गमावण्याच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचतो.

अशा परिस्थितीत आई तुळजाभवानी कोणताही चमत्कार न करता भिक्याला स्वतःच्या इच्छाशक्तीच्या बळावर व्यसनातून बाहेर पडण्याची प्रेरणा देते. देवीचे ‘व्यसनखंडीनी’ रूप केवळ दैवी शक्तीचे प्रतीक नसून, माणसाच्या आत्मविश्वासाला जागवणारे आणि योग्य मार्ग दाखवणारे रूप म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यामुळे या कथानकातून व्यसनमुक्तीचा सामाजिक संदेशही प्रभावीपणे पोहोचवला जाणार आहे.

या प्रवासात ब्रह्मांडातील ‘दिव्य स्वस्तिक’ पूर्णत्वाकडे वाटचाल करताना दाखवले जाणार आहे. स्वस्तिकाचा चौथा हात तेजाने उजळण्याचा क्षण मालिकेतील महत्त्वाचा टप्पा ठरणार असून, त्यानंतर चातुर्मासाच्या पवित्र प्रारंभाचा सोहळा उलगडणार आहे. भक्ती, श्रद्धा, संघर्ष आणि आत्मपरिवर्तन यांचा संगम या विशेष भागांमध्ये अनुभवायला मिळणार आहे.

‘अनेकांना वाटलं कँसर झाला…’ सिनेमासाठी टक्कल केलं अन् अफवांचा उठला पाऊस; सविता मालपेकरांनी सांगितली काकस्पर्श कथा

दैवी शक्ती, प्रेरणादायी कथानक आणि समाजप्रबोधनाचा संदेश यांचा संगम असलेला ‘दिव्य स्वस्तिकाचा निर्णायक महिना’ हा विशेष ट्रॅक प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय ठरणार आहे. व्यसनासारख्या गंभीर सामाजिक समस्येवर प्रकाश टाकत जीवनाला सकारात्मक दिशा देणारी ही कथा प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडेल. ‘आई तुळजाभवानी’ ही मालिका कलर्स मराठीवर दररोज रात्री ८:५० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येते.

Web Title: The goddesss vyasan khandini form in the series aai tuljabhavani

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 05:07 PM

Topics:  

  • Aai Tuljabhavani

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.