फोटो सौजन्य - Social Media
मुलाखतीत त्यांनी सांगितलं की जेव्हा महेश मांजरेकरांनी त्यांना टक्कल करण्यास सांगितले तेव्हा कसलाही आक्षेप न घेता त्या तयार झाल्या. याउलट ते म्हणतात की त्यांनी अनेक दशकांपासून अशा एखादा पात्राची वाट पाहिली आहे त्यामुळे या भूमिकेसाठी त्या फक्त तयार नव्हत्या तर ही भूमिका साकारणे त्यांचे स्वप्न होते. त्या म्हणतात की, “सिनेमाच्या शूटिंगदरम्यान सगळ्यात पहिलं टक्कल करण्यासाठी मलाच बसवलं होतं.” पुढे त्यांनी त्यांचा संपूर्ण अनुभव शेअर केला.
सविता मालपेकरांनी सांगितलं की, “माझं टक्कल बघून अनेकांना आनंदही झाला असेल. अनेकांना वाटलं असेल की मला कँसर झाला.” या दरम्यान त्यांनी त्यांच्यासोबत सिनेमाच्या Production च्या दरम्यान घडलेला अनुभव सांगितला. ते म्हणतात की त्यांनी मांजरेकरांना जाऊन सांगितले की बाहेर चर्चा सुरु आहे. लोकं म्हणत आहेत सविता मालपेकरांनी टक्कल करण्यासाठी मांजरेकरांकडून बक्कळ पैसा घेतला असेल. विगही मागून घेतली असेल.
सविता मालपेकर या मराठी चित्रपट, दूरदर्शन आणि रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक गाजलेल्या मालिका, नाटकं आणि चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. आपल्या सहजसुंदर अभिनयशैलीमुळे आणि दमदार संवादफेकीमुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. विनोदी, कौटुंबिक तसेच भावनिक भूमिकांमध्ये त्यांनी विशेष छाप पाडली आहे. त्यांच्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी मराठी मनोरंजनविश्वाला महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.






