Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vat Purnima Special: वटपौर्णिमा स्पेशलमध्ये रहस्य, रोमान्स आणि ड्रामा; ‘मी जिंकून घेईन सारं’-‘मोहिनी’चा महासंगम

कलर्स मराठीवर २९ जून ते १ जुलै 'मी जिंकून घेईन सारं' आणि 'मोहिनी'चा वटपौर्णिमा विशेष महासंगम पाहायला मिळणार आहे. RKची एन्ट्री, शालिनी बेपत्ता आणि अनेक धक्कादायक ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळतील.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 26, 2026 | 04:02 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘मी जिंकून घेईन सारं’ आणि ‘मोहिनी – प्रेमाची फिल्मी कहाणी’ यांचा भव्य वटपौर्णिमा विशेष महासंगम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २९ जून ते १ जुलै या तीन दिवसांत दररोज एक तासांचा विशेष भाग प्रसारित होणार असून, यात सणाचा उत्साह, रहस्य, कौटुंबिक नाट्य आणि रोमँस यांचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे.

या विशेष भागात वटपौर्णिमेच्या निमित्ताने आनंदाचे वातावरण असतानाच अनेक धक्कादायक घडामोडी घडणार आहेत. सुपरस्टार RKची दमदार एन्ट्री कथेला नवं वळण देणार असून, त्याचवेळी कार्तिकी आणि शांभवी यांच्या कटामुळे शालिनी मोठ्या संकटात सापडणार आहे. कार्यक्रमादरम्यान शालिनी अचानक बेपत्ता झाल्यानंतर तिचा शोध घेण्यासाठी मोहिनी, अनिकेत, छवी आणि RK एकत्र येणार आहेत.

शालिनीच्या गायब होण्यामागील रहस्य काय आहे? मोहिनीला या शोधमोहीमेत कोणत्या संकटांचा सामना करावा लागणार? अनिकेत आणि छवी जुने मतभेद विसरून शालिनीला वाचवण्यात यशस्वी होणार का? या प्रश्नांची उत्तरं या विशेष महासंगमात मिळणार आहेत.

Vat Purnima Special: ‘सनई चौघडे’च्या वटपौर्णिमा विशेष भागात धक्कादायक ट्विस्ट, जयच्या आयुष्यात येणार मोठं संकट; शर्वरी करणार मदत

रहस्य आणि थरारासोबतच मनोरंजनाचाही तितकाच मोठा डोस प्रेक्षकांना मिळणार आहे. अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांच्या विशेष उपस्थितीमुळे कार्यक्रमाला अधिक रंगत येणार आहे. पारंपरिक झुम्मा-फुगडी, RK–मोहिनी आणि अनिकेत–छवी यांचे रोमँटिक नृत्य तसेच भावनिक प्रसंग या भागाचं खास आकर्षण ठरणार आहेत.

या महासंगमाच्या चित्रीकरणासाठी कलाकार आणि तंत्रज्ञांनी तब्बल ४० तास सलग शूटिंग केलं आहे. कडक उन्हात आणि प्रतिकूल परिस्थितीतही संपूर्ण टीमने मेहनत घेत हा भव्य भाग साकारला आहे.

Vat Purnima Special: ‘वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये वटपौर्णिमा स्पेशल; समर करणार वडाची पूजा, स्वानंदी व्यक्त करणार प्रेम?

‘आजची सावित्री’ या संकल्पनेवर आधारित या विशेष भागात छवी, मोहिनी आणि शालिनी या तिन्ही महिला संकटांना धैर्याने सामोऱ्या जात आपल्या कुटुंबासाठी लढताना दिसणार आहेत. त्यामुळे वटपौर्णिमेच्या निमित्ताने प्रेक्षकांना मनोरंजनासोबतच भावनिक आणि थरारक अनुभव मिळणार आहे.

Web Title: Vat purnima special episodes mi jinkun ghein sara and mohini bring an exciting mix of suspense romance and family drama

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 04:02 PM

Topics:  

  • Colours Marathi
  • Marathi Serial
  • Vat Purnima

संबंधित बातम्या

Tu Hi Re Maza Mitwa Serial: सुरू होतेय प्रेमाची लपाछपी; अर्णव-ईश्वरीच्या नात्यात नवा ट्विस्ट, मालिकेचा नवा प्रोमो चर्चेत
1

Tu Hi Re Maza Mitwa Serial: सुरू होतेय प्रेमाची लपाछपी; अर्णव-ईश्वरीच्या नात्यात नवा ट्विस्ट, मालिकेचा नवा प्रोमो चर्चेत

Jai Jai Swami Samarth: गणपती विसर्जनावेळी सावळ्याचं मोठं सत्य उलगडणार; मालिकेत नवं वळण
2

Jai Jai Swami Samarth: गणपती विसर्जनावेळी सावळ्याचं मोठं सत्य उलगडणार; मालिकेत नवं वळण

Dhaktya Sunbai Serial: गणेश गल्लीच्या मुंबईच्या राजाच्या चरणी ‘धाकट्या सुनबाई’चा शुभारंभ; २८ सप्टेंबरपासून मालिका
3

Dhaktya Sunbai Serial: गणेश गल्लीच्या मुंबईच्या राजाच्या चरणी ‘धाकट्या सुनबाई’चा शुभारंभ; २८ सप्टेंबरपासून मालिका

Zee Marathi Serial: मनोरंजनासोबत प्रबोधनही! ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये दारूबंदीचा लढा; गावासाठी एकवटणार महिला
4

Zee Marathi Serial: मनोरंजनासोबत प्रबोधनही! ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये दारूबंदीचा लढा; गावासाठी एकवटणार महिला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.