( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
मालिकेच्या आगामी भागात समर, स्वानंदीला एका सुंदर माळरानावर फिरायला घेऊन जातो. त्यानंतर तो तिला एका प्लांट नर्सरीमध्ये घेऊन जातो, जिथे फुलं आणि छोट्या रोपांच्या मदतीने ‘I Love You’ असा खास संदेश तयार केलेला असतो. या रोमँटिक सरप्राईजमधून समर आपल्या मनातील प्रेमाची कबुली स्वानंदीसमोर देतो.
याचदरम्यान दोघे मिळून वृक्षारोपणही करतात. मात्र, स्वानंदीने अजूनही आपल्या प्रेमाची कबुली दिलेली नसल्याने समर तिला म्हणतो, “जर आपल्या नात्यात तसं काही नसेल, तर वटपौर्णिमेची पूजा करू नकोस.”
वटपौर्णिमेच्या दिवशी समर येणार की नाही, याची स्वानंदीला चिंता लागलेली असते. मात्र, तिला मोठा सुखद धक्का बसतो. समर आधीच वडाच्या झाडाजवळ उपस्थित असतो आणि इतर महिलांसोबत पूजा करताना दिसतो. हे पाहून स्वानंदीचाआनंद गगनात मावत नाही आता ती समरच्या प्रेमाला होकार देणार का? दोघे मिळून वटपौर्णिमेची पूजा करून त्यांच्या नात्याची नवी सुरुवात करणार का? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.
View this post on Instagram
‘मराठी अभिनेत्री ओळख दाखवत नाहीत, पण हिंदी..’, Prajakta Kulkarniचं वक्तव्य चर्चेत, Shilpa Shettyबद्दल काय म्हणाल्या?
या विशेष भागाच्या चित्रीकरणाबद्दल अभिनेत्री तेजश्री प्रधान म्हणाली “प्रेक्षक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण आणि पावसाचं आगमन एकाच वेळी अनुभवायला मिळालं. त्यामुळे शूटिंगचा अनुभव अधिक खास ठरला. अनेक महिन्यांच्या उकाड्यानंतर पावसात वटपौर्णिमेचा सीन चित्रीत करताना खूप आनंद मिळाला. निसर्गानेही सुंदर साथ दिली आणि समर-स्वानंदीच्या नात्यातील भावना अधिक प्रभावीपणे साकारता आल्या.”
View this post on Instagram
आता समर आणि स्वानंदीच्या प्रेमकथेचा हा महत्त्वाचा टप्पा प्रेक्षकांना भावतो का, हे मालिकेच्या आगामी भागात पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.






