Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 28 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vibhavari Pradhan: मराठी चित्रपटांत काम करण्याची इच्छा, पण संधीच मिळाली नाही! अभिनेत्री विभावरी प्रधान यांनी व्यक्त केली खंत

Vibhavari Pradhan: ‘या गोजिरवाण्या घरात’ फेम विभावरी प्रधान यांनी चित्रपट प्रवासाबद्दल खुलासा केला. मराठीत ‘वैभव लक्ष्मी’ आणि ‘हमके माफी देइद’ या भोजपुरी चित्रपटातील अनुभवही त्यांनी सांगितला.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 28, 2026 | 12:04 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Vibhavari Pradhan: मराठी आणि हिंदी मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेत्री विभावरी प्रधान यांनी त्यांच्या चित्रपट प्रवासाबद्दल महत्त्वाचा खुलासा केला आहे. ‘या गोजिरवाण्या घरात’ या मालिकेमुळे त्या घराघरांत पोहोचल्या. मात्र, दूरचित्रवाणी मालिकांमध्ये व्यग्र असल्यामुळे त्यांना चित्रपटांमध्ये अपेक्षित संधी मिळाल्या नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, विभावरी यांनी मराठी चित्रपटासोबतच एका भोजपुरी सिनेमातही काम केलं आहे.

भोजपुरी चित्रपटात काम करताना भाषेची अडचण

राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत विभावरी प्रधान यांनी त्यांच्या भोजपुरी चित्रपटातील अनुभवाबद्दल सांगितलं. ‘हमके माफी देइद’ असं या चित्रपटाचं नाव असून, ‘या गोजिरवाण्या घरात’ ही मालिका सुरू असतानाच त्यांनी या चित्रपटात काम केलं होतं.

या अनुभवाबद्दल बोलताना विभावरी म्हणाल्या की, भोजपुरी भाषा त्यांच्यासाठी नवीन असल्यामुळे संवाद लक्षात ठेवण्यासाठी त्यांना खूप मेहनत घ्यावी लागायची. त्या संवादांचा अक्षरशः पाठांतर करायच्या. या चित्रपटाचं चित्रीकरण गोरखपूर आणि आसपासच्या भागांत झालं होतं.

गावात चित्रीकरण सुरू असताना मुंबईहून आलेली अभिनेत्री कोण आहे, हे पाहण्यासाठी स्थानिक लोक मोठ्या संख्येने जमा व्हायचे. कॅमेऱ्यासमोर सहजपणे संवाद बोलणाऱ्या विभावरी यांना मात्र लोक प्रत्यक्ष बोलण्यासाठी जवळ आले की काय उत्तर द्यावं, हेच कळत नसे.

यामुळे आपण अ‍ॅटिट्यूड दाखवत आहोत, असा गैरसमज लोकांचा व्हायचा, असंही त्यांनी सांगितलं. भोजपुरी चित्रपटातील हा अनुभव त्यांच्यासाठी वेगळा आणि लक्षात राहणारा ठरला.

Navika Kotia: ‘इंग्लिश विंग्लिश’ फेम नविका कोटियाचा लग्नाच्या काही दिवस आधीच मोडला साखरपुडा, मुलाने केली फसवणूक?

मराठीत ‘वैभव लक्ष्मी’ हा एकच चित्रपट

भोजपुरी चित्रपटाव्यतिरिक्त विभावरी प्रधान यांनी मराठीत ‘वैभव लक्ष्मी’ या चित्रपटात काम केलं आहे. या चित्रपटात अभिनेत्री अलका कुबल यांच्यासोबत काम करण्याची संधी त्यांना मिळाली होती. अशा प्रकारे त्यांनी आतापर्यंत मराठी आणि भोजपुरी असे दोन चित्रपट केल्याचं मुलाखतीत सांगितलं.

मात्र, चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा असूनही त्यांना फारशा संधी मिळाल्या नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. दूरचित्रवाणी मालिकांमध्ये त्या सातत्याने काम करत असल्यामुळे निर्मात्यांनी आपल्याला केवळ टीव्हीवरील अभिनेत्री म्हणून पाहिलं असावं, असा त्यांचा अंदाज आहे.

“ऑफर आली असती तर नक्की केली असती”

चित्रपटांमध्ये कमी काम करण्यामागचं कारण स्पष्ट करताना विभावरी म्हणाल्या की, त्यांना चित्रपटांच्या ऑफरच मिळाल्या नाहीत. संधी मिळाली असती, तर त्यांनी नक्कीच चित्रपट केले असते.

टेलिव्हिजनमध्ये खूप गुंतल्यामुळे कदाचित आपण चित्रपट करणार नाही, असा गैरसमज झाला असावा, असंही त्यांना वाटतं. त्यामुळे मराठी चित्रपटांसाठी आपल्याला विचारण्यात आलं नसावं, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

विभावरी प्रधान यांनी आपल्या अभिनयाने छोट्या पडद्यावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, चित्रपटांमध्येही काम करण्याची इच्छा असूनही संधी न मिळाल्याची त्यांची ही खंत त्यांच्या चाहत्यांसाठी नक्कीच लक्षवेधी ठरते.

Ramayana : भारतीय संस्कृतीचा जागतिक डंका! ‘रामायणम्’च्या भव्य विश्वाची नमित मल्होत्रांनी शेअर केली झलक

Web Title: Vibhavari pradhan expresses disappointment over not getting offers for marathi movie

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2026 | 12:04 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi actress
  • marathi movie

संबंधित बातम्या

Navika Kotia: ‘इंग्लिश विंग्लिश’ फेम नविका कोटियाचा लग्नाच्या काही दिवस आधीच मोडला साखरपुडा, मुलाने केली फसवणूक?
1

Navika Kotia: ‘इंग्लिश विंग्लिश’ फेम नविका कोटियाचा लग्नाच्या काही दिवस आधीच मोडला साखरपुडा, मुलाने केली फसवणूक?

Ramayana : भारतीय संस्कृतीचा जागतिक डंका! ‘रामायणम्’च्या भव्य विश्वाची नमित मल्होत्रांनी शेअर केली झलक
2

Ramayana : भारतीय संस्कृतीचा जागतिक डंका! ‘रामायणम्’च्या भव्य विश्वाची नमित मल्होत्रांनी शेअर केली झलक

Nana Patekar: नाना पाटेकरांच्या निधनानंतर ‘नाम फाऊंडेशन’चं काय होणार? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
3

Nana Patekar: नाना पाटेकरांच्या निधनानंतर ‘नाम फाऊंडेशन’चं काय होणार? जाणून घ्या महत्त्वाची माहिती

Gondhal Marathi Movie: भारताची ऑस्कर एंट्री ठरलेल्या ‘गोंधळ’चा ट्रेलर प्रदर्शित; प्रदर्शनाची तारीखही आली समोर
4

Gondhal Marathi Movie: भारताची ऑस्कर एंट्री ठरलेल्या ‘गोंधळ’चा ट्रेलर प्रदर्शित; प्रदर्शनाची तारीखही आली समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.